
भल्या पहाटे(म्हणजे 7.45 ला) वर्क फ्रॉम होम दिवस.
अचानक नवरा जोरजोरात हाका मारायला लागला.नेहमी अश्या हाका ऐकू आल्या की मी पळत जाऊन बेसिन च्या कपाटावरचं लाल हिट काढते, पळत जाऊन ते ओरडणाऱ्याच्या 2 फुटावर ठेवून पळत पळत दुसऱ्या खोलीत पलंगावर पाय वर ठेवून बसते.(इतकं करून पण पालींना देवाने भिंती, छतावर चढण्याचं माझ्याकडे नसलेलं स्किल दिल्याने भीती असतेच.)
पण हिट घेऊन आले तर तो म्हणाला 'खोलीत साप आहे.आता मी दार उघडताना दारातून आत गेला'.आमच्या मागे शेत असल्याने खिडकीला जाळी लावेपर्यंत एक्झॉस्ट च्या खिडकीत उंदीर, कमोड वॉशरच्या नळावर सरडा, कधीतरी ते मागून सापासारखं आणि पुढून पालीसारखं दिसणारं हायब्रीड चमकदार काहीतरी दिसणं या अतिशय कॉमन गोष्टी होत्या.आता सर्व खिडक्यांना जाळी, वॉशिंग मशीन च्या ड्रेन च्या छिद्राला, बेसिन च्या पाईप ला, गॅलरी च्या ड्रेन ला बोरिक पावडर चं मॅरीनेशन करून दुहेरी जाड चिकटपट्टी बंद केलेल्या, गॅलरी च्या पत्र्याच्या लाटांमध्ये जुन्या चिंध्या घालून सील असं सर्व करून पण घरात साप येणे म्हणजे फारच टू मच अन्याय होता.अर्थात हे पाली आणि झुरळं यांच्यासाठीचे उपाय आहेत.त्यामुळे साप 'नॉट ऍप्लिकेबल टू मी' म्हणून बिनधास्त आत घुसला असावा.
'अश्या ओव्हर रिऍक्शन काय देतेयस?पटकन पातेलं आण.'
आतापर्यंत हा साप नक्की किती साईझ चा, कोणता, काळा की गोरा हे दोघांपैकी कोणीही विचारलं आणि सांगितलं नव्हतं.त्यामुळे वेगवेगळ्या आकाराची पाच पातेली घेऊन आले.
'हे काय?सापाला नैवेद्याचा स्वयंपाक नाही करायचाय.आणि भांडी किती छोटी आणलीस?चादर घेऊन ये.'
'अरे, साप किती मोठा आहे?कोणता आहे?पट्टे आहेत का? खोलीच्या बाहेर ये, गमबूट घाल.लांब हो.आधी फोटो व्हिडीओ काढू.साप चावला तर कोणता आहे सांगावं लागतं डॉक्टरांना.'
'हे घ्या.शुभ बोल नाऱ्या म्हटलं की मांडवाला आग लागली म्हणालीच पाहिजे बाई.द सिक्रेट वाच.आपण जे बोलतो ते मॅनीफेस्ट होतं. काशीस जावे नित्य वदावे.शुभ बोलावे.'(गडी लगेच लीडरशिप पेप टॉक द्यायला लागला.)
असे टिपिकल प्रेमळ संवाद झाल्यावर चादर आणली.
'बरोबर मी घेतो अंगावर तीच आणलीस ना चादर?ती गॅलरी च्या दारात पाल ब्लॉक करायला लावलेली जुनी फाटकी आण'
'इथे जीवावर बेतलंय पण चादरीचा मोह सुटत नाही.घ्या एकदाचे जुनी चादर.'
इतकी कचकच ऐकून वैतागून तो साप एका जुन्या लाकडी साईड टेबल सदृश रिकाम्या चौकोनात घुसला.आता आम्ही चादर बाजूला ठेवून तो चौकोन बंद करायला लाकूड शोधू लागलो.अगदी हुबेहूब झाकण म्हणून जोडी जुळेल असा चौकोन मिळाला पण ते साईड टेबल लांबी रुंदी वेगळी 1 सेंटीमीटर बाहेर आलेलं, त्यामुळे ते बंदच होणार नव्हतं.सापालाच दया आली आणि तो आम्हाला घाबरवून वर्क टेबलखाली नीट दिसेल अश्या जागी गेला.
