मायबोली टाईम्स एक्स्प्रेस हेरॉल्ड टुडे

Submitted by राज अज्ञानी on 27 May, 2026 - 04:01

वेधक वेचक बातम्यांची लिंक वर असलेल्या धाग्यावर दिली जाते. पण बऱ्याचदा ती लेखाशी सुसंगत असत नाही. तसेच तो धागा मागे पडला कि संबंधित बातमी पण विस्मरणात जाते.

लक्षवेधी बातम्या एका ठिकाणी असणारा धागा सर्च मधे सापडत नाही. असेल तर हा धागा बंद करण्यात आला तरी चालेल.

नसेल तर कृपया इथे बातम्या डकवायची सोय आहे. चित्र, लिंक, मजकूर कोणत्याही प्रकारची माहिती चालेल. देणाऱ्या ने बातमी प्रतिष्ठित संस्थेच्या हवाल्याने दिलेली असावी किंवा व्हेरिफाय केलेली असावी. फर्स्ट हॅंड असेल तर सत्यता पटवण्याची जबाबदारी घेतलेली असावी एव्हढीच माफक अपेक्षा.

विषयाचे बंधन नाही.

एखाद्या बातमीवर जास्त काळ चर्चा होईल असे वाटल्यास स्वतंत्र धागा काढावा ही विनंती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जपानने भारताचा हापूस आणि केसर या आंब्यांवर बंदी घातली आहे. एक खेप परत पाठवून दिली आहे.

याचे कारण म्हणजे जपानचे अधिकारी जेव्हां भारतात हापूस आंब्यांची लागवड आणि प्रक्रिया यांची पाहणी करण्यासाठी आले होते, तेव्हां फ्युमिगेशन प्रोसेस दरम्यान आंतरराष्ट्रीय मानकांची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांना आढळले. फ्युमिगेशन म्हणजे कीटकनाशकांचा वापर. यात जे विषारी पदार्थ वापरतात ते घातक आहेत.

भारताचा माल अनेकदा परत येतो. त्यानंतर भारतातली माध्यमे त्या देशांना दोष देतात. पण कीटकनाशकं म्हणून घातक रसायनांचा सर्रास वापर होतो. ही कीटकनाशकं जमिनीत अनेक वर्षे राहतात. पाण्यात मिसळली जातात. त्याने कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात. हा एक मोठा तिढा आहे. आंतरराष्ट्रीय मानकांचा वापर करायचा तर खर्च मोठा होईल, ज्यामुळे फळांच्या किंमती जास्त वाढतात. आणि जर सध्याची कीटकनाशकं वापरणं थांबवलं तर कीड येऊन पीक नष्ट होतं. ज्यामुळे नुकसान सोसावं लागतं.

माफ करा पण अशा बातम्याही चालतील का? नसतील चालत तर उडवेन.
https://www.yahoo.com/lifestyle/articles/abandoned-donkey-gave-her-rescu...
एक रस्त्यावर सोडुन दिलेली गाढविण होतं. एका दांपत्याने दया येउन, तिला घरी नेले. तिथे तिला हवी ती सुरक्षा मिळाल्यावर ती गाढविण व्याली. गाढवं म्हणे त्यांची डिलिव्हरी सुरक्षित वाटेपर्यंत, थांबवुन ठेउ शकतात. Happy
ते पिल्लू तर इतकं गोड आहे ना. जगात सगळीच पिल्ले गोड दिसतत पण गाढवाचे सर्वाधिक.
Yes, a donkey (jenny) can consciously delay her delivery by several days to a couple of months. If she senses an unfavorable environment, extreme weather, or predators, she will instinctively hold off on foaling until she feels completely safe and secure.
कंसात जेनी दिलय म्हणुन पहायला गेले तर -
A female donkey is specifically called a jenny (or sometimes jennet). In comparison, an intact male donkey is called a jack, and a baby donkey is a foal.

सामो यांनी दिलेली बातमी आवडली. थोडा अधिक शोध घेतला असता काही प्राणी तात्पुरत्या थोड्या काळासाठी असे करू शकतात हे कळले. स्ट्रेस मुळे लेबर कमी होऊन प्रसूती थोडी पुढे ढकलली जाते. स्ट्रेस गेला कि मग पुन्हा कळा येऊन प्रसूती. मस्तच.

>>>>सामो यांनी दिलेली बातमी आवडली.
धन्यवाद.

घरात सगळेजण माझ्यावरती याहु वरच्या बातम्या वाचते म्हणुन टिका करतात. पण आपण सकारात्मक / क्युट बातम्या पाहू लागलो की याहू तश्या बातम्या पुरवत रहाते. आणि मला आता निगेटिव्ह बातम्यांकरता अजिबात मेंटल बॅडविड्थ राहीलेली नसल्याने आय थ्राइव्ह ऑन याहु न्युज.

https://www.aljazeera.com/features/longform/2026/6/14/making-history-the...
कोलंबिया पहीला लॅटिन अमेरिकन देश आहे ज्याने FGM म्हणजे female genital mutilation वरती बंदी आणलेली आहे. पहील्यांदा FGM वरती, बंदी आणण्याचा कायदा पास झालेला आहे. कायदा ४४० - "Ninas sin ablacion" or "Girls without mutilation". वैद्यकिय कारणांशशिवाय मुलींचे लैंगिक अवयव पूर्ण अथवा अंशिक काढून टाकण्याची ही प्रथा, मोडीत निघत आहे ही सकारात्मक बातमी आहे. World Health Organisation ने या प्रथेस मानवी अधिकारांचे उल्लंघन म्हटलेले आहे. जगात जवळ जवळ २३० मिलिअन मुली/ स्त्रिया या प्रथेच्या बळी आहेत.

