"जेन झी आंदोलन - इन्स्टा रील्स" Like, subscribe & Share

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 July, 2026 - 18:27

या जेन झी आंदोलनाला घरबसल्या तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर यांच्या एकेक धमाल रीळ बघा आणि फॉरवर्ड करा. एवढे केले तरी देशात क्रांती झालीच म्हणून समजा.
आणि यात तुमचे मनोरंजन होईल ते वेगळेच. कारण काय एकेक धमाल आहेत..
काही क्रिएटिव्ह.. काही इमोशनल.. काही सुखावणारे.. काही फुल हॅपनिंग.. काही अरे आता आपण तिकडे असायला हवे असे वाटणारे.

आणि हो या बघितल्या की वेगळ्या न्यूज चॅनेल बातम्या बघायची काही एक गरज नाही. आजच्या तारखेला रियल मीडिया हाच आहे Happy

वैधानिक इशारा - इन्स्टारील बघणे एडिक्शन आहे आणि या कॉकरोच जेन झी रील्स बघणे सुपर एडिक्शन!l

आता येऊ द्या....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.instagram.com/reel/DbKidFry9Tl/?igsh=MWJhemh3dmE3NjdrZQ==

https://www.instagram.com/reel/DbImGyNI3lo/?igsh=MWhtbWcyY2M0bWIwbA==

https://www.instagram.com/reel/DbIQXVuOAHL/?igsh=emtxbWEwcjl2d2Zh

https://www.instagram.com/reel/DbJKRXMOJV4/?igsh=bmR6azZweW1xenp5

पाकिस्तानी जेन झी इंडियन जेन झी वर फिदा..
हे दोन्हीकडचे जेन झी जेन अल्फा मिळून कधीतरी दोन्ही देश एक करून टाकतील Proud

मजा संपली. मरतायत आता पोरं. अंगाशी येतंय सगळं. वाईट वाटतं की त्यांचा वापर केला गेलाय. FIR झाली तर शिक्षण, नोकरी, लग्नं सगळ्यांवर विपरीत परिणाम होणार. क्षणिक मस्ती महागात पडणार आहे.

मजा संपली. मरतायत आता पोरं. अंगाशी येतंय सगळं. वाईट वाटतं की त्यांचा वापर केला गेलाय>>>
आणि याला प्लिज क्षणिक मस्ती नका म्हणू. मस्ती म्हणून, गंमत म्हणून मुलांनी आंदोलनात भाग नव्हता घेतला. बहुतेक मुलांनी विचारपूर्वक भाग घेतला होता. आंदोलनामध्ये भाग घेणं चूक आहे असा संदेश जातो आपल्या अशा बोलण्यातून. इथे मुलांची चूक नाहीये, सरकारची चूक आहे.
हे असं होणार याचा अंदाज होताच. दिल्लीतले बरेच वकील मुलांच्या बाजूने उभे आहेत. कपिल सिब्बल तर लढवणार आहेच केस पण त्या आधीपासून कितीतरी वकिल मुलांना मदत करत आहेत. २० तारखेच्या मोर्च्यात जाताना आयाम आणि त्याचा कुटे ५-७ वकिलांचे नंबर घेवून गेले होते.
मुलांवरच्या केसेस मागे घेवू हे आश्वासन दिलं होतं आंदोलन मागे घेताना. पण आता सरकार सूडबुद्धीने वागत आहे. हे असं होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे आता याविरुद्ध उभे रहावे लागेल आपल्या सारख्यांना. जमेल तशी मदत करू या. आपलीच मुलं आहेत. प्रत्यक्ष जमत नसेल तर जिथे जमेल तिथे याविरुद्ध आवाज तर उठवू शकतोच ना आपण.

अल्पना +१
सकारात्मक विचार आहे.

क्षणिक मस्ती हे आंदोलनासाठी म्हटलं नसून तिथे गेल्यानंतर जमावाच्या मानसशास्त्रानुसार बेभान होऊन तोल सुटलेल्या मुलांसाठी म्हटलेलं आहे.

आंदोलन सुरू झाल्यानंतर सरकारचं गप्प बसणं पटण्यासारखं नव्हतंच.

स्वतःच्या मागण्यांसाठी विचारपूर्वक आंदोलन करणारी खरी मुलं वेगळी दिसली. त्यांनी ताळतंत्र नव्हता सोडला.

पण मजा आणि हुल्लडबाजी करायला आलेली मुलं देखील बरीच होती. त्या मुलांनी ही परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतलेली आहे.

मजा आणि हुल्लडबाजी करायला आलेली मुलं देखील बरीच होती. त्या मुलांनी ही परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतलेली आहे.
>> ही मुलं कुठली हे कसं शोधणार? त्याला काय मापक लावणार?
भाषेबद्दल बोलायचं झालं तर भाजपचे लोक काय बोलतात ते सगळ्यांना माहिती आहे.