'माझा कॉल आहे 8.30 ला.याला बाहेर काढायला हवं.'
'इथे रोम जळतंय.तुम्ही मीटिंग चं फिडल वाजवत बसा.'
त्या सापाला टेबलाखाली फळ्या रचून एका मर्यादेत ठेवून घरच्या छोट्या मेंबरला खुर्चीवर पाय वर करून खोलीच्या दुसऱ्या टोकाला लक्ष ठेवायला बसवून सर्पमित्र शोधायला गेले.
तोवर बाहेर सिक्युरिटी ला विचारलं.तो शूर गडी. मोठे मोठे बेडूक हाताने धरून बाहेर काढणारा.'अभी मैने साप पकडना बंद कर दिया है' म्हणाला.सर्पमित्र फोन नंबर घेतला होता तो 2 वर्षांपूर्वीचा होता.त्याला विचारलं अजून साप पकडता का?तर त्याने घराजवळ असलेल्या एकाचा नंबर दिला.
अगदी 5 मिनिटात रिक्षाने हे सर्पमित्र येऊन अगदी जाता जाता ओळखीच्या नातेवाईकाकडून लाडूचा डबा कलेक्ट करून पुढे निघून जावं तसं सापाला लहान पाणी बाटलीत घालून घेऊन गेले.वर 'घाबरू नका.साधा बिनविषारी कवड्या साप आहे.भिंतीवर चढता येणारा एकमेव साप.कधी दार उघडं राहून आत आला असेल.खिडक्या तुम्ही चांगल्या बंद केल्या आहेत.तिथून नाही आला.' सांगून गेले.
(भिंती आणि छत चढणारा तो महागुरू साप.आणि आम्ही याला लाकूड फळ्या,चादर घडी टाकून थांबवत होतो.अज्ञानात सुख असतं म्हणतात ते हेच.)
'पण यापुढे येणार नाही म्हणून काय करावं लागेल?'
'पॅनिक होऊ नका हो.आला की मला बोलवा.साप मारू नका.तुमच्या सोसायटीत मी घोणस आणि नाग पकडलेले आहेत.परवा एका नागाला cpr पण दिला मी.'
(इथे मला बरेच प्रश्न पडले.असेल बुवा.नागाला चेस्ट मसाज दिला असेल.बहुतेक साप लोकांना ओठ नसल्याने माऊथ टू माऊथ दिला नसावा.)
(हा बघा कवड्या महाराजांचा व्हिडिओ.व्हिडिओ बघा.टेबलखालची धूळ बघू नका.तिथे काहीतरी होतं त्याच्या मागची धूळ आहे ती.या चॅनल वर काहीही अपडेट येत नाहीत.त्यामुळे लाईक सबस्क्राईब शेअर करू नका.केलं तर दात पाडेन.)
