माझा पहिला लेख -ज्योतिषशास्त्र कि अंधश्रद्धेचे मूळ?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 29 June, 2026 - 09:42

प्रास्ताविक-
ज्योतिषशास्त्र कि अंधश्रद्धेचे मूळ? हा माझा पहिलाच लेख साप्ताहिक माणूस 21 एप्रिल 1984 साली प्रकाशित झाला तो माझा कॉलेजजीवन संपताना विद्यार्थि दशेत असलेला लेख असल्याने ते विचार व शैली वा बौद्धिक (अ)परिपक्वता ही त्यावेळेला साजेशी आहे. बीएस्सी ला abstract algebra हा 3rd semister चा विषय पुन्हा राहिल्याने माझे शैक्षणीक वर्ष वाया गेले होते. बीएस्सीच्या पहिल्या वर्षात ज्योतिषाच्या नादापायी माझी टर्म कॅन्सल झाल्याने ते ही वर्ष वाया गेले होते. अशा रितीने माझी बीएस्सी ही पंचवार्षिक योजना होती.
ज्योतिषाचे उद्योग स्वस्थ बसू देत नव्हते. होस्टेलला छंद म्हणून मित्रांच्या पत्रिका तयार करुन भाकिते वर्तवत असे. हा लेख प्रसिद्ध झाल्यावर पहिलाच लेख माणूस सारख्या दर्जेदार साप्ताहिकात प्रसिद्ध झाल्याचा आनंद होताच. होस्टेल संपल्यावर मी कॉट बेसीस वर राहात असे. लेख प्रसिद्ध होईपर्यंत माझी बीएस्सी ची परिक्षाही झाली होती. मग त्यानंतर गाशा गुंडाळून मी परत गावी आलो. पुढे काय करणार हे माहित नव्हते. पारंपारिक शेती, घर व प्रतिष्ठीत व प्रस्थापित घराणे असल्याने व मी एकुलता एक असल्याने पुढे खायचे काय हा प्रश्न नव्हता. आजोबा गावचे पाटील होते नंतर चुलते पाटील होते, वडील हायस्कूल चे मुख्याध्यापक होते. आजोबा गेल्यावर नोकरी सोडून तेही शेती पाहू लागले होते. त्यामुळे काही नाही जमले तर आपली प्रस्थापित असलेली शेती पहायची हा धोपटमार्ग होताच.मी डॉक्टर होउन गावातच घरी दवाखाना टाकावा व सोबत परंपरागत शेती पहावी ही त्यांची इच्छा. नुसत्या शेतीवर अवलंबून रहाण्यात आता काही अर्थ नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हे आता संपले आहे. त्यानुसार मला त्यांनी गावी दहावी झाल्यानंतर पुण्यात टिळक आयुर्वेद कॉलेज ला BAM&S कोर्सला प्रोव्हिजिनल प्र्वेश मिळवून दिला. तेथील प्राचार्य त्यांच्या परिचयाचे होते. मला त्यावेळी त्यातले काही कळत नव्हते. पण त्यावर्षी BAM&S च्या अभ्यासक्रमात मॉडर्न मेडीसीन हा भाग काढून टाकला व तो कोर्स शुद्ध आयुर्वेद BAMS असा केला. अभ्यासक्रमात मॉडर्न मेडिसीन न शिकवणे हे त्यांच्या दृष्टीने अयोग्य होते. म्हणून माझा BAMS चा प्रवेश रद्द केला व मी पुढे 11 वी सायन्सला गेलो. मी काही हुशार नव्हतो त्यामुळे बारावी नंतर मला मेडीकल ला प्रवेश मिळाला नाही व बी एस्सी च्या लाईनला गाडी गेली व कसेबसे एकदाचे बीएस्सी झालो. गावी आल्यावर convocation form मधे सर्टिफिकेट माझ्या घरच्या पत्त्यावर पाठवावे असे लिहिले होते. पण ते आलेच नाही. पण तेवढ्यात माझे दुसरे चुलते जे पोलिस वायरलेस मधे होते त्यांनी तांत्रिक पदाची जाहिरात आल्याचे सांगितले व अर्ज करुन पुण्याला परिक्षेला आलो व सिलेक्ट झालो. पात्रता दहावीचीच होती त्यामुळे डीग्री सर्टिफिकेटची गरज नव्हती. मला शिवाजीनगर पोलिस मुख्यालय इथे पोस्टिंग मिळाली ट्रेनिंग नंतर होते. पगार चालू झाला. मला या माणूस मधील लेखाचे तद्दन 25 रुपये मानधन त्यावेळीच मिळाले. म्हणजे ती माझी पहिली कमाई. त्याचा आनंद म्हणून पाषणरोड वरील पोलिस वायरलेस मुख्यालयातील ट्रेनिंग होस्टेल वर दोन लंडन पिल्सनर बिअर घेउन मित्रांसोबतआनंद साजरा केला. त्यावेळी बारा रुपयात बिअर मिळायची .तर अशी ही माझ्या पहिल्या लेखाच्या मानधनाच्या पहिल्या कमाईची कथा.

