तो जेव्हा सकाळी जागा झाला तेव्हाच त्याला काहीतरी विचित्र वाटत होते. जेव्हा तुमचा रक्तदाब वाढतो/कमी होतो तेव्हा किंवा आदल्या रात्री पार्टीत कुवती पेक्षा ज्यादा ढोसली असेल तर जसे वाटते तसे त्याला वाटत होते. हा हॅंगओवरचा प्रकार असावा का ? हॅंगओवर! चांगला चपखल शब्द आहे. हॅंगओवरच होता पण कुठल्या नशेचा?
काहीतरी गोंधळ झाला आहे. पण गोंधळ नक्की काय आहे ह्यावर नेमके बोट ठेवता येत नव्हते. जास्त विचार करण्यात अर्थ नव्हता. जसजसा दिवस उगवेल तसतसे डोक्यातले मळभ मावळेल.
जरा बाजूला नजर गेली तर शेजारी मालती झोपली होती. . तिला झोपेतून जागे करणे बरोबर नाही. बिचारी दिवसभर किती राबते. सगळ्यांची किती काळजी तिला. सगळ्यांना उठवायचे, त्यांच्यासाठी ब्रेकफस्ट बनवायचा. एकेकाला आंघोळीला धाडायचे. मुले अशी खट्याळ कि अंघोळीची टाळाटाळ.हजार कारणे सांगतील. डब्यासाठी पोळीभाजी बनवायची. डबे भरायचे. झोपू दे बिचारीला.
तो हलकेच पांघरूण बाजूला करून बेडरूमच्या बाहेर पडला. विचार करत होता कि चहा करून बाल्कनीत जाऊन मस्त बसावे. हा अर्धा तास आपला हक्काचा. नाही तरी स्वतःसाठी वेळ कुठे मिळतो मुळी?
बेडरूम मधून बाहेर पडला तेव्हा त्याला पहिला धक्का बसला.
बेडरूम मधून बाहेर पडल्यावर पॅसेज असायला पाहिजे होता पण इथे तर किचन दिसत होते. आपण चुकुन मित्राच्या फ्लॅट मध्ये झोपलो होतो का? एक मिनिट, एक मिनिट. घाई नको. आपण अजून झोपेत आहोत बहुतेक. किंवा स्वप्न बघत असणार . लेट मी रिमेम्बर. काल रात्री आपण कुठे होतो? पोलिसांना बघून आपण पळायला का लागलो होतो? ऑ आता पोलीस कुठून आले इथे? त्याने पुन्हा एकदा डोके हलवले. पोलीस वगैरे डोक्यातून हाकलले. मी सभ्य गृहस्थ आहे, कुटुंब वत्सल का कायसे म्हणतात तसा. माझा स्वतःचा फ्लॅट आहे. गाडी आहे. पोलीस यहासे चाले जाव, गेले. बॅक टू किचन. आधी चहा. नंतर फ्लॅटचा प्लान कसा कुणी बदलला त्याचा विचार करू.
चहा करायला घेतला तर कशाचा कशाला मेळ नाही. गॅस लावायला गेलो तर लायटरचा पत्त्या नाही. जरा शोधला.
मिळाला, एक लहानसर पातेली बघितली आणि चहाचे आधण ठेवले. साखरेचा म्हणून डबा उघडला तर त्यात बेसन मिळाले. काय चालले आहे? आता फक्त चहावर भरवसा होता.
"अरे तू किचन मध्ये काय खुडबुड करतो आहेस? आणि ते चहाचे भांडे नाहीये. मला उठवायचे ना. चल हो बाजूला,
तुला चहा पाहिजे ना? मी करून देते."
त्याने वळून बघितले तर एक स्त्री उभी होती.
तो आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला. माझ्या फ्लॅटमध्ये एक अनोळखी स्त्री! स्त्री यहा मत आना. चले जाव यहासे.
"आणि आपण कोण?" स्वतःवर नियंत्रण ठेवणे किती कठीण आहे.
