मन सध्या offline आहे

Submitted by मनिम्याऊ on 9 June, 2026 - 08:19

गेले काही दिवस प्रचंड मानसिक थकवा जाणवतो आहे. अनेक कामे करायची पेंडिंग आहेत पण अजिबात उत्साह नाही. अक्षरशः काहीही काम केलेले नाहीये. फक्त रोजचा स्वयंपाक करते आहे. एका पीएचडी च्या स्टूडेंटचे काम बाकी आहे. पण लॅपटॉप उघडायची इच्छाच होत नाही. फेब्रुवारी मध्ये शिलोंग ला एकटीच जाऊन आले. नॅशनल स्पेस सायन्स सिमफोसियम मध्ये माझा पेपर सिलेक्ट झाला होता. त्याचे प्रवास वर्णन लिहिण्याचे मनात आहे. एक नवीन रिसर्च proposal आहे. दोन तीन कथांचे बीज मनात आहे.
माझ्या ८२ वर्षीय मावशीने तिच्या डायऱ्या माझ्याकडे सोपवल्या आहेत गेल्या भेटीत. तिच्या लहानपणा पासूनच्या आठवणी १९४०s पासूनच्या लिहून ठेवलेल्या.. मनू, यांचे काय करायचे ते तू ठरव अशी खुली मुभा दिली आहे. काय करावं सुचत नाहीय. एका मैत्रिणीने तिनी लिहिलेले पुस्तक दिले आहे. ते पण अर्धवट वाचून ठेवण्यात आले आहे.
सध्या घरातील वातावरण बरे नाही. पण त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. तशी मानसिक रित्या यापूर्वी खंबीर असायचे. पण आता समजत नाहीय काय होतंय.

I am not planning anything. रिकामी बसून असते बऱ्याचदा. फोन पण बघत नाहीं टीव्ही रिचार्ज देखील केला नाही. रोज रात्री जेवणानंतर चालायला मात्र जाते. तेवढे regular सुरू आहे. त्यावेळी शेजारी पाजारी भेटतात. बोलले की बरे वाटते. सोसायटी मधल्या लहान मुलांची लाडकी आंटी आहे मी. त्यामुळे ते धावत येतात. तेव्हा mood upliftment होतो जरा. आणि मुलीचा शाळेचा अभ्यास घेते रोज. बस.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'भारत का दिल देखो' सीरिज मधली एखादी नवी रेसिपी येऊ द्या!
तुमच्या रेसिप्यांवर लिहितोच असं नाही, पण नेहेमीच्या साच्यातल्या नसल्याने आवडतात हे इथेच लिहितो.

माझ्याकडे सोल्युशन काही नाही, तुम्ही सूज्ञ आहात. मार्ग काढालच. गप्पा मारायला आवडत असेल तर या इथे गप्पा मारायला. तुम्ही बरंच काही करता असं दिसतंय, मला फक्त तुम्ही मातीतल्या रेसिपी करणार्‍या म्हणून ठाऊक आहात. अगदी लेख लिहिणे थोडं जास्त जबाबदारीचं आणि वेळ लागणारं असेल तर लेख नंतर लिहा, सध्या तुमचे अनुभव (मंडेन ही.... किंवा मंडेनच.. ) इ. लिहायला कुठलं वहातं पान बघा आणि आवडलं तर तिकडे या गप्पा मारायला. वाडा म्हणून एक पान आहे. हवा असेल तर पत्ता देऊ शकतो. नाही जमलं तर दुसरं पान बघा.

मनीं माऊ, ही फेज येते ग खूप वेळा. तू एकटी नाहीस या फेजमध्ये. माझी एक स्वतः डॉक्टर असलेली मैत्रीण कालच मला अगदी हेच म्हणाली.
A बिग hug to you.... लवकर पूर्वीची उत्साही आणि क्रिएटिव्ह माऊ बनशील ....
एक सुचवू का? तुझ्या जवळच्या डॉक्टरशी बोलून बघ. काहीतरी उपाय नक्की मिळेल.

