"जेन झी आंदोलन - इन्स्टा रील्स" Like, subscribe & Share

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 July, 2026 - 18:27

या जेन झी आंदोलनाला घरबसल्या तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर यांच्या एकेक धमाल रीळ बघा आणि फॉरवर्ड करा. एवढे केले तरी देशात क्रांती झालीच म्हणून समजा.
आणि यात तुमचे मनोरंजन होईल ते वेगळेच. कारण काय एकेक धमाल आहेत..
काही क्रिएटिव्ह.. काही इमोशनल.. काही सुखावणारे.. काही फुल हॅपनिंग.. काही अरे आता आपण तिकडे असायला हवे असे वाटणारे.

आणि हो या बघितल्या की वेगळ्या न्यूज चॅनेल बातम्या बघायची काही एक गरज नाही. आजच्या तारखेला रियल मीडिया हाच आहे Happy

वैधानिक इशारा - इन्स्टारील बघणे एडिक्शन आहे आणि या कॉकरोच जेन झी रील्स बघणे सुपर एडिक्शन!l

आता येऊ द्या....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरम कलाकार
https://www.facebook.com/share/r/1DMjDowtfF/

जंतरमंतरवर दिल्ली मध्ये मुलांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात रॅप सॉंग ऐका..
जबरदस्त आहे.

कंसराज, आत्मनिर्भर भारत भारी आहे Lol

हसून वेड लागलं तर माझी जबाबदारी नाही!>> लय भारी

सगळेच व्हिडिओ हसून हसून लोळवतील असे आहेत

https://www.instagram.com/reel/DbI74gSTjbe/?igsh=MjYydHQ2d2N1NGJy
मी हे loop मध्ये बघतेय Lol . कुठलं आहे माहित नाही.
अगदी कोवळी मुलं.... निरागसपणे चालू आहे.
Submitted by अश्विनी के on 25 July, 2026 - 17:04

खरोखर व्यसन लावेल हे reel!!! btw त्यात कोणते गाणे वापरले आहे???

आणि तो curly hair वाला मुलगा आहे, त्याची skin किती छान आहे, spotless एकदम!!!
मी यांच्या वयाचा होतो, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर पिंपल्सचे राज्य होते!

पुन्हा भेटू Lol

सगळेच व्हिडिओ हसून हसून लोळवतील असे आहेत >>> अगदी!

रॅप सॉंग, मोक्षू यांनी पोस्ट केलेली कविता.... सगळं यांना नीट कळतंय. फक्त आमच्या व आधीचा पिढ्या डोळ्यावर विचित्र चष्मा लावुन बसल्यात त्यांना हे दिसत नाही, नसलेले मास्टर स्ट्रोक दिसतात.

https://www.instagram.com/reel/DbRDTz0OVtP/?igsh=MTkzN3h6aXJvNzl6ag==

प्रोटेस्टमध्ये एका आईची तिच्या मुलाशी चुकामूक झाली.
आपल्या जेन झी पोरांनी त्यांची भेट कशी घडवून दिली बघा..
शेवटी डोळ्यातून पाणी काढले या रीळने..

अरे ही रीळ वर चैत्राली यांनी शेअर केली आहे
काही हरकत नाही.. पुन्हा बघा Happy

वरच्या सगळ्या लिन्क्स बघितल्या नाहीत .
पण एक रील बघितलेली , एक मुलगा आपल्या ग्रुप बरोबर पोलीसांच्या बाजूला बसून त्याना सान्गतोय
"मेरा एक सपना अधूरा रह गया , किस लडकी पे लाठी चार्ज हो रह है और मै उसे जाके उसे बचाता हून
अगर अगली बार प्रोटेस्ट हूआ तो ये आक्टीन्ग करवाओगे ना मुझसे "
तो इतका निरागसपणे आणि प्रामाणिक्पणे सांगतो की ते बघूनच हसायला येतं

त्या मेरे मेहबूब गाण्याच्या क्रिएटर ना कल्पना कधी आली नसेल की ये गाना ऐसे भी वायरल हो जाएगा. किती व्हर्जन्स आली बघितली का. जेंझी सोबत येडेपणा करण्याची नशा येऊ लागली आहे आता

ह्या गाण्यावर नाचणारा युवक अभिनव बिश्त ह्याचे हे गाणे जंतर मंतर येथे गंमत म्हणून त्याने रेकॉर्ड केले. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून देशातील लाखो लोकांनी ते बघितले. २-३ दिवसात त्याच्या फॉलोवर्सची संख्या पन्नास हजारावरून सहा लाखापेक्षा जास्त झाली. लगेच चक्रे फिरली. इन्स्टाग्रामने त्याचे अकाऊंट फ्रिज केले. १८० दिवसात तो अपील करू शकतो अशी नोटीस दिली. पठ्ठ्याने लगेच इंस्टाग्रामवर दुसरे अकाऊंट काढले. एका दिवसात त्याची फॉलोवर्सची संख्या दीड लाख पार झाली. इंस्टाग्राम चकित झाले. त्याचे फ्रिज झालेले अकाऊंट इंस्टाग्रामने पुन्हा सक्रीय केले.
अभिनवने आपल्या चाहत्यांचे आभार मानले. त्यांच्या पाठिंब्यामुळे त्याची मेहनत वाया गेली नाही.
सरकार असो वा खासगी कंपन्या लोकांच्या दबावापुढे झुकतात हे जेनझीने दाखवून दिले.

Pages