जंगलभ्रमंती : "पन्ना की तमन्ना .. भाग १ "आठवण गेल्या वर्षी उन्हाळ्यातली ...

Submitted by विजनवासि on 27 June, 2026 - 13:45

पन्ना म्हंटले की आपल्याला शाळेच्या भूगोलात शिकवलेल्या हिऱ्याच्या खाणी आठवतात.. नाहीतर इतिहासात शिकलेल्या बुंदेलखंड आणी त्याचा पराक्रमी राजा छत्रसाल! यानेच बाजीराव पेशव्याना मस्तानी दियी थी!
पण पन्ना ची खरी श्रीमंती आहें तिथले टायगर रिजर्व नॅशनल पार्क आणी पन्ना पासून केवळ वीस किलोमीटर वर असलेली अद्भुत मंदिरे.. खजुराहो!!
मे महिन्यात दरवर्षी करतो ती जन्गलाची सफर याखेपी पन्ना आणी खजुराहो ला ठरवली... आणी तिथेच बहुतेक माशी शिंकली!!! पुण्यात त्या रात्री (25मे ) अक्षरशः कोसळून पाऊस पडला.... आणी पावसातच आम्ही 26 मे भल्या पहाटे जबलपूर चं विमान पकडलं.... जबलपूर ला पण मळभ असलेलीच हवा होती... आमचा धीर सुटायला लागला होता... कारण पन्ना त पण पाऊस पडला तर??पाऊस पडला की जंगलात सायटिंग ची वाट लागत्ये... हे जागतिक सत्य आमच्या समोर वाकुल्या दाखवत होते.. पण जसजसे इन लँड घुसू लागलो.. तशी तशी हवा उष्ण ते अति उष्ण!!म्हणजे पन्नात मध्ये डायरेक्ट 42-43" च डिग्री होते... आणी अशी काही उमस भरली हवा,की...भरित करायला भाजून झालेल्या वांग्याला वाफ घालवायला झाकून ठेवल्यावर कसे वाटत असेल तसें आम्हाला वाटत होते ..
या तपश्चर्येला फळ येवो असा नवस करत पहिली सफारी केली... लोक आजबाजूला टायगर सायटिंग ची रसभरीत वर्णने करीत होते.. आमच्या लक्कन हललेल्या हृदयानां लवकरच कट टू साईज करत पहिले पाच तास सकाळी सफारी.. बाबाजीचा **टा! शून्य सायटिंग!!! नुसतं अख्या मंडला गेट रेंज ला गरगरा चकरा... कुठे फॉस कॉल्स तर कुठे अजिबात थंड शांतता! साहजिक च... भग्न मनस्क, उकाड्याने पीडीत ,संध्याकाळी आम्ही,एखादा ब्रेक अप झालेला हिरो,त्याच्या एक्स च्या लग्नाला, ज्या उत्साहात जाईल साधारण तेवढ्या उत्साहात सफारी ला निघालो...पुन्हा नो कॉल नो मूव्हमेंट.. आशेची धुगधुगी कायम ठेवायला, केन नदीच्या समोरच्या किनाऱ्यावर पाण्यातून निघून निथळत निघालेली वाघीण दिसली लांब. केन नदीची बोटीतून फिरून जान पहेचान पण झाली. लक्षात च आले.. पन्ना चे जंगल अतिशय सुंदर आहें... नदी नाले, पाणवठे, दलदल, गर्द झाडी, खुरटी झाडी, बांबू बेटे, बोल्डर्स, गवताळं माळ रान.. सगळ्या प्रकारची टेरेन्स इथे मुबलक प्रमाणात आहेत...जर का प्राण्यासाठी स्वर्ग जर कुठे असेल तर.."गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त; हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त’!!."....असं असूनपण... आमचा मात्र पहिला डाव भुताचा झालाय...