^^नॅशनल स्पेस सायन्स सिमफोसियम मध्ये माझा पेपर सिलेक्ट झाला होता^^
खूप खूप मोठी achievement

हॉर्मोनल चेंजेसमुळे ही असं वाटू शकतं. कदाचित काही डेफिशियन्सीज असतील. ते ही चेक करुन घ्या. हीच कारणं असतील तर सप्लिमेंट्सने फरक पडू शकेल. त्यावर फार विचार न करता आहे तेच रेटून चालू ठेवणं, जे करायला आवडेल असं वाटतंय ते करुन जरा फरक पडतोय का हे बघणं. जसं की गार्डनिंग, नुसतंच बाजारात फिरणं/ शॉपिंग, मैत्रिणींना भेटणं वगैरे. जिमने काही फरक पडतोय का बघा.

सध्या घरातील वातावरण बरे नाही. पण त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. तशी मानसिक रित्या यापूर्वी खंबीर असायचे. पण आता समजत नाहीय काय होतंय.>>> सतत खंबीर राहण याचाही ताण येतोच की...डॉक्टराना भेटुन बघा, डेफिशियन्सी असु शकतात.

A बिग hug to you >> + १
वरती काही जणांनी सुचवलेय तेच मी पण सुचवेन. पूर्ण शारिरिक तपासण्या करुन घ्या. काही वेळा डी व्हिटामिन किंवा इतर सप्लीमेंट्सने फरक पडतो

फेजही असु शकते. तरी धनवन्ती यांनी लिहिल्या प्रमाणे नेहमीच्या डॉकना /गायनॅकना भेटुन सल्ला घ्या अद्याप नसेल केले तर. त्यांना काय सांगायचं नक्की असा प्रश्न पडत असेल तर इथे लिहिलंय तेच सांगा. त्यांच्या सल्ल्यानुसार टेस्ट्स् वगैरे.
काही शारीरिक हेल्थ इशूज नसतील तर आणि डॉक कडुन शारीरिक श्रमांना बंधन नसेल तर थोडी शारीरिक दमणूक होईल इतपत आवडीचं काहीही करा, घरच्या घरी व्यायाम, कुठलं काम वगैरे. हे इतर छंद , आवडीचे वगैरे व्यतिरिक्त. जिमला वगैरे गेलात तर उत्तमच. याने पण मनावर चांगला परिणाम होतो.
चांगल्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहा, विश्वासु असतील त्यांना मानसिक स्थितीची कल्पना द्या.

बिग हग!
डॉकना भेटा. शरीर थकते आणि मनही थकते. काही वेळा शरीरामुळे मनाला थकवा येतो तर काही वेळा मनामुळे शरीराला. घरातील परीस्थिती तणावाची असल्यास त्यानेही थकायला होते. बाहेरच्या जगातही तुम्ही बरेच काही जबाबदारीचे करत आहात असे दिसतेय. पूर्वी दोन्ही पातळींवर खंबीर राहून निभावून नेले असले तरी दर वेळी जमेलच असे नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. जमल्यास तुमच्या आतल्या वर्तुळातील मंडळींशी बोलून होम फ्रंटवर काय प्रकारची मदत मिळाल्यास तुम्हाला जरा विसावा मिळेल ते बघा.

बिग मिठी तुम्हाला.
होतं असं कधी कधी नाही करावं वाटत तरी ठीक आहे.
सर्वांनी वरती छान लिहिले आहे.
बोलावं वाटलं तर मी कान व्हायला तयार आहे.
..
एकदा b12, d3 तपासून बघा.
अभाव असेल तरी मरगळ येऊ शकते

तुमचे हटके रेसिपी, प्रवासवर्णन, कलाकृतींचे धागे, गणेशोत्सव स्पर्धा उपक्रमातील सहभाग हे बघून मायबोलीवरच्या मोजक्या चतुरस्त्र आणि उत्साही लोकांपैकी तुम्ही एक वाटता.. त्यामुळे ही नक्कीच एक फेज असावी. एका ब्रेक नंतर पुन्हा सारे काही आधीसारखे होईल किंवा नव्याने काही गवसेल. बाकी मायबोलीकर आहेतच सल्ले द्यायला Happy

सगळयांचे मनापासून आभार. इथे धागा काढल्यावर खरंच बरं वाटलं. मेडिकल चेकअप दरवर्षी ऑगस्ट महिन्यात करते. सगळे readings BP, शुगर, थायरॉईड नॉर्मल होते मागच्या टेस्ट च्या वेळी. B१२ आणि व्हिटॅमिन डी जरा जरा बोर्डरलाईन deficiency होती. औषध घेतले होते.