"मी कोण? अरे वा, मी मिसेस कुलकर्णी. तुमची आय मीन तुझी बायको. कालची अजून उतरली नाही वाटतं?"
हिला काय सांगावे बरे? कि माझ्या फ्लॅटमध्ये जागी झाली आहे का मी तिच्या फ्लॅटमध्ये जागा झालो आहे?
कोण कुणाच्या फ्लॅटमध्ये खर तर स्वप्नामध्ये अनाहूत घुसला आहे. मिसेस कुलकर्णी तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये लुडबुड करत आहात.
मान ना मान, मै तेरी वहिदा रहमान, हे वाक्य आठवले.कुठे वाचले होते? किती प्रश्नचिन्हे झाली?
मिसेस कुलकर्णी. बनवा बनवा तुम्हीच चहा करा. नाहीतरी बाईच्या हाताचा चहा पिऊन बरीच वर्षे झाली होती.
तो चुपचाप खुर्चीवर बसला.
मिसेस कुलकर्णीनी दोन कप चहा बनवाला होता.
"मिसेस कुलकर्णी..." त्याने बोलायला सुरवात केली असेल नसेल तेव्हढ्यात
"बोला मिस्टर कुलकर्णी." ती स्त्री उद्गारली.
"मिसेस कुलकर्णी, मी मिस्टर कुलकर्णी..."
"नाहीये असच म्हणायचे आहे ना. चहा प्या चहा. म्हणजे शुद्धीवर याल. येशील."
"तुम्ही ऐकून घ्याल का जरा? मला काही सांगायचे आहे,"
"त्या नाटकाची स्टोरी? माहित आहे मला. तुम्ही झोपी गेलेला जागा झाला बघितले आहे का? अजून एक सिनेमा आहे, गॅसलायटिंग. आपण दोघांनी बघितला होता. त्यात नवरा बायकोला वेडा ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. असा काही प्रकार नाही ना. चहा प्या. गार होतोय."
ही तर ऐकायलाच तयार नाही.
डिश मध्ये ब्रेड टोस्ट आणि लोणी होते, टेबलावर लोणी फासायला सुरी होती. सुरीचा उपयोग काय? सुरीने काय होणार. सुरा पाहिजे, बटन चाकू. कर्र करून उघडणारा..असा पोटात खुपसून फिरवायचा. खेळ खतम. पोलिसांच्या शिट्ट्या, पळ म्हाद्या पळ. पतली गली से...
"विचार कसला करतो आहेस. ऑफिसला जायचे आहे ना."
तो एकदम भानावर आला. पतली गली मधून फ्लॅटमध्ये परत आला. फ्लॅटमध्ये कसे सुरक्षित आणि समाधानी वाटत होते, ही सुरक्षितता तो आयुष्यात प्रथमच अनुभवत होता. हे ही जीवन काही वाईट नव्हते. बट यू बी वेरी केअर फुल. प्रत्येक वाक्य सावध पणे बोलायला पाहिजे. अगदी मोजकेच आणि कमी बोलायला पाहिजे.
"हम."
हा कुलकर्णी रोजच्या रोज दाढी करत असेल काय? तसे असेल तर मलाही दाढी करायला पाहिजे. बघुया. सामान मिळाले तर करू नाहीतर चाट मारू.
"तुझे कपडे काढून ठेवले आहेत. उशीर झाला आहे. अंघोळ करून घे."
व्वा. किती काळजी घेणारी बाई आहे!
माझे लग्न झाले आहे का. झाले असेल तर आता ह्या क्षणी माझी बायको काय करत असेल.
बाथरूम मध्ये सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे होत्या. टूवाल होता, आतले कपडे होते. पायजमा होता.
एका क्षणी त्याला वाटले कि इथून पळून जावे. पण पळून पळून जाणार.कुठे शक्य आहे कि कदाचित आज उद्या थोडी आठवण येईल, काही मार्ग दिसेल. पण तो पर्यंत समजा ओरिजिनल कुलकर्णी परतून आला तर? तेव्हाचे तेव्हा बघता येईल. आणि अशीही एक शक्यता असेल कि आपणच ओरिजिनल कुलकर्णी असू तर? कुणी स्वतःपासून पळून जाऊ शकेल काय? पळून जायची कल्पना सध्यातरी ड्रॉप.