स्वर्ग आहें की नाही माहिती नाही... पण देव आहें हे नक्की! कारण तो नसता तर दुसरा दिवस असा उगवला च नसता... धडधडत्या काळजाने दुसऱ्या दिवशीच्या सकाळी साडेपाच वाजता सफारी सुरु केली आणी उजाडता उजाडता च गाडी धमाल पळवत केन किनारा टेकडी गाठली.... 141 नावाची वाघीण आणी 663 नावाचा वाघ एकत्र मजेत ऊन खात बसले होते.... एकदम इत्मिनान सें. पॉसिबली मेटिंग पेअर... 515006794_9970681312987379_7368862305369952640_n.jpgआणी प्रत्यक्ष तसेच काहीतरी करायचा त्यांचा इरादा पण दिसत होता... पण आम्ही प्रायव्हशी घालवली त्यांची(आम्ही सगळे पुढल्या जन्मी गुरखा होणार आणी रात्र रस्त्यावर घालवणार..या पापासाठी!!)बराच वेळ थांबून मिष्टर वाघ बाजूच्या टेकडीवर निघून गेला... वाघीण मात्र अतिशय शांत,आस्ते कदम आमच्या समोरून केन नदीत उतरली... पाणी पितानाचा तिचा हा फोटो आणी खाली निवळशंख पाण्यात तिचेच प्रतिबिंब!!! काय सुरेख शॉट मिळाला...! फ्रेम करावी असा..514639712_9970719336316910_2537355898610883200_n.jpg
तिथून सुटलो ते गाडी दौडवत पोहोचलो अजून आत आत चढण चढत रंगा घाट परिसरात.... तिथे रंगींत दगड, पाषाणात अडकून वर आलेले, खूप आहेत.. म्हणून रंगा घाट!!! तिथे हे दोन मेल वाघ... एक पाण्यात... एक बांबूच्या बेटात! दोघे साधारण अडीच तीन वर्षे वयाचे आहेत एकत्रच राहतात... आणखी एक पण आहें.. तो दिसला नाही (तो तिसऱ्या दिवशी दिसला).... ह्यांना किलर बॉइज म्हणतात .... नाही... उगाच नाही.... एका बाईला गवत कापताना मारली आहें यांनी... आणी ऐशी टक्के खाल्लेली मिळाली ती!!! कसले मस्त टगे आहेत...एकदम डूsड!514369416_9970722739649903_819872152201238029_n.jpg
त्यांना बघताना हा इंडियन पिट्टा नावाचा पक्षी मिळाला. सुंदर निळा.. नवरंग म्हणतात याला...इतका चंचल आणी मायग्रेटरी असल्या ने दुर्मिळ.... फोटो मिळायला वाटी भर रक्त आट वणार....!514534118_9970716339650543_8742790580296776578_n.jpgबाजूच्या गवतात हे चिंकारा किंवा इंडियन गॅझल!! किती नाजूक आणी सुंदर आहेत.... "यांच्या वरून च गझल हा शब्द उर्दूत आलाय... नजाकतीची चाल आणी नीमबाज आंखे!! " ये गजाल सी निगाहे, ये शबाब ये अदाए... तू तो खुद हीं एक गझल हैं.. तुम्हे क्या गझल सुनायेs!!"732036328_27172634715698771_7689755273982146037_n.jpg
सुंदर तर हीं रानडुक्कर आई पण आहें.. तिची छोटी छोटी पोरे घेऊन धमाल सुटली समोरून.. जेमतेम कॅमेऱ्यात पकडली!! pana2.jpgहे अस्वल पण.. कशे गं गोड बघतेय.....गुंडुबुवा!514253519_9970740819648095_4401227563341506344_n.jpg
देवाचे आभार... हे सुंदर क्षण नशिबात घातल्या बद्दल!514473065_9970849049637272_4259505251496169381_n.jpg514255407_9970682229653954_4169612175692448871_n.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अय्योय्यो !!
पन्ना भारीच निघालं.
बाकी तो कलिंजर किल्ला तिकडेच कुठे आहे ना? आणि चित्रकूट { कार्वी }?
खजुराहो पाहिलं आहे दोन दिवस. मस्तच.

@srdजन्गल भ्र्मन्ति हा मुख्य विशय असल्याने पन्ना आणि खजुराहो वरच आम्ही फोकस केला .. पुढच्या भागात येईलच ते ही

छान फोटो आणि वर्णन. वाघिणीचे पाण्यात प्रतिबिंब काय सुरेख आहे!!! फोटो स्पर्धेत पाठवा, नक्कीच बक्षीस मिळवाल.

. एका बाईला गवत कापताना मारली आहें यांनी... आणी ऐशी टक्के खाल्लेली मिळाली>>>>>>> ह्म्म वाघाने एकदा माणसाला खाल्ले की तो नरभक्षक होतो असे वाचले होते. इथे तसे सुदैवाने झालेले दिसत नाही.