अंतर

Submitted by विनोद इखणकर - श... on 3 June, 2026 - 08:20

शीर्षक :- अंतर

तुला पाहिले होते
मन वाहिले होते
हृदयात तुझ्या मी
डोळ्यात साचले होते

फुल वेचले होते
पायी वाहिले होते
देवाकडं तुला मी
मागितले होते

पानं चाळले होते
तुला शोधले होते
नाव हातावरी तुझे
मी गोंदले होते

मन खचले होते
अश्रू दाटले होते
सोडुनिया मला
नभ फाटले होते

काव्य रचले होते
तुला टोचले होते
नात्यात आपल्या
रान पेटले होते

गाणे ऐकले होते
सूर नाचले होते
तुला मी सारे
ओळखले होते

तुला कळले होते
मन वळले होते
आपल्या दुराव्यातले
अंतर वाढले होते

विनोद इखणकर(शब्दप्रेम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users