ज्योतिषशास्त्र की अंधश्रद्धेचे मूळ?
प्रकाश घाटपांडे
( साप्ताहिक माणूस 21 एप्रिल 1984)

बर्‍याच लोकांना प्रश्‍न पडतो की, ज्योतिष- शास्त्रावर विश्‍वास ठेवावा की नाही? काही
लोक वरून म्हणतात की, ज्योतिष- शास्त्रावर आमचा विश्‍वास नाही; पण आतून मात्र
ज्योतिषाचा सल्ला घेतल्या- शिवाय प्लॅन आखत नाहीत. मुळात ज्योतिपशास्त्र हा एक
वादातीत्‌ मुद्दा आहे. ज्योतिषशास्त्रात तथ्य आहे का नाही? असल्यास कितपत तथ्य आहे ?
ज्योतिषशास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत आहे की, ग्रह हे मानवावर किंबहुना सजीवसृष्टीवर
परिणाम करतातच.

“ग्रह बिचारे त्यांच्या मार्गाने फिरत असतात, ते कसला तुमच्यावर परिगाम करणार
बोडक्याचा ?’ असं जर कुणी म्हटलं तर आमची कडवी ज्योतिषप्रेमी मंडळी म्हणतात की, चंद्र व
सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाचा भरती-ओहोटीवर परिणाम होतो हे तर सिद्धच झाले आहे.
वेड्याच्या मानसिक स्थितीवर अमावास्या-पौर्णीमेचा परिणाम होत असतो, तर तुमच्या शरिरा-
तल्या plasma वरसुद्धा चंद्राचा परिणाम हो्त असतो. डॉ. अमके अमके, एवढे विद्वान गृहस्थ,
पण तेसुद्धा शस्त्रक्रिया करताना चांगला दिवस शोधून मगच करतात.तुम्ही कालची पोरं -
जरा कुठं कॉलेज मध्ये जायला लागले की, लागले अक्कल पाजळायला.

कुणी ज्योतिषशास्त्राच्या * शास्त्र ’ या शब्दावर आक्षेप घेतला तर आमची ही मंडळी म्हणतात,
’ तुमच्या सायन्समध्ये तरी सगळा प्रश्‍नांना उत्तरं कुठं आहेत ? एकाच मत हे, एकाचं मत ते.
तुमचा एखादा phenomenon फेल जायला लागला को, लगेच अपवाद . म्हणून मोकळे होता किवा
गृहीत असे घेता को, ते फेल जाणार नाही. हे manipulation नाहो तर काय आहे?

बरेच लोक म्हणतात ज्योतिषशास्त्रात तथ्य आहे; पण त्याला मर्यादा आहेत. हे विधान ते
त्यांच्या अंनुभवांवरून करतात. त्यांना त्यांच्याबाबतीत किवा त्यांच्या संबंधितांबाबत कुणी तरी
वर्तवलेली भविष्य considerably खरी ठरलेली असतात. अर्थात काही (बरीचशी) चुकलेली पण
अस- तात. ते म्हणतात, ‘केनेडींच्या खुनाचं भविष्य अमक्यानं वतंवलं होतं.’ तरुण वर्गातले म्हण-
तात,अमिताभच्या अपघाताचं भविष्य पं.व्यास यांनी वंतंवलं होतं. काहीजण हिरोशिमावर बांब
पडणार आहे हे एका बाईला आरशात दिसलं होतं, असं एका मासिकात वाचल्याचं सांगतात. आणखी
काही मासिकांत अतींद्रिय सामर्थ्याच्या जोरावर वर्तवलेली भविष्य खरी कशी झाली यावर
लेख. असतो. काही मंडळी व्यवहारातील उदाहरणं देऊन ती खरी कशी झाली हे सांगतात आणि
मग विचारतात एवढं असून ज्योतिष शास्त्रात तथ्य नाही असं तुम्ही कसं म्हणता ?

