जन्गल भ्रमन्ति

Submitted by णेम्सेक on 7 June, 2026 - 01:40

दुधवा -पिलिभित जंगल डायरीज - भाग १
जंगल हा प्रकारच मोठा चित्ताकर्षक आहे. पण तराई भागातली अरण्ये हा त्यात पण वेगळा क्लास आहे... शेकडो वर्षे जुन्या , साल वृक्षांच्या दाट गर्दीने सदैव हिरव्या कंच सदाहरित गवताळ मैदानातून 'कोभांची लवलव -सांगे भूमीचे मार्दव ' असा काव्यात्म माहोल मिरवणारा ,अरभाट मामला .कॅनॉपितून जेव्हा झिरझिरत उन्हे खाली जंगलवाटेवर उतरतात ना..तेव्हा चुकून जरी कॅमेऱ्याचा क्लिक उडला तरी फ्रेमवर्दी फोटो मिळावा....
कॉर्बेट चे जंगल हे तराई चे एक टोक.dudhwa.jpg
तर पार नेपाळ च्या सीमेला जाऊन टेकणारे दुधवा/ किशनपूर/पिलीभीत हे दुसरं टोक. लखनौ पासून सुमारे चार तास गाडीने लखीमपूर खिरी ह्या जिल्ह्यात पोहोचलो की हे जंगल सुरू होते
.. टायगर रिझर्व्ह तर ते आहेच पण आता तिथे एकशिंगी गेंडे पण काझिरंगा तून ट्रान्स लोकेट करून आता मस्त त्यांचे पण वाइल्ड मध्ये सायटिंग होते....मोठमोठ्या आकाराचे आणि कळप संख्येचे हत्ती, बारासिंगा हरणाची भरपूर प्रजा,आणि असंख्य पक्षीगण....थोडक्यात जंगल भटक्या लोकांची पंढरी म्हणावे असे कॉर्बेट ला तोडीस तोड राजबिंड आरण्यक!!.....
ऐकीव माहिती नेहमीच जरा वाढवून मसाला लावून असते ..असा नेहमीचा अनुभव..पण इथला प्रकार उलटा निघाला... ऐकले ते तीळ भर कमीच होते इतका वरचा ,अगदी बाsss प म्हणावा असा अनुभव..इतक्या भेदक उन्हाळ्यात ,लखनौ चे तापमान ४२ डिग्री दिसत असताना, तिकडे जायचा प्लॅन करून आधीच पुण्याच्या परिचित लोकांत आमच्या मानसिक स्थिती बद्दल शंका तयार करून ठेवलीच होती...त्यात जंगलाचा बार फुसका निघाला असता की कुठे तोंड दाखवायला जागा उरली नसती....पण सगळ्या शंका सगळे किंतू परंतु “पार त्यांचे वाऱ्या सवे पळाले!!”
आधी एक दिवस लवकर जाऊन लखनौ मध्ये फूड क्रॉल केला... भम्म्म उन्हाची मंजे सकाळी दहा ते सहा टाळून.... शर्माजीची चाय बन मस्का, वाजपेयी कचोरी पुरी, शर्माजी की चाट, कबाब, बिर्याणी आणि दस्तरख्वान मुघलाई क्युझिन ची चैन करून घेतली आणि आता जे असेल त्याला तोंड देऊ म्हणून दुधवा ला प्रस्थान ठेविले
रस्ता मख्खन (मराठी मन लाजले)....ऊन मी म्हणते पण लक्षणीय हिरवाई भोवतीने..अगदीच बेसिक सोयी असणारे होम स्टे, असा बेतास बात प्रकार होता...पण जंगल सुरू झाले आणि सगळी स्केलच बदलली. एकदम वरचा 'सा 'च लागला!690643089_26529879203307662_5028037383015899660_n.jpg
पहिल्याच सफारीत सीझर नावाची वाघीण ,तिचा डौलदार विहार व्हिडिओत दिसतोय...मग दुसऱ्या सफारीत तिची जवळ झाडीत लोळत पडलेली तिची सब अडल्ट बाळेत्यांना शिकार करून द्यायला सीझर निघाली . आणि जवळच्याच वॉच टावर वर अतिशय चपळाईने जागा घेऊन , नीलेशने टॉप अॅंगल ने तिची सगळी हालचाल विडिओबद्ध केली . दुसऱ्या दिवशी -एकदम आहारलेल्या सीझर चे चक्क लोळत पडलेले फोटो आम्ही दुपारभर काढले .. गवतात शांतपणे चरणारे हत्ती , बाराशिंगा हरणे , मोठमोठे सुळेवाले टस्कर हत्ती ... .प्रत्येक सफारी चढ्या क्रमाने रंगत जाणाऱ्या नाटकासारखी रंगली..
आधी एक च एकांडा नर गेंडा गवतात चरताना दिसला ...मग एक गेंडा आई आणि तिचे दुडूदुडू पिलू!!! चक्क आमच्या समोरून रस्ता क्रॉस करून गेले...जाताना आई थबकून तिने जिप्सी कडे रोखून मान हलवली... सबुरीने घ्या रे.. माझे बाळ येतेय मागून .... बाळकोबा पण लगेच आईची कॉपी मारून. हा सगळा गोड प्रकार व्हिडिओत कैद झाला....तीच आई एकदा छोट्या तळ्यात पिल्लू ला घेऊन मजेत ' या डुंबा डुंबा ' करताना पण भेटली....688053637_26529997436629172_5493121724876277777_n.jpg
पक्षी..... काही अरभाट काही अति दुर्मिळ .. इंडियन पिट्टा तोही फ्लाइट मध्ये .. शिट्टी बदक ...आणि एक ग्रीन हेडेड मालकोवा पण .. काय सांगू काय काय लॉटरी लागली !!!687966110_26529891896639726_2508629605928318366_n.jpg
अजून उरलेल्या सफाऱ्यात अजून काय काय भारी सापडलंय तेही सांगते आणि फोटोत दाखवतेच पुढच्या भागात....
थोडक्यात काय.... मुद्दई लाख बुरा चाहें भी तो क्या होता हैं... वही होता हैं जो मंजूर- ए-खुदा होता हैं!! हेच शेवटी खरे........690643089_26529879203307662_5028037383015899660_n.jpg688053637_26529997436629172_5493121724876277777_n.jpg687966110_26529891896639726_2508629605928318366_n.jpg687966110_26529891896639726_2508629605928318366_n.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान. पुभाप्र.
पिलीभीतला पूर्वी काही वेळा जाणे झाले. तेव्हा ते खलिस्तानी अतिरेक्यांचे माहेरघर आहे असे म्हणत. बस वर हल्ले होत. रात्र झाली लगेच की गावातही सामसूम होत असे सात नंतर सहसा कुणी बाहेर पडत नसे, बसेसही बंद.
सफारी वगैरेही नव्हती तेव्हा. एकदा टनकपूर-बनबासाला गेलो तेव्हा बस, जीप मधून जंगल दिसले तेवढेच.