अजून त्याला परिस्थितीवर ग्रिप आली नव्हती. अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची होती. तो कोण होता, ती स्त्री त्याला आपला नवरा मानत होती, एकूण संभाषणातून त्याला एव्हढे समजले होते कि ही वाज सपोझ टू बी मिस्टर कुलकर्णी आणि ती जी कोण होती ती त्या कुलकर्ण्याची बायको होती. पुढचा प्रश्न हा कुलकर्णी कुठल्या ऑफिसात काम करत असावा?
आहा कुलकर्ण्याचे वॅलेट मिळाले तर,
त्याने भराभर टेबलाचे खण उचकाटायला सुरवात केली. नशीब वरच्याच खणात कुलकर्ण्याचे वॅलेट मिळाले!
आत त्याचे पॅन कार्ड होते, हजार एक रुपये होते, डेबिट कार्ड होते, आणि काही बिझीनेस कार्ड होती.
केशव एस कुलकर्णी. MBA
मॅनेजर ( HRD)
आणि मग ऑफिसचा पत्ता आणि टेलेफोन नंबर मोबाईल नंबर इत्यादि.
डेबिट कार्ड मिळाले . पण पिन? जर लक असेल तर पिन पण चालत येईल.
तो ऑफिसात जायला तयार झाला,
मिसेस कुलकर्णी मोबाईल आणि गाडीच्या चाव्या घेऊन पुढे आल्या.
"नेहमी प्रमाणे मोबाईल विसरलास. आणि आज काय पायीपायी जाणार आहेस का?"
तो घुटमळला. काय उत्तर द्यावे असा विचार करत होता,
"उम्म, नाही आज टॅक्सी करून जाईन."
"मीच सांगणार होते. थांब मी टॅक्सी बुक करते."
टॅक्सी लगेचच हजर झाली. बहुतेक जवळपास उभी असावी.
"ओके. मी जातोय,"
"टेक केअर, बाय. एक मिनिट, तुझे डेबिट कार्ड दे. मला थोडे पैसे काढायचे आहेत. माझा बॅलन्स..."
"ओके ओके पण पिन लक्षात आहे? नाहीतर मागच्या वेळेसारखे व्हायचे."
"तू बदलला नसशील तर xxxx! पण तुझ्याकडे पैसे आहेत ना? "
"आहेत, हे घे."
गुड. एकेक तिढा आपोआप उलघडत चालला होता.
ऑफिसात त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याची केबिन होती. फक्त ती शोधावी लागणार होती. पण ते काही खास अवघड नव्हते.
नखाते, जहागीरदार, भोसले, कुलकर्णी!
तो सराईतपणे केबिन मध्ये शिरला. आता पुढे काय?
समोर इंटरकॉम होता. त्याने हॅंडसेट उचलून रॅंडम बटन दाबले.
कुठेतरी रिंग वाजली, कुणीतरी फोन घेतला, "अरे केशव कसा आहेस रे बाबा?"
"सॉरी दादा! राँग नंबर लागला वाटत!"
कोणतरी अघळपघळ बोलणारा माणूस होता.
इंटरकॉमशी खेळत असताना एका तरुणीने केबिनमध्ये एन्ट्री मारली. ही कोण?
"हा मिसेस लोबोचा अर्ज आहे. तिला मेडीकल ग्राउंडवर रजा वाढवून पाहिजे आहे. सध्या ती मॅटर्निटी लीववर आहे. ह्या पंधरा तारखेला ती संपेल. हे इथे डॉक्टरचे सर्टीफिकेट जोडले आहे." ती तरुणी बोलत होती.
"तुला काय वाटतं रजा वाढवून द्यावी कि नाही?" काही तरी बोलायचे म्हणून तो बोलला.