राजकीय ज्योतिषवाली मंडळी तर भन्नाटच असतात. त्यांची भाषाच अशी संदिग्ध असते को,
काही झालं तरी त्यांची भविष्यं खरी ठरतात. काही लोक ज्योतिप- शास्त्रावर उलटसुलट
चर्चा करून उत्तर वाचकांवरच सोपवतात. काही भविष्य चुकलं तर म्हणतात, “ राजकीय
मंडळींच्या जन्मवेळेत फरक असतो. त्यामुळे कधी कधी , उत्तरात तफावत येते व भविष्य चुकू
शकते.’ असं म्हणून आपल्या मनाचा तथाकथित मोठेपणा दाखवतात व आपलं बरोबर आलेलं भविष्य
बरोबर जोडतात.

मी पूर्वी पुणे विद्यार्थी गृहात होणार्‍या ज्योतिषशास्त्रावरच्या व्याख्यानांना जायचो; पण
तेथे होणारी चर्चा ही नवीन काही देणारी नसते व पोस्टमार्टेम असतं. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची कुंडली घेऊन त्यावर कुंडलीतले ग्रहयोग व त्या व्यक्तीचे आयुष्य कसे निगडित
आहे व एकमेकांना कसे बरोब्बर जुळते हे दाखवायचा प्रयत्न असतो. एखाद्या वेळेला कुंडली व त्या
व्यक्तीचे जीवन यात तफावत असेल तर या कुंडलीत शनि-मंगळ केंद्रयोग जरी असला तरी गुरु हा
इतका powerfull आहे को, त्या कंद्रयोगावर मात करून ही व्यक्ती अमक्या पदाला
पोहोचली !’ तेथे भागवत नावाचे गृहस्थ यायचे. ते या पोस्टमार्टेमवर आक्षेप घ्यायचे. ते
म्हणायचे ’तुम्हाला कुंडलीवर ठामपणे काही सांगता यायचे नाही. ’ त्यांच्या वृद्धत्वाचा आदर
करून ही ज्योतिष विज्ञान मंडळी आपली चर्चा चालू ठेवायचे.

एकदा कुणी तरी त्यांना एक कुंडली दिली व विचारले, या व्यक्तीचे जीवन कसे असेल ? दिसायला
कुंडलो अतिसामान्य दर्जाची होती. त्यावरून बर्‍याचजणांनो सांगितले की ही व्यक्ती सामान्य
आहे. फार फार तर कसंबसं स्वतःच घर आहे. काहींनी सांगितले, ही व्यक्‍ती अल्पशिक्षित आहे व
कुठे तरी कष्टाचे किरकोळ कास करून उपजीविका करते. नंतर कुंडली देणार्‍या व्यक्‍तीने खरी
परिस्थिती सांगितली, “ही व्यक्‍ती उच्चशिक्षित असून चांगल्या पगारावर नोकरीला
संयोजकांनी चुकलं तरी यातूनच आपल्याला शिकायचे आहे. अपयश हो यशाची पहिली पायरी आहे,
असं म्हणून चर्चा पुढे चालू ठेवली.

एकंदरीत ज्योतिष विज्ञान या शब्दाचं interpretaion दिसलंच नाहो.
एकदा सकाळ मधे ज्योतिष संस्थेसाठी अभ्यासू उमेदवार पाहिजेत अशी जाहिरात आली. मी Application टाकून दिलं. त्याला
त्यांचं उत्तर आलं को, वावा! तुम्ही विद्यार्थी असून तुम्हाला यात रस आहे. तुम्ही काय काय
वाचलेत ते कळवा. इतकी इतकी मेंबर शिपचो फी. त्यावर मी त्यांना उत्तर पाठवले,असं असं मो वाचलेलं आहे. Astrology ची Astro- physics शी
संबंध असलेली शास्त्रीय चर्चा मला दिसली नाही. . ’ तुम्ही वर्तमान काळ जर व्यवस्थित सांगू शकत नाही तर भविष्य काय सांगणार? असं जर तुम्हाला
कुणी विचारले तर तुमच्याकडे मुद्देसूद उत्तर आहे. का ? पुर्वीचे ज्योतिषी होते त्यांचं ज्ञान
त्यांच्याबरोबरच लयाला गेलं. त्यामुळं या विषयाला गूढपणा आला वगैरे कॉमेंटस्‌ असलेल्या
या पत्राला त्यांनी उत्तरच दिलं नाही, पोस्ट बॉक्सवर जाहिरात होती त्यामुळे व्यक्तिश:
भेटताही आलं नाही. त्यांनी कदाचित हा मूर्ख मनुष्य भाहे असं म्हणून फाडून फेकून दिलं असेल.

