उतारा
--------
सर्व भाषांना। मराठीचाच उतारा
चढतच राहिल्या तर मोजोनी मारा पैजारा
माझी माय आगळी वेगळी
जरतारी लुगडं अन
नथ ठसक्यात घातली
माझ्या मायेच्या बेचाळीस बोली
रंगत त्यांची
कुणाला न कळली
माय माझी रांगडी रांगडी
काळ्या फत्तरात कोरली
जणू अष्टभुजा
दुर्गा सजली
माझ्या मायेच्या मुखी
वेदशास्त्रे,गीता भरली
ज्ञानोबा तुकोबांनी दिले ग्रंथ हाती
माझ्या मायेच्या हाती
शिवरायांची भवानी
खड्ग तिने उगारले
जुलुमी सत्ते वरती
अशी माझ्या मायेची
महती किती स़ांगू
प्रेमळ तिची दृष्टी
सर्वांवर सारखी
अरुण कोर्डे
©®
खूप छान.
खूप छान.