"सर, मला वाटतं कि द्यायला पाहिजे. बायकांचे काय काय प्रश्न असतात. सरतेशेवटी विदाउट पे होणार आहे. पण आधी तिच्या सेक्शन हेडचे ओपिनिअन घ्यायला पाहिजे."
"लाव फोन."
असा जनरल फेकाफेकीत दिवस कसाबसा ढकलला.
लोकांची पण कमाल आहे. सगळे लोक एकसे एक टाकणे टाकत होते. कवायत करत करत तीस तीस वर्षे इथे पाट्या टाकत टाकत म्हातारपणाच्या संध्याछायेत विरत जाणार.
मधेच केव्हातरी बायकोचा फोन आला.
"अरे त्या कांबळे नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरचा फोन होता. " पोलिसाचे नाव काढल्यावर तो सतर्क झाला. अस्वस्थ झाला. हे पोलीस माझ्या मागे का लागले आहेत? अखेर त्यांनी माझा माग काढलाच. "जरा लवकर घरी ये. कांबळे स्वतः येऊन तुला घेऊन जातील."
अखेर ह्या दिवसाचा शेवट असा एन्काउंटर मध्ये होणार होता तर. पळून जावे का? पळून पळून कुठे जाणार.
पण एक गोष्ट समजत नाही कुठल्या अपराधीपणाच्या भावनेचे ओझे आहे हे? असा मी काय गुन्हा केला आहे?
"मला घेऊन जातील? पण का? मी काय गुन्हा केला आहे?" त्याचा आवाज थोडा कातर झाला असणार.
"तू टेंशन घेऊ नकोस. कुणातरी क्रिमिनलची ओळख परेड आहे. जास्त बोलले नाही."
हिला काही टेंशन नाही मग मलाच का. ती बरोबर आली तर तेव्हढेच बरे. तिच्या उपस्थितीत तरी पोलीस बरे वाईट वागणार नाहीत.
त्याने ताबडतोब "दुकान" बंद केले. जाता जाता त्या तरुणीला ( तिचे नाव काय असावे?), " हे बघ मला घरी जायला पाहिजे. कोणी कॉल केला तर सांग तसे आणि नोंद करून ठेवशील."
रिक्षा करून तडक घरी निघाला. लकी कॉलनीत घर होते हे त्याने नोट केले होते सकाळी. तिथपर्यंत जाऊ आणि मग शोधून काढू. खाली फार्मसीचे दुकान होते.
फ्लॅटमध्ये इन्स्पेक्टर वाट पहात बसला होता. तो पुरता जाळ्यात फसला होता. मिसेस कुलकर्णीनी चहा केला होता.
घशाला कोरड पडली होती. चहा वाज मोस्ट वेलकम.
एकदम त्याची ट्यूब लाईट पेटली. एकूण हा मिसेस कुलकर्णीचा डाव असावा. त्या बाईला संशय आला असणार. तिने ह्या कांबळ्याला हाताशी धरून मला ट्रॅप करण्याचा प्लान केला असणार! म्हणे टेंशन नका घेऊ. कॅट अॅंड माउस गेम चालला आहे इथे. अरेरे, आपल्याला ही बाई ओळखता आली नाही.
शक्य तितकी बेपर्वाई आवाजात आणून त्याने कांबळ्याला विचारले, "इन्स्पेक्टर, म्याटर काय आहे?"
कांबळे अगदी कोवळा होता. नुकताच कुठे ट्रेनिंग घेऊन आला असावा. चेहऱ्यावर तो टिपिकल माजोरी भाव अजून आला नव्हता.
"मी सांगतो," तो हळूवार आवाजात म्हणाला, " मी माझी हॅट इथे ठेवली तर चालेल ना. (ठेव रे ठेव घर तुझेच आहे.)
