हा घाव दिलेला एका नाजूक फुलाने आहे : स्वच्छंदी

Submitted by 'स्वच्छंदी on 2 June, 2026 - 04:21

ह्या भळभळत्या जखमेचे हे हृदय दिवाणे आहे
हा घाव दिलेला एका नाजूक फुलाने आहे

मी मी म्हणणारा कोणी हे ठरवू शकला नाही
कोणाच्या खांद्यावरुनी कोणाचे जाणे आहे

मी फक्त पुढे आलेल्या शब्दांच्या ओळी केल्या
ही तुझी वेदना आहे.. हे तुझेच गाणे आहे

मानल्यास संधी आहे माणूस बनुन जगण्याची
नसता श्वासांचे केवळ हे येणे-जाणे आहे

कोणाच्या हृदयाला जर ही पाझर फोडू शकली
तर गझल....'गझल' आहे ही अथवा रडगाणे आहे

: महेश मोरे (स्वच्छंदी), सातारा

Group content visibility: 
Use group defaults

क्या बात है!

>>>>मी मी म्हणणारा कोणी हे ठरवू शकला नाही
कोणाच्या खांद्यावरुनी कोणाचे जाणे आहे

मस्त!

Chhan!

मस्त

आवडली गझल!

मतलाच बाकीच्या शेरांइतका बांधीव वाटत नाहीये मला - उला मिसर्‍यातल्या भरीच्या शब्दांमुळे.