अमित यांनी म्हंटले तसं बरंच काही काही करत असते मी. Rather करायचे. मूळ विषय अर्थ सायन्स. नागपूर मधून ग्रॅज्युएशन आणि
पुणे विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. दोन्ही विद्यापीठांची बॅच टॉपर होते. गोल्ड मेडलिस्ट. पीएचडी केली आहे. रिमोट सेन्सिंग आणि satellite technology madhe. १२ varshe महाराष्ट्र राज्य सरकारच्या प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये रिसर्च advisor आणि प्रोजेक्ट सायंटिस्ट म्हणून कामं केला आहे. त्याआधी ICAR मध्ये 3 वर्षे इंटिग्रेटेड GeoSys (soil research) specialist होते. ISRO सोबत पण काम केलं आहे. सध्या माझी स्वतःची नवऱ्यासोबत IT company आहे. ड्रोन/ satellite survey and advisory.
मी कथक विशारद आहे. २००४ सालची All India topper.
शिवाय एक छोटासा Skincare Formulation studio आहे यात मी ऑरगॅनिक स्किन केअर प्रॉडक्ट तयार करते customised. मागच्या वर्षी डिप्लोमा इन स्कीन केअर फॉर्मुलेशन पण पूर्ण केला.
अजून बरेच उद्योग चालू असायचे.

अरे वा मनिम्याउ! Renaissance personality आहे तुमची.
जाईल ही फेज लौकरच. आणि तुमच्या या विविध क्षेत्रांतील अनुभवाबाबतही लिहा जमेल तसे.

मनिम्याऊ, किती छान सीव्ही आहे तुझा!
किती वेगवेगळ्या गोष्टी करतेस! खूप कौतुक वाटले.

अशीच राहा...उत्साही, सकारात्मक, आनंदी! Happy
ही फेज आहे असे समज. प्रत्येकाच्याच आयुष्यात कमी अधिक प्रमाणात चढ उतार येतच असतात. बेस्ट पॉसिबल मार्ग शोधायचा.
खूप शुभेच्छा !

हेडरमधला मजकूर वाचून, होतं असं कधी कधी. तग धरून रहा. जे जमतंय ते करा. असं सांगावंसं वाटलं. खरं तर मीही याच फेजमधून जातोय.

मग तुमच्या प्रतिसादात तुम्ही काय काय केलंय ते वाचल्यावर - बापरे - झालं. तुमचा जो बेंचमार्क सेट झालाय, त्या तुलनेत काही करत नाही, म्हणून तुम्हांला थोडं नैराश्य आल्यासारखं वाटतंय का?

कधी कधी थोडा विसावा चांगला असतो. पण तो विसावा म्हणून घ्या. शिक्षा म्हणून नाही.

मनिम्याऊ, किती छान सीव्ही आहे तुझा!>>> ++११११११११
तू जे जे करतेस ते वाचून आ झालाय . सॉलिड आहेस.
वरती सगळ्यांनी जे सल्ले दिले आहेत त्यांच्याशी सहमत.
हे ही दिवस जातील तुला परत छान वाटेल.

भरत. +१
तुमचा 'बार' बराच वरती आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होत असावा. काही बिघडत नाही थोडे दिवस काही फारसं नाही केलं तरी.

भारीच की!
भरत +१
वावे, आपल्याला वरच्या अंगाचा बार शोधायला हवा की काय!

म्हणजे बार विथ कोट्स हो!

तू जे जे करतेस ते वाचून आ झालाय . सॉलिड आहेस...... +१
सगळ्यांनी चांगले सल्ले दिले आहेत.
ही फेज निघून जाईल.

भरत यांची प्रतिक्रिया पटली.कधी कधी मनाची अशी अवस्था ही आत्मचिंतनासाठी सुयोग्य असते. कंटाळा, निरुत्साह परंतु नैराश्य नव्हे असे काहीतरी वर्णन करता येईल अशी मनाची अवस्था

मनीम्यायु , पहिले म्हणजे आयुष्यात तुम्ही लौकिक अर्थाने जबरदस्त यश मिळवले आहे.
आता तुम्हाला मास्लो च्या गरजांच्या चढत्या भाजणीतील सर्वोच्च इच्छा म्हणजे स्वांतसुखाय अशा काही गोष्टींची मनात अपेक्षा असेल.
बऱ्याचदा लौकिक यशापेक्षा मनाचे समाधान हे खूप महत्त्वाचे असते, आणि हेच आपल्याला समजत नाही.