मिस्टर कुलकर्णी, काल रात्री आम्ही एका अट्टल गुन्हेगाराला म्हणजे म्हाद्या लोखंडेला पकडायला गेलो होतो. त्याला आवाज दिला तर त्याने शानपनाने सरेंडर व्हावे कि नाही. पण नाही, उलट आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करायला लागला. आम्ही तरी काय करणार. परिणाम जो व्हायचा तोच झाला. तरी आम्ही त्याला वाचवायचा खूप प्रयत्न केला. तो पडल्यावर लगेच गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पण नाही वाचला."
"ओके पण ह्यात मी कुठे आलो?"
"तीच तर खरी गंमत आहे. (गंमत?), त्यामुळेच मला इथे यावे लागले. मरता मरता हा म्हाद्या लोखान्डया काय म्हणतो कि मी खुनी नाही. मी लोखंडे नाही. माझे नाव आहे केशव कुलकर्णी मी मॅनेजर आहे, अखेरपर्यंत त्याने हीच रट लावली. असे बडबडत त्याने प्राण सोडला. आम्ही आज दिवस भर सगळी रेकॉर्ड चेक केली.आमची शंभर टक्के खातरी आहे कि तो म्हाद्याच होता. सवालही नही उठता. पण काय आहे ना त्याने तुमचे नाव घेतले म्हणून आम्हाला चौकशी करणे भाग आहे न. केस कशी वॉटर टाईट पाहिजे असे माझे ट्रेनिंग सांगते. आमचे म्हणणे एव्हढेच आहे कि तुम्ही एकदा येऊन त्याला म्हणजे त्याच्या डेड बॉडीवर नजर फिरवा, पहा कुठेब काही धागा लागतो आहे का. नाहीच काही असणार. मग आपण कागद बनवू. सॉरी, तुम्हाला त्रास देतोय पण काय करणार माझाही नाईलाज आहे."
कांबळे बोलत होता तेव्हा मिसेस कुलकर्णी त्याच्याकडे निरखून बघत होत्या. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होत्या. त्याने चेहरा जेव्हढा निर्विकार ठेवता येईल तेव्हा ठेवला.
"इन्स्पेक्टर, मी तयार आहे."
"मलाही यायचे आहे," कुलकर्णी बाईं मधेच बोलल्या. तिच्या मनात काय आहे ह्याची त्याला कल्पना आली होती.
"बाईसाहेब , तुमच्याचेने ते बघावे असे मला वाटत नाही. ह्या उपर तुमची मर्जी." कांबळे असेच म्हणणार. त्यालाही गर्दी नको असणार.
"नाही म्हणजे मी ह्यांची पत्नी आहे. ही काय भानगड आहे हे मलाही बघायचे आहे."
हॉस्पिटलकडे जाताना सगळे गप्प बसले होते. प्रत्येकाचे विचारचक्र नीरनिराळ्या दिशेने धावत असणार.
हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर कांबळेने सर्व सोपस्कार पूर्ण केले. ते येणार आहेत याची आगाऊ कल्पना त्यांना होती. त्यामुळे वेळ कमी लागला.
हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याबरोबर ते प्रेतागारात गेले. प्रेतागारात मरणाची थंडी होती, मृत्यूचा उग्र वास वातावरण उदास करत होता. कर्मचाऱ्याला रोजचेच असावे. त्याने सराईतपणे एक पेटी खसकन ओढली. आत एक डेड बॉडी "झोपलेली " होती. उजव्या पायाच्या अंगठ्याला टॅग होते. ते वाचून तो सगळ्यांकडे बघून म्हणाला, "हा पहा तुमचा महादेव लखोबा लोखंडे."
"कुलकर्णी साहेब, पहा नीट पहा. काही ओळख पटतेय का?" कांबळेने पाठीला हात लावून पुढे जायची खूण केली.
तो आता म्हाद्याला फेस टू फेस बघत राहिला. मृत होऊन आता जवळपास वीस एक तास झाले होते. पण अजूनही डेड बॉडीच्या चेहऱ्यावर आश्चर्य, गोंधळ, हताशा, भीती, असे संमिश्र भाव स्पष्ट दिसत होते. त्याला अगदी भडभडून आले. त्याचे आणि आपले काही अलौकिक नाते होते का? नियतीचे खेळ कुणाला उमजले. नियतीने फासे फेकले आणि कुणाचा तरी जीव गेला. कुणाला थोडीतरी काळजी आहे का?
