अवशिष्ट

Submitted by Meghvalli on 22 July, 2026 - 10:30

शब्द न उरले करण्या प्रेम व्यक्त,
का, कसे, केव्हा झाले शब्द रिक्त!

शब्द झिजले, प्रेम, प्रेम ना उरले,
तो उन्माद सरला, ते आकर्षण न उरले.

जीवनाची संध्याकाळ आली जवळ,
जे उरले अवशिष्ट, ते स्मरण केवळ.

ना खंत उरली, ना उरली आस,
फक्त उरला एक शांत, मोकळा श्वास.

राहिला मनात कुठेतरी एक विचार घन,
एकदा प्रेम केले होते उत्कट, हेच खरे धन.

बुधवार, २२/७/२६, १२:४५ PM
अजय सरदेसाई – मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users