Submitted by दत्तात्रय साळुंके on 12 July, 2026 - 01:34
पुन्हा मळभ दाटते
पुन्हा भरते आभाळ
सांज होता भणाणतो
झोंड वात रानोमाळ
तप्त झालेल्या भुईचा
चातकासम कल्लोळ
गळा दाटून झाडात
चूप झालेला कोकीळ
मोर थकला नाचून
गेले मेघही वाहून
दाटे दुकाळाची छाया
डोळे आलेत भरुन
रित्या नदी पात्रामध्ये
टिटवी टीव टीवते
अशा अंधारल्या राती
कोण आर्त गीत गाते
तहाणले ओठ किती
त्याची गणती जमेना
आग तन मनी अशी
काही केल्यानं क्षमेना
पानं लपेटून अंगी
कुणी आळवी पावसा
मंदिरात, मशिदीत
कोण बोलले नवसा
जात,धर्म भेदाभेद
असे मिटले एकाकी
एक एक थेंबासाठी
आता सारे चातकची
रंग पाण्याचाही असा
ज्यात मिसळले तसा
त्याचे कर्मही निर्मळ
क्षुधा शमविणे वसा
© दत्तात्रय साळुंके
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे. आवडली.
मस्त आहे. आवडली.
झोंड वात रानोमाळ इथे "वात" च्या ऐवजी "वारा" शब्द चालेल का?
वात का नको? वारं , वात, वारा
वात का नको? वारं , वात, वारा छानच की. अर्थ एकच.
सामो
सामो
नाझ्या अल्प मति प्रमाणे त वृत्तात बसत बाहीये,
दसा सांगतीलच म्हणा.
सुंदर .. .
सुंदर .. .
नेहमीप्रमाणे छान जमलीयं कविता..!
सामो
सामो
केशवकूल
रुपालीताई
अनेको धन्यवाद
केशवजी ही कविता अष्ठाक्षरी आहे. त्यामुळे वारा, वात दोन्हीही चालेल.
सुंदर !!
सुंदर !!
सुंदर कविता. अर्थवाही आणि
सुंदर कविता. अर्थवाही आणि वृत्तबद्ध. दोन्ही बाजूंनी सुरेख जमून आली आहे. भाव अगदी मनाला भिडले.
एकच छोटी सुचवण. 'रित्या नदी पात्रात' ह्या ऐवजी 'रित्या नदी पात्रामध्ये' असे केले तर? म्हणजे आठ अक्षरे नेमकी बसतील.
कुमार सर.
कुमार सर.
हर्षल
खूप धन्यवाद
हर्षल योग्य बदल सुचवलात . धन्यवाद