https://youtube.com/shorts/XdZkqkVjF8g?si=JqmSt20X6yD3Mk7D
असंच एक छान देखणं मांजर आमच्याकडे यायला लागलं. आम्ही त्याचं नाव अर्थशास्त्र ठेवलं.अर्थशास्त्र का, याला काही अर्थ नाही.त्यावेळी आमच्याकडे घरातला एक मेंबर अहोरात्र एका ca चा शेअर्स चा चॅनल बघायचा.त्याचा सुप्त परिणाम असेल.अर्थशास्त्र आलं, आता आजूबाजूला पाली, कोळी कमी होतील अशी आशा होती.म्हणून आम्ही तिला दूध द्यायला लागलो.एक भुरा बोका तिला भेटायला पण यायला लागला. पण ही मांजर अशी शिष्ठ की दूध आणि पोळी दिली तर नुसतं दूध शोषून पोळीचे तुकडे तसेच ठेवून निघून जायची.मारी बिस्कीट ला तोंड लावून नाक उडवून नको म्हणून निघून जायची.शिवाय शी करायला मात्र हक्काने यायची.(ती मागच्या वेळी शी करणारी कुत्री मांजर ती ही नव्हे.ही वेगळी.तिची सवय मोडली.आता ही नवी.)परत एकदा फिनेल, नीम फिनेल असे लेप टाईल्स ना चालू झाले.मग अर्थशास्त्र मॅटरनिटी प्लॅनिंग साठी आमच्या वॉशिंग मशीन मागे जागा शोधायला लागली.तेव्हा मात्र आम्ही दूध देणं बंद केलं आणि तिला हाकलून द्यायला लागलो.हल्ली मांजरी काहीही खात नाहीत.मांजरी उभ्या आणि शेजारी वरून पाल फिरत असते.उंदीर रात्री यायचे तसे येतात.मांजरांना कोणीतरी हे समजावून सांगण्याची गरज आहे की त्यांच्या मूळ कि परफॉर्मन्स इंडिकेटर्स नुसार त्यांनी उंदीर आणि हे सर्व प्राणी अधून मधून खाणं अपेक्षित आहे.
या सर्व घोळात आमच्या घरी एक घूस यायला लागली.कोकोपीट,भाज्या देठ, कंपोस्ट कल्चर टाकलेल्या भरलेल्या प्लास्टिक कुंड्या उलट्या पाडणे, माती खणून ठेवणे असे भीतीदायक उद्योग चालू झाले.शिवाय उंदीर,घूस,बेडूक नामक बुफे डिनर खायला धामण नामक खादाड प्राणी येण्याची शक्यता वाढते.उंदराच्या वड्या आणून त्या काजू कतलीच्या तुकड्यावर चिकटवून इकडे तिकडे टाकून ठेवणे हा नवा उद्योग झाला.तुकडे गेलेले होते.पण घूस येत जात असल्याचे पुरावे पण दिसणं बंद झालं नव्हतं.घुशीने खणलेले खड्डे मी रोज नव्या दमाने बुजवून किंवा त्यात रोपं लावून तिचा पोपट करतेय. घूस तिकडे तिच्या व्हॉटसप वर 'एक रंगीत कपडे घातलेला राक्षस येऊन माझं बांधलेलं घर पाडून जातो' अश्या भावनिक पोस्ट टाकत असेल.कालच्या काजू कतली चे तुकडे आणि वरच्या वड्या गायब आहेत.आणि आम्ही 'उंदीर एकदा खाऊन,मरतात बाहेर जाऊन' ची वाट बघतो आहे.
| समाप्त |
सगळ्यात महत्वाचं म्हणजे
सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीपीआरने नाग रिव्हाईव्ह झाला तर?
<<<<<
चांगलंय की मग! नागीण रूप बदलून बदला घ्यायला येणार नाही.
हो, ती काजूकतलीच समोर होती.अजून बड्डे लोग म्हणजे केशर वाली होती.अगदी एकच छोटी वडी 4 तुकडे करून वापरली..दुसरा ऑप्शन खमंग भजी तळून त्याला
असले रॉयल ऑप्शन्स स्वतः उंदीरप्रजातीनेच दिले असावेत बहुधा. वडीच खाऊन मरायचं आहे तर सोबत चांगलंचुंगलं खाऊन मरू.... केसर काजूकतली पाहून घूस/ उंदीर 'केसरा सरा' म्हणाला असेल का मनात?
<<<
तुम्हा लोकांना कठीण 'दृष्यावरून गाणे ओळखा'देऊन बरेच महिने लोटले
<<<<< याची वाट पाहते. कधीही कठीण दृगाओ येऊ शकतं म्हणून मी अजून बॉलिवूडातली नाती आणि त्यांचे लेटेस्ट स्टेटस यांचा ट्रॅक ठेवून आहे.
