आशा अमर...

Submitted by अनन्त्_यात्री on 25 June, 2026 - 06:19

माय मराठीचे पांग
त्यांनी परवा फेडले
उच्चारांची ऐसी तैसी
त्यांना कोणी ना रोखले

श्रद्धांजलीचा कागद
त्यात आधी होती भेळ
त्यात फॉन्ट होता छोटा
मग झाला थोडा घोळ

नको वैषम्य चुकांचे
फेडीन असेच पांग
माझ्या सोशिक भाषेची
आशा अमर, अभंग
~~~~~~~~~~~~~~~
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https:...

Group content visibility: 
Use group defaults