Sharadg
ह्यालाच मिड लाइफ क्रायसिस असे म्हणतात. साधारणपणे ४५ ५० च्या दरम्यान मिलाक्रा होतो. . अर्थात त्यांची केस अशीच असावी असे म्हणणे नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असे होते. माझा स्वतःच्या अनुभवावरून सांगतो आहे.

माझा स्वतःच्या अनुभवावरून सांगतो आहे.>>> या विषयावर अनुभव असलेल्यांनी खरं तर लिहायला हवं....असा टप्पा जिथे आयुष्याची ध्येय रिकॅलीबरेट करायचे विचार पिच्छा पुरवतात...कारण आपल्या पुढे १०-१५ वर्षे असलेल्यांच्या आयुष्याचा आर्क आपल्या नजरेच्या टप्प्यात असतो आणि त्यांच्याकडून आयुष्य रिराऊट करण्याच्या निसटून गेलेल्या संधी आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे आपल्या हातून निसटू नयेत या FOMO चे सतत जाणवणारे दडपण.

मनिम्याऊ रिस्पेक्ट. ऑलराउंडर आहात.

मनाला आणि शरीराला थोडी विश्रांतीची गरज असेल, उन्हाळाही प्रचंड आहे, त्यामुळेही थकवा आला असेल. फेजच असेल ही असं वाटतंय. टेक केअर.

मनिम्याऊ, खूपच कौतुक वाटले तुझे. मी सल्ला देण्यास पात्र नाही, पण ह्याचा अनुभव आहे. एकेकाळी high achiever असलेल्या लोकांना जास्त त्रास होतो, अटेंशन आणि यशाची सवय असते आणि मग अदृश्य व्हावे लागले की त्रास होतो. मूर्ख लोकांसाठी टाळ्या वाजवाव्या लागतात आणि आपण मात्र तत्त्वनिष्ठ असून अदृश्य. कारण काहीही असो. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाने एक agility येते किंवा न्युरोप्लास्टिसिटी. खरंच हे एक अंडररेटेड क्रिटिकल स्किल आहे. मत्सरी किंवा कडवट स्वभाव नसल्याने अजून lonely होतं माणूस. कारण तेही करता येत नाही, विवेक असतो. सतत भान असतं. लोकांना ओळखता येतं, स्वतःला ओळखता येतं. अवघड होऊन जातं. तेथे ते कामाला येते.

तू ज्या गोष्टींसाठी पॅशनेट आहेस त्या बंद पडल्या असतील तर निरपेक्ष भावनेने कर किंवा कथक पुन्हा सुरू कर स्वतःसाठी किंवा लेकीसोबत. डान्स मधे ऊर्जा जाईल आणि आनंद मिळेल. डान्सने मूड सुधारतो. ही फेजच आहे आणि जाईलच. सोलो ट्रिप करणं शक्य असेल तर ती जमव. हायकिंग वगैरे. जेथे शरीराला आणि मनाला दोन्हीला आव्हान मिळेल. आपल्याला समजून घ्यायला आपल्या पेक्षा जास्त किंवा तेवढाच आयक्यू आणि इक्यू असलेले लोक लागतात, ते मिळतच नाहीत हाय अचिव्हर्सना. मग एकटेपणा येतो. एखाद्याची ब्राईट साईड जितकी एक्स्ट्रीम असेल तितकीच डार्क साईड सुद्धा एक्स्ट्रीम असते. निसर्ग तसेच देतो. सगळी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडून उरलेली मृण्मयी कशी आहे ते स्वतःला दाखव. स्वतंत्र अस्तित्वाचा आनंद शोध पुन्हा एकदा. जेथे तू कुणाचीच नाहीस फक्त स्वतःची आहेस अशी एक तरी गोष्ट निवडून करत राहा. संसारापेक्षा, कपडे, दागिने, अजून असाच बंडल पसारा - यापेक्षा जास्त काही तरी शोध. तू ही येशील परत - स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा Happy

वरचे बरेच सल्ले उपयुक्त आहेत पण तू त्यावर उत्तर दिले असल्याने मी वेगळं लिहिले. तुला कशाचा तरी उपयोग व्हावा ही सदिच्छा.

Pages