केसरा सरा
केसरा सरा
@श्रद्धा नाग रिव्हाईव झाला तर नागिण जाऊ दे, त्याला कुठे माहित असणारै की सर्पमित्र त्याला सीपीआर देतोय? त्याने बायो ऑप्शनला टाकलं असेल तर? त्याला ‘माय बॉडी, माय रुल्स’ वाटलं तर? किंवा तो कडोंमपच्या नगरसेवकांचा चेला असेल तर?
अजून बॉलिवूडातली नाती आणि त्यांचे लेटेस्ट स्टेटस यांचा ट्रॅक ठेवून आहे.
>>> सांग बघू वीर पहाडिया आणि त्रिशला कपूरचं कनेक्शन….
बॉलीवूडची नाती
बॉलीवूडची नाती
अ ची गर्लफ्रेंड जी आता ज्ञ ची बायको आहे, तिने ब शी घटस्फोट घेऊन क पासून झालेल्या मुलाचा ताबा ड शी लग्न करताना ब च्या चौथ्या बायकोच्या तिसर्या पतीकडे गेला आहे आणि इ शी लग्न करताना त्याच्या दुसर्या बायकोची मुलगी आता तिच्याकडून फ कडे गेली, त्या दुसर्या लग्नाच्या तिसर्या नात्यातल्या मुलाची हिरॉईन आता आठव्या लग्नाच्या चौथ्या बायकोची मुलगी आहे.
सापाला CPR
सापाला CPR = 😀
धमाल !
बादवे! अर्थशास्त्र कॅलिको
बादवे! अर्थशास्त्र कॅलिको जमातीतले आहे का?
मला साधेच भारतातले जिंजर कॅट
मला साधेच भारतातले जिंजर कॅट वाटतेय अर्थशास्त्र.
नेहेमीसारखाच धमाल आणि
नेहेमीसारखाच धमाल आणि खुसखुशीत लेख. वेलकम बॅक अनु ....
केसरा सरा
केसरा सरा
सांग बघू वीर पहाडिया आणि
सांग बघू वीर पहाडिया आणि त्रिशला कपूरचं कनेक्शन….
<<<<<< मला वीर पहाडिया आणि अंशुला कपूरचं कनेक्शन सांगता येईल. त्रिशला कोण आहे?
मीच रॉंग कनेक्शन केलं म्हणजे…
मीच रॉंग कनेक्शन केलं म्हणजे…
अरे काय धमाल करतायत
अरे काय धमाल करतायत प्रतिसादात सुद्धा!
अर्थशास्त्र हे नाव अशक्य आहे!
'उंदीर एकदा खाऊन,मरतात बाहेर
'उंदीर एकदा खाऊन,मरतात बाहेर जाऊन' हे उंदरासाठी झाले. काजू कतली खायला घातल्यामुळे "एकादशी दुप्पट घुशी" असं झालंय त्या घुशींबाबत.
वॉव अनु ईज बॅक सापाने भाग
वॉव अनु ईज बॅक
सापाने भाग पाडलं तुला कॉपी राईट मांडायला आफ्टर उंदीत घुशी 

मांजरांना कोणीतरी हे समजावून सांगण्याची गरज आहे की त्यांच्या मूळ कि परफॉर्मन्स इंडिकेटर्स नुसार त्यांनी उंदीर आणि हे सर्व प्राणी अधून मधून खाणं अपेक्षित आहे.>>> खूप हसले. मला मांजर हे खुपच युजलेस असा प्राणी वाटतं काही म्हणजे काही उपयोग नाही अगदीच.. बेसिक उंदीर पकडत नाही.. षी.
अर्थशास्त्र हे नाव अशक्य आहे!>>> +१००
उंदीर एकदा खाऊन,मरतात बाहेर
उंदीर एकदा खाऊन,मरतात बाहेर जाऊन
<<<<< काजूकतली'वर' मरत असतील, (वडियुक्त) काजूकतली'मुळे' नव्हे!
La घूस - हमें काजूकतलीकी घूस देने की कोशिश की जा रही है!