नंतर पुण्यात Astrological world convention झाले. ते तीन दिवस चालले होते, डॉ.
पुरंदरे मुंबईतले प्रख्यात डॉक्‍टर हे प्रमु्ख आकर्षण होते. त्यांना Man of the convention
असा किताबही मिळाला, ते म्हणाले, "मो पूर्वी ज्योतिषशास्त्राच्या विरोधी होतो; पण
नंतर’ मी ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला सुरवात केली व मला असं आढळून आले की, यात काही तरी
तथ्य आहे. मी प्रसूतीसाठी आलेल्या बाईच्या कुंडलीचा अभ्यास करून प्रसूति केव्हा व कशी होईल
याचं निदान करतो. यातून मला ज्योतिषणास्त्राची प्रचीती आली, ” त्यांनी यात संशोधन
व्हाव अशी इच्छा व्यक्त केली,
नंतर माझ्या मनात विचार आले ; पण यातून विधायक असे काय़
निष्पन्न होतं ? मी माझ्या शंका एका कागदावर लिहून काढल्या. समजा तुम्हाला एखाद्या
व्यक्‍तीची कुंडली ( अचूक जन्मवेळेसहित ) अगदी जन्मचेळच्या स्पष्ट ग्रहांसहित आणि
तुम्हाला विचारले खालील प्रश्‍न. तर तुम्हाला ठामपणे अचक उतर देता येईल का?

१) ही व्यक्‍ती स्त्री आहे का पुरुष?

२) जिवंत माहे का मृत?

३) विवाहित आहे का अविवाहित ?

४) ही सध्या कुठल्या क्षेत्रात काय काम करीत असली पाहिजे ?! हिचा भूतकाळ काय?

५) तुम्ही भविष्य कुठल्याही पद्धतीने बघा; पण उत्तर सारखंच यायला पाहिजे. निरयन पद्धतीत
चतुर्थ स्थानावरून मातृसुख बघतात. तर सायनपद्धतीत त्याच स्थाना वरून पितृसौख्य बघतात. सायनपद्धत बरोबर का
निरयनपद्धत बरोबर ? सामान्य जातकाला त्यात रस नसतो.

६) जुन्या ज्योतिषांचो पुस्तके सायन पद्धती वरुन का बेतलेली असतात ? निरयन पद्धत ही
परंपरागत असूनही ? उदाहरणार्थ द्वारकानाथ नारायण राजे यांची पुस्तके.

मो हे शंकावजा मुद्दे घेऊन convention हा गेलो. तेथे * Astro analysis centre’ चे
अभ्यंकर नावाचे ज्योतिषी गृहस्थ होते. त्यांनो या प्रश्नांची सगळी उत्तरं देता येतात असं
सांगितलं. कशी ते मात्र सांगितलं नाही. Cosmic radiations चा मानवावर परिणाम
होतो. अल्फा, बीटा, गॅमा हो radiations सत्व, रजस, तमस या गुणांशी साम्य दाखवतात.
15% tolerance ने सगळया प्रश्‍नांची उत्तर देता येतात, त्यांच्या * विश्‍वताराचक्र’ च्या
स्टॉलवर एक जाहिरात होती. माणिकप्रभू भारतीय विद्या संशोधन केंद्राची

Astrology?

Foolishness of fortune lovers! It is fake Mr. Impatient ! Please wait we
will prove that it is science

पण convention मधे ज्योतिषशास्त्राच्या आक्षेपांना तकंशुद्ध उत्तरे व स्पष्टीकरण
दिल्याचे माझ्या स्मरणात नाही. (माझ्या अनुपस्थित दिलीt असतील तर मला माहीत नाही;
पण त्याला प्रसिद्धी मिळाली नाही हे नक्की)

ज्योति्षशास्त्रामुळे अंधश्रद्धा कमी व्हायच्या ऐवजी वाढायला लागते का? हा मुद्दा
महत्त्वाचा आहे. शास्त्री-पंडित वगैरे मंडळी सांगतात, तुम्हाला शनिचा त्रासआहे. अमका मंत्र
म्हणा. शनिची उपासना करा, साडेसातीत शनिचे स्तोत्र म्हणा. अन्यथा शनिची कुषादृष्टी जर
वक्र झाली तर तुमचे काही खरं नाहो अशी गर्भित धमकी त्यात असते. म्हणूनच
बाजीरावरोडवरच्या शनिच्या देवळात दर शनिवारी जबरदस्त गर्दी असते. शनीविषयी एक
भोतीयुक्‍त आदर असतो. मनुष्य जेव्हा संकटात सापडतो तेव्हा तो आपल्या तत्त्वांना फाटा
देतो. मी जर २१ प्रदक्षिणा घातल्याने माझ्या मनास शांती मिळत असेल, माझे संकट
टळत असेळ तर मी का या गोष्टी करू नये. माझी मानसिक शक्‍ती वाढते. तुम्ही याला
अंधश्रद्धा म्हणा नाहो तर काहीही म्हणा, असं उच्चशिक्षित मनृष्यही म्हणतो. आपल्यालाही
मग त्यात गैर वाटत नाही.

