सजल नयन निरोप तुज आई...

Submitted by Meghvalli on 23 July, 2026 - 03:55

सजल नयन निरोप तुज आई
सजल नयन निरोप तुज आई

आज स्मरते ती अंगाई तुझी आई
तू गातसे जी निजवण्या मज आई
डोक्यावर मायेचा फिरवून हात
ऐकवीन म्हणतो तुला ती आई
परी तू आज गेली चिर निद्रेत आई.

सजल नयन निरोप तुज आई

शाळेत सोडाया येसी तू आई
पुस्तकांत भरसी स्वप्न नवी आई
कष्टाचे घाम गाळून तुझे
मोठा केलेस मला घडवुनी आई
परी तू आज गेली चिर निद्रेत आई.

सजल नयन निरोप तुज आई

माझ्या यशात तुझे हसू खुलते आई
सुख माझे तुझ्या डोळ्यांत दिसते आई
कधी न सांगिले दुःख तुझे मज
आनंदातच जगली आयुष्य आई
परी तू आज गेली चिर निद्रेत आई.

सजल नयन निरोप तुज आई

आज घरात स्तब्ध शांतता आई
तुझ्याविना रितेपण दाटते आई
संस्कारांचा वसा तुझा घेऊन
जगेन पुढे मी नाव तुझे आई
परी तू आज गेली चिर निद्रेत आई.

सजल नयन निरोप तुज आई

मागणे माझे आज परमेश्वरास आई
माझ्या पोटी पुढला जन्म मिळो तुज आई,
तू मुलगा नी मी आई तुझी व्हावे, आई
सांग तुही हेच देवाला, शपथ माझी तुला आई.

सजल नयन निरोप तुज आई
सजल नयन निरोप तुज आई

मंगळवार, २१/७/२६ , १२:४५ PM
अजय सरदेसाई -मेघ

https://youtu.be/_xlJPMjbi5Q?si=tWQf9W-Z5MbQMUAU

Group content visibility: 
Public - accessible to all site users