एकादशी दुप्पट घुशी
एकादशी दुप्पट घुशी
काजूकतलीकी घूस
>>>
बाकी उंदरांना काजू कतली
बाकी उंदरांना काजू कतली म्हणजे फारच रॉयल ट्रीटमेंट झाली नाही का? की आतापर्यंत इतकी घूस शेफारली आहे की असलं काही रॉयल आमिष दिल्याशिवाय वडीला तोंड लावत नाही?
कबर्या रंगाची माऊ आहे ती.
चितकबर्या रंगाची माऊ आहे ती. मला केतूला दान करण्याचे वस्त्र आठवले. असेच चितकबरे, चित्र विचित्र रंगांचे वस्त्र केतूला, दान करतात.
मस्त खुसखुशीत लेख!
मस्त खुसखुशीत लेख! नेहमीप्रमाणे!
कवड्या साप कसा असतो ते कळले. नागाच्या सीपीआर चं कुतुहल मात्र जागं झालं.
लिहीत रहा!
धमाल चालू आहे इथे!!
धमाल चालू आहे इथे!!

नव्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी।
श्रद्धा, तुला विचारपूस मध्ये एक नंबर दिला आहे, तो बघ.इथे विचारपूस मध्ये नोटिफिकेशन येत नाहीत, त्यामुळे कोणीच बघत नाही, मी पण नाही.आता सगळ्यांनी गृहपाठ केल्यासारखं जाऊन बघून या स्वतःच्या आणि इतरांच्या विचारपुशी(नाहीतर घरात येतील घुशी!)
केसरा सरा काय?
उंदीर घुशींना एकदम मोहक खाणे देणे ही अतिशय जुनी परंपरा आहे.उद्या घुशीला टोफू नी ओट नी लाल भोपळा, सॅलड, शेवगा पिठलं,किन्वा नी झुकीनी देऊन ती आनंदाने येणार आहे का?किमान ज्याला आपण मारणार आहे त्याच्यावर तरी हे अन्याय करू नयेत बा.मस्त वडापाव, पिझ्झा तुकडा, एखादा चीज केक, समोसा यावर ठेवाव्या विष वड्या.
उंदीर घुशींना एकदम मोहक खाणे
उंदीर घुशींना एकदम मोहक खाणे देणे ही अतिशय जुनी परंपरा आहे.>>> माझे सासरे तव्यावरची गरम पोळी तूप घालून ठेवतात पिंजर्यात :कपाळावर हात: गर्रमगर्रम पोळीचा खमंग वास + त्यावर घातलेलं तूप वितळलं की मऊसूत दिसणारी ती पोळी बघून घरच्याच मेंबरांची भूक चाळवते तिथे घुशीचं काय होय
धमाल लेख
धमाल लेख
अनु इज बॅक.
साप व्हिडीओ डेंजर आहे की.
कवड्या तसा शांत साप आहे असे ऐकले आहे.
घोणस लै चिडका साप.
सापाचा cpr एकदा nat geo वर पाहिलाय.
Pipe असतो तो तोंडात टाकतात त्याच्या.
आता फार डिटेल आठवत नाही.
एकच नंबर, मी अनु शैली तला खास
एकच नंबर, मी अनु शैली तला खास लेख...
मज्जा आली
मस्त लेख..!
मस्त लेख..!
लेखाचे शीर्षक लक्षवेधी आहे.
विडिओ पाहिला. शेवटी किती चपळपणे उडी मारली आहे सापाने... विषारी असो किंवा नसो पण अंगाला घाम फुटायला साप हे नाव पुरेसं आहे माझ्यासाठी...!
हे बघा आमचे वृद्ध डीबॉट आणि
हे बघा आमचे वृद्ध डीबॉट आणि घाबरलेले सावध अर्थशास्त्र
https://youtube.com/shorts/n9FLAkL9hLM?si=tGLDuIWXU6VhPKKZ
भारी रेकॉर्डिंग आहे!
भारी रेकॉर्डिंग आहे!
सगळे प्रतिसाद पण धमाल आहेत.
सगळे प्रतिसाद पण धमाल आहेत.
नवीन व्हिडिओ बघते.
Pages