तुमच्या घराला मुंजाचा त्रास आहे. त्याची शांत करा. माझा मुलगा त्रास देतो. काय करू?
दररोज जेवायच्या वेळेला बाहेर दहिभात ठेवा. पांढरे बुधवार करा. चतुर्थीचा उपवास करा वगैरे
गोष्टी ज्योतिषी सांगतो आणि जातकमंडळीही ते करतात,

कारण तो संकटात ईतका त्रस्त झालेला असतो की, झक मारत करतो. घरच्यांसाठी तरी
कराव लागतं. बरं ही तथाकथित टीकाकार मंडळी काही मला मदत करायला येणार नाहीत
तेव्हा सांगितल्याप्रमाणे करावं हे उत्तम.

दुसरे खूळ म्हणजें मंगळाचं. मंगळ आहे का नाहो हे ठरवण्यात सुद्धा वाद. एकाने गोदावरीनदीच्या
काठी असलेल्यांनी मंगळ- दोष मानू नये अश्या आशयाचा मूळ संस्कृत श्लोक देऊन, मंगळदोष मानू नये
असा निर्वाळा दिला . काहींच्या मते मंगळावर शनिच्या दाब आहे का नाही हे पहाणे इष्ट
असते. काहींच्या मते मुलीला मंगळ असला तरी मुलाच्या पत्रिकेत आयुष्ययोग चांगला असला तर
काही हरकत नाही. काहींच्या मते मंगळाला मंगळाचीच मुलगा / मुलगी बघितली पाहिजे नाही
तर वैवाहिक आयुष्याची तो दाणादाण उडवतो. अमक्याने मंगळ न बघितल्याने त्याचे काय
झाले हे सांगितले जाते. त्यामुळे बिचारा वधुपिता ज्योतिषाच्या सांगण्याला मान्यता देतो. कारण
कुठल्याही पित्याचो अशी इच्छा नसते की आपल्या मुलीचं वाईट व्हावं.

अशा अनेक गोष्टींमुळे ज्योतिषशास्त्र सामान्य मनुष्याला संभ्रमात टाकते. ज्योतिषशास्त्रामुळे
पसरणाऱ्या अंधश्रद्धांना जबाबदार कोण? ज्योतिषशास्त्रावर जर टीका केली तर ही मंडळी
चिडून म्हणतात, " तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नाहीतर नका ठेवू तुम्हाला
जेव्हा अनुभव येतील तेव्हा कळेल ज्योतिषशास्त्राचे महत्व. नंतर पस्तावाल पण तोपर्यंत वेळ
निघून गेलेली असेल. ’ काहो म्हणतील. अर्धवट ज्ञान ना, उथळ पाण्याला खळखळाट फार |
काहीतरी लिहायचे अन प्रसिद्धी मिळवायची.

ज्योतिषशास्त्र हे जर ’ Perfect science आहे, तर आंतरराष्ट्रीय घडामोडीत सल्लागार म्हणून एखाद्या व्यक्तिला न नेमण्यात सरकार भली मोठी चूक करत आहे.
ज्योतिषशास्त्रावर निष्फळ चर्चा करण्यापेक्षा ज्योतिष शास्त्रावर आक्षेप घेणार्‍यांचे मुद्दे लक्षात घेउन त्या गोष्टीवर मुद्देसूद,
तर्कशुद्ध असंदिग्ध, शास्त्रीय आधार असलेली उत्तरे तोंडावर फेकून त्यांची तोंडे गप्य करावीत मग त्यांनी, हे. Perfect Science आहे असं
म्हणण्याचा आग्रह “धरला तर त्यात काही गैर नाही. ते जर science असेल तर या गोष्टीवर संशोधन होणे आवश्यक आहे. त्याआगोदर मान्यता मिळणं आवश्यक आहे. नाही तर आतापर्यंत जे
चा्लत आलंय तेच चालत राहणार अशोच अंधश्रद्धा राहणार, त्याचबरोबर असेच अनुत्तरीत आक्षेप येत राहणार.
---------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users