"बिचारा." तो एव्हढेच म्हणू शकला. स्वतःस्गी पुटपुटला.
सगळे सोपस्कार पूर्ण होता होता रात्रीचे नऊ वाजले. घरी परतल्यावर दोघांनी आंघोळी उरकल्या. मिसेस कुलकर्णींनी चहा केला. तेव्हढाच त्याने कसाबसा पोटात ढकलला.
रात्रीचे दहा साडे दहा वाजले असावेत. तो दिल बहलाने के लिये टीवी बघत बसला होता. विचार करत होता,उद्या इथे राहायचे नाही. तो सीरिअल खुनी जे काय म्हणत होता त्याचा अर्थ कसा लावायचा. त्याचा चेहरा त्याच्या दृष्टी समोरून हलत नव्हता, तो माणूस म्हणजे त्याच्या आत्म्याचे प्रतीबिंब होते, त्याच्या भयानक मृत्युला कोण जाबाबदार? बिचारा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याने माझे नाव का बरे घ्यावे? ओह नो. ते नाव माझे नाही. मी केशव कुलकर्णी नाहीये, मी हा नाही ,तो नाही, मी कोणीही नाही. हा जो खेळ चालला आहे त्याला जो कोणी जबाबदार आहे ,,, त्याच्या तोंडात गलिच्छ शिव्या आल्या, विसरून जा. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल काळजी चिंता का बरे करावी.
कुणीतरी बी जे थोमसन चे गाणे वाजवत होते,
aindrops keep fallin' on my head
And just like the guy whose feet are too big for his bed
Nothin' seems to fit
Those raindrops are fallin' on my head, they keep fallin
'Cause I'm never gonna stop the rain by complainin'
Because I'm free
Nothin's worryin' me
खरी आणि अवघड परिक्षा तर आता होणार होती.
टीवी बंद करून तो बेडरूम कडे गेला.
मिसेस कुलकर्णी कुठले तरी मासिक वाचत होत्या..
तिने हसून त्याच्या कडे कराक्ष टाकला, "झाला टीवी बघून?"
त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले.
"मी ड्राइंग रूम मधल्या सोफ्यावर झोपणार आहे. एखादे पांघरूण असेल तर मला द्या प्लीज."
"देते पण त्या आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, तू कोण आहेस? तू खचितस केशव कुलकर्णी माहीस, हे मला प्रथम दर्शनीच समजले होते. कारण मिस्टर कुलकर्णीच्या डाव्या हाताला सहा बोटे होती. तुझ्या डाव्या हाताला सगळ्यांप्रमाणे पाच बोटे आहेत."
"हा विषय तुम्ही काढलात हे एक प्रकारे बरे झाले. माझ्या मनावरचे मणामणाचे ओझे उतरले, आभारी आहे, माझे मलाच ठाऊक नाही कि मी कोण आहे, मी काय उत्तर देणार. कदाचित आपण मॉर्ग मध्ये पाहिलेली डेड बॉडी माझीच असावी. मी त्या खुनी लोखंडेचा आत्मा आहे असे राहून राहून मला वाटत आहे, ह्या गिल्टी कॉन्शसचे ओझे घेऊन मी इथे राहू शकत नाही. मी उद्या सकाळीच निघून जाईन."
"मिस्टर हूएवर यू आर, तुम्हाला काहीच समजले नाही तर! आत्मा हा नेहमीच शुद्ध आणि पवित्र असतो. तो मेमरी मुळे झाकोळला जातो. आणि ह्या मेमरीज एपिजेनिटीक असतात. मला तुमच्या वागण्यात काहीही गैर वाटले नाही. तुम्ही मनात आणले असते तर तुम्ही केव्हाही माझा गैरफायदा घेऊ शकला असता."