छान अनुभव व लेखनही !
मला कान्हा जंगलाने व्याघ्र दर्शनाबद्दल पूर्ण निराश केलं पण रणथंबोरने मात्र भरभरून त्याची भरपाई केली. आणि, मग तर अचानक चंद्रपूरच्या जंगलात एटापल्ली, वरिया हिल्स, बांदे नदी या परिसरात अनेकदा अगदी जवळून व्याघ्र दर्शन, अगदी पिलावळीसह सुद्धा, घडलं ! ' वही होता हैं जो मंजूर- ए-खुदा होता है ! '

लिहायला नुकतीच सुरवात करत आहे . तुमचे सगळ्यांचे प्रतिसाद खूप मोलाचे आहेत . फोटो अपलोड करायला अजून नीट जमले नाहीये . ही जरा खंत .. कारण जंगल अनुभव फोटोतून अधिक परिणाम साधतो. … मानव तुमचे म्हणणे बरोबर आहे. पिलिभित मेनका गांधीचा मतदार संघ असे.. आणि थोडा धास्तावलेला , बरचसा दरिद्री असा प्रदेश .. पण जोगीजींच्या राज्यात पर्यटन एकदम जादूची कांडी करते आहे. लोक अतिशय प्रयत्न पूर्वक बाहेरून येणाऱ्याना सर्विस चांगली मिळेल हे पाहत आहेत.. वन विभाग थोडा बाबूगिरी मूड मध्ये आहे .. पण तरी वन पर्यटन अतिशय सुविहीत आहे..

छान लिहिताय 👌 ही सिरीज पूर्ण वाचणार.

दुधवा- पीलीभीत बद्दल फक्त वाचून-ऐकून माहिती आहे म्हणून पुढे वाचण्याची जास्त उत्सुकता. बैजवार-बयानवार लिवा हो.

फोटू डकवले तर अजून बेश्ट, त्याने जंगलाचा-परिसराचा पोत समजतो, तो फ़ील घेता येतो.

BTW, तुमचे “णेम्सेक” हे सदस्यनाम मजेदार वाटले, brought a smile to my face. 🙂 ते मात्र बदलू नका.