Submitted by दत्तात्रय साळुंके on 25 July, 2026 - 07:15
आल्या आषाढाच्या सरी
दह्या दूधाच्या घागरी
मंथन आभाळी चालले
लोणी गोकुळी सांडले
खेळे सावळा आभाळी
खेळे सावळा गोकुळी
करी लयलूट लोणी
गोपां संगे वनमाळी
नाही वानवा सुखाची
मोदे भरले गोकुळ
रास रंगलेल्या गोपी
पावा वाजवी घननीळ
ध्वनी मधूर ये कानी
टप टप पानोपानी
चराचर चिंबचिंब
नदी, नाले उफानोनी
ओला आनंद मनात
ओला आनंद तनात
आली वारी आषाढाची
टाळ वीणा वाजवत
© दत्तात्रय साळुंके
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम कल्पना. फारच सुरेख.
अप्रतिम कल्पना. फारच सुरेख.
मला ती कविता आठवली -
आभाळी गडगडते, म्हातारी का दळते!
खरंच फार अप्रतिम झालीय कविता
खरंच फार अप्रतिम झालीय कविता दसा!
_/\_
_/\_
आत्ता वारीची गाणी ऐकत ही कविता वाचते आहे - https://www.youtube.com/watch?v=Y8QyyACKa70&list=RDiAf1gznPADk&index=3
पोएट्री इअ फुड फॉर द सोल! - कोणी तरी म्हणुन गेलेले आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे सामो
सामो
सामो
नितनवे
अनेको धन्यवाद
सामो तुम्ही ओळखलं हे एक रूपक आहे.
आषाढ सरी आल्या
गावात आनंद झाला .
शेतात कामाची लगबग झाली. रास रंगलेल्या गोपी, पावा वाजवी घननीळ.
आजुबाजुला सर्वत्र समाधानी, आनंदी गोकुळ आहे.
खूप सुंदर...!
खूप सुंदर...!
तुमच्या कविता वाचताना मी शालेय जीवनात पुन्हा एकदा जाते.. मला अभ्यासलेल्या कवितांची आठवण येते.
छान!
छान!
खूप छान कविता आहे आवडली.
खूप छान कविता आहे आवडली.
आल्या आषाढाच्या सरी
दह्या दूधाच्या घागरी
मंथन आभाळी चालले
लोणी गोकुळी सांडले...
ओला आनंद मनात
ओला आनंद तनात
आली वारी आषाढाची
टाळ वीणा वाजवत
हे विशेष आवडले...
मस्तच...
मस्तच...
जय जय रामकृष्ण हरी...
____/\____
सुंदर कविता
सुंदर कविता
अप्रतिम कविता!
अप्रतिम कविता!
सर्व रसिकांचे अनेको धन्यवाद..
सर्व रसिकांचे अनेको धन्यवाद....
सुंदर! आवडली!
सुंदर! आवडली!
फारएण्ड मनापासून आभार....
फारएण्ड
मनापासून आभार....
सुंदर कविता, गेय आहे एकदम.
सुंदर कविता, गेय आहे एकदम. आवडली !
अस्मिताजी धन्यवाद...
अस्मिताजी धन्यवाद...