नंतर गूढ स्मित करत म्हनाल्या, "मिस्टर कुलकर्णीच्या डाव्या हाताला सहा बोटे नव्हती. मिस्टर कुलकर्णी काळे होते का गोरे होते, उंच होते का बुटके होते, नकटे होते का नाकेले होते, जाड होते का काटकुळे होते मका काडीचीही कल्पना नाही."
"त्तू जसा इथे उपरा आगेस तसेच मीही इथे उपरी आहे, मी तुझ्या प्रमाणे आजच सकाळी इथे आले आहे. आपण सगळेच इथे उपरे आहोत, माणसाची ओळख ही त्याच्या संचित आठवणीनी होते. ये, आपण दोघे स्वप्नाच्या दुनियेत जाऊ आणि नवीन मेमरीज बनवूया. "
"मिसेस कुलकर्णी ...."
"मिसेस कुलकर्णी नाही, म्हणजे आहे पण तुम्ही मला मालती म्हणाल तर..."
AI वापरून लिहिलेय का?
AI वापरून लिहिलेय का?
उत्सुकता म्हणून विचारले.
मधे मधे चुकीची अक्षरं आली आहेत.
शर्मिला.
शर्मिला.
नाही माझ्या कडे AI नाही.
काहीतरी अलग प्रोब्लेम आहे . आता TEXT फाईल बनवून एडीट करतो.
एडीट करून पुन्हा सबमिट केली आहे.
मस्त झालीये कथा
मस्त झालीये कथा
कुलकर्णी नावइतक्या वेळा वाचून बरे वाटले
केकूंची गोष्ट वाचायला मजा
केकूंची गोष्ट वाचायला मजा येते, पण इथे चक्क केकूंचीच आहे.
प्रवासात वाचायला बरी आहे. अध्यात्म नाहीये. E= mc², positive, negative energy नाहीये, टाइममशिनही नाही. क्रमश: आहे का?
कारण मला मालतीच म्हणा या वाक्यावर गोष्ट संपलीय.
मस्त आहे. आवडली. म्हाद्या
मस्त आहे. आवडली. म्हाद्या लोखंडेच्या अंगात केकुचा आत्मा ही अदलाबदल कशी झाली देव जाणे पण झाली खरी…
मस्तच, एका दमात वाचले. गोष्ट
मस्तच, एका दमात वाचले. गोष्ट आवडली.
"तू जसा इथे उपरा आहेस तसेच मीही इथे उपरी आहे, मी तुझ्या प्रमाणे आजच सकाळी इथे आले आहे. आपण सगळेच इथे उपरे आहोत, माणसाची ओळख ही त्याच्या संचित आठवणीनी होते. ये, आपण दोघे स्वप्नाच्या दुनियेत जाऊ आणि नवीन मेमरीज बनवूया. " >>
हे या कथेचे सार. खूप छान लिहिलं आहे.
शर्मिला. किल्ली, Srd, साधना
शर्मिला. किल्ली, Srd, साधना, उबो
तुन्हा सर्वांचे अबेक आभार!
मस्त झालीये कथा.
मस्त झालीये कथा.
छान झालीय कथा, आवडली.
छान झालीय कथा, आवडली.
एक विनंती - तुमची विनोदबुद्धी खूप भारी आहे, एखादी विनोदी कथा वाचायला आवडेल तुमची!
आबा
आबा
माझ्या सगळ्या कथा विनोदीच आहेत!
https://www.maayboli.com/node/81986
आणि ही
https://www.maayboli.com/node/82974
वाचली नसेल तर वाचा.
वाचली असेल तर पुन्हा वाचा.
आबा तुम्ही "generation gap" आणि "फर्मी साहेबाची ऐसी तैसी" ह्या कथा वाचल्या आहेत काय? नसतील तर तर मला पुन्हा टाकाव्या लागतील.
Enjoy!
मजा आली वाचनेगेमीसाय
मजा आली वाचायला
टवणे सर अनेक आभार.
टवणे सर
अनेक आभार.