आता सरकार ज्या मुलाना टारगेट करत आहेत ते क्षणिक मस्तीवाले आहेत का? आणि जेन्यूइन आंदोलन करणाऱ्या मुलांना सरकार क्लीन चिट देत आहे का? सरकार खरेच सूडबुद्धी दाखवत असेल तर सर्वांचीच वाट लावणार...

ज्यांनी तिथे लाठ्या खाल्या त्यांना तर सलामच पण रस्त्यावर उतरलेल्या एकूण एक उत्साही जेन झी मुलांमुळे, त्याच सोबत रीळ बनवणाऱ्यांमुळे, या रीळ वायरल करणाऱ्यामुळे हे आंदोलन देशभरात हिट गेले, त्यामुळे तिथे काय घडत आहे हे न्यूज मध्ये राहिले, देशभरातून सपोर्ट मिळाला, वाढतच गेला आणि सरकारला झुकावे लागले.

अशीच न्यूज झाली नसती, तर तिथली आंदोलक मुले शहीद झाली असती आणि त्यांना दहशतवादी घोषित करून मॅटर क्लोज झाला असता.

याला प्लिज क्षणिक मस्ती नका म्हणू. मस्ती म्हणून, गंमत म्हणून मुलांनी आंदोलनात भाग नव्हता घेतला. बहुतेक मुलांनी विचारपूर्वक भाग घेतला होता. आंदोलनामध्ये भाग घेणं चूक आहे असा संदेश जातो आपल्या अशा बोलण्यातून. इथे मुलांची चूक नाहीये, सरकारची चूक आहे. >> ++

आपण या मुलांमध्ये भेदभाव करायला नको. आंदोलनाव्यतिरिक्त इतर काही गुन्हे , केसेस असतील तर गोष्ट वेगळी. पण आंदोलनात असं बोलला, तशी पाटी दाखवली हे म्हणणे म्हणजे सरकारच्या सूडबुद्धीला साथ देणे होईल.

काही काही रिल्स पाहिले त्यातल्या मुलांना तर धड कारणही माहित नव्हतं की ते तिथे का आलेत. इथे छान खायला मिळतं, मजा येते अशी कारणं देणारी मुलं सुद्धा पाहिली. खऱ्या मुलांना वेगळं का करू नये त्यांच्यापासून? आणि माझ्या माहितीनुसार नीट परीक्षेसाठी बसलेल्या आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्या मुलांवर एफ आय आर होणार नाहीये.

ज्या मुलांनी मुर्खासारखे व्हिडिओज अपलोड केलेत त्यांना ओळखणं सोपं आहे.

इथे छान खायला मिळतं, मजा येते अशी कारणं देणारी मुलं सुद्धा पाहिली
>>
म्हणून सरकारने FIR करायचा? आणि आपण ते मान्य करायचं?
एखाद्या आंदोलनाचा सिरीयसनेस नसणं हा क्रिमिनल ऑफेन्स आहे?

ज्या मुलांनी मुर्खासारखे व्हिडिओज अपलोड केलेत त्यांना ओळखणं सोपं आहे.
>>
मग तर आधी मोदी आणि शहांना ताब्यात घ्यावं लागेल. गेली १४ वर्षे बऱ्याच लोकांबद्दल काहीही बरळले आहेत ते.

पुन्हा एकदा, भाजपच्या या भेदभावच्या जाळ्यात अडकू नका. असा भेदभाव करण्याचा अधिकार दिला तर सगळयांवर ते FIR करू शकतील.

आंदोलनाव्यतिरिक्त काही गुन्हे असतील तर नक्की पकडू द्या.

सरकार शांतपणे आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करणार होतं का? का?
नसल्यास मग आंदोलनातील मागण्यांपैकी कुणावर कारवाई करणार नाही हे मान्य केलं?

आंदोलनातील मुलांवर सुड घेणार का आता? वा, लवकरच आपल्या असलियतवर आले. आंदोलनातील मुलांवर fir करणार नाही हे वचन दिलेले ना वांगचुकला उपोषण सोडताना?
फट्टुपणाची हाइट आहे.

आधी क्रिमिनल रेकॉर्ड असेल म्हणजे fir असेल तर म्हणे सरकार कारवाई करणार.

आधी fir असलेली व्यक्ती जर जंतर मंतर ला शांततापूर्ण आंदोलन करत असेल तर. त्या व्यक्ती वर कारवाई का?

कुणाही आंदोलकांवर कारवाई का? हिंसाचार तर पोलिसांनी सुरू केला ना? अजून कुठेही सिद्ध झाल नाही किंवा reel आला नाही ज्यात आंदोलक हिंसा करत आहेत? एक दोन आलेत ते बघूनच कळत की doctored आहेत म्हणून.

ह्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत कारण gen z ने ज्या पद्धतीने विश्वगुरु ची टर उडवली आहे त्यामुळे

Pages