पण आपण सकारात्मक / क्युट बातम्या पाहू लागलो की याहू तश्या बातम्या पुरवत रहाते.

आजकाल algorithms च्या जमान्यात सगळे पोर्टल ते करतातच. हल्लीच जिम मेंबरशिप renew केली तसे तो डेटा मोबाईल नावाच्या चावट यंत्राने बोंबलून जगाला सांगितला तसे मला जिम मधे घालावयाचे लंगोट विकणाऱ्या जाहिराती ते "सिग्मा मेन" यूट्यूब शॉर्ट्स सगळे शिस्तीत फीड होऊ लागले, निवांत हिस्ट्री क्लिअर केली, ब्राउजर मधून. तसे परत ओके झाले.

गडकरींनी ई८५ पेट्रोल पंपावर उपलब्ध केले आहे. तसेच ई१००ला मंजुरी दिलेली आहे.
सध्या ई २० हे पेट्रोल सर्वत्र उपलब्ध आहे. यापूर्वी ई५ हे पेट्रोल उपलब्ध होते.

५, २०, ८५, १०० हे इथेनॉलचे मिश्रण किती टक्के आहे हे दाखवणारा नंबर आहे. सध्या निव्वळ पेट्रोल कुठेच उपलब्ध नाही. दीड दोन वर्षांपूर्वी ई२० हे इंधन उपलब्ध झाले. ते २०२३ च्या नंतरच्या वाहनांसाठी आहे असे सांगितले गेले. पण आधीच्या वाहनांसाठी ई५ हे एट्रोल दिल्लीत कुठेही उपलब्ध नसल्याच्या बातम्या होत्या. आता तर देशभरातच कुठेही ई५ उपलब्ध नाही असे चित्र आहे. याचे परिणाम काय होतात याबद्दल सोशल मीडियात अनेक दावे आहेत. वाहन दुरूस्ती करणारे मेकॅनिक व्हिडीओ बनवून सांगताहेत कि इंजिन, टाकी आणि सायलेन्सरमधे गंज लागतोय. यामुळे देखभाल खर्च वाढतो. याबद्दल वेगवेगळ्या साईटसवरचे दावे संकलित केले आहेत. त्याचं विश्लेषण.

E20 हे आता भारतातील मानक इंधन बनले आहे. त्याचे परिणाम वाहनाच्या इंजिनाच्या प्रकारानुसार बदलतात.
नवीन वाहनांसाठी (एप्रिल २०२३ नंतरची) या वाहनांचे इंजिन E20 साठी तयार केलेले आहेत. सरकार आणि उद्योगतज्ञांच्या मते, त्यांच्या इंधन कार्यक्षमतेवर फक्त १-२% चा परिणाम होतो. त्यामुळे या नवीन वाहनांसाठी E20 सुरक्षित मानले जाते.

जुन्या वाहनांसाठी (२०२२ किंवा त्यापूर्वीची) या वाहनांची रचना साधारणपणे E5 किंवा E10 साठी केली गेली होती. त्यामुळे E20 चा परिणाम अधिक गंभीर आहे.
इंधन कार्यक्षमता कमी होते: एका सर्वेक्षणानुसार, ८०% जुन्या वाहन मालकांना इंधन कार्यक्षमतेत घट जाणवली. काहींना २०% पर्यंत घट जाणवली, तर सरासरी २-६% घट नोंदवली गेली.

देखभाल खर्च वाढणे. ५२% मालकांना इंजिन, इंधन रेषा, टँक आणि असामान्य झीज किंवा दुरुस्तीचा सामना करावा लागला. इंजिन मिसफायर, इंजेक्टर बिघाड, आणि इंधनात पाणी मिसळणे यासारख्या समस्या उद्भवल्या. एका उदाहरणात, चेन्नई येथील एका Audi Q7 मालकाला E20 मुळे इंजिन बिघडल्याने ४ लाख रुपये खर्च आला.

E85 (८५% इथेनॉल) आणि E100 (शुद्ध इथेनॉल) हे उच्च-मिश्रण इंधन सामान्य पेट्रोल वाहनांसाठी अजिबात योग्य नाहीत. हे फक्त फ्लेक्स-फ्यूल वाहनांसाठी (FFV) आहेत.

E20 वाहनातही E85 टाकल्यास इंजिनची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या कमी होईल, इंधन प्रणालीला गंज लागेल, सील आणि होज खराब होतील, इंजिन सुरू होण्यास त्रास होईल आणि दीर्घकाळ चालण्याची क्षमता कमी होईल.

कार्यक्षमतेत मोठी घट - इथेनॉलमध्ये पेट्रोलपेक्षा कमी ऊर्जा असल्याने, E100 वर वाहन चालवल्यास कार्यक्षमतेत ३०% पर्यंत घट होऊ शकते.

नवीन वाहने ( १५ वर्षाचे रजिस्ट्रेशन असलेली) E20 साठी तयार आहेत, पण E85 किंवा E100 साठी नाहीत . गडकरीचे आश्वासन आहे की E20 आणि E85 हे वेगवेगळ्या श्रेणीतील इंधन आहे आणि E85 चा अर्थ E20 वाहने बंद होतील असा नाही. तसेच, E20, E85 आणि E100 ही इंधने बहुधा सोबतच विकली जातील, त्यामुळे सामान्य वाहनांसाठी E20 उपलब्ध राहील.

मात्र, पंपचालकांकडून जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणे चुकीचे इंधन दिले जाण्याचा धोका नाकारता येत नाही. पंपचालक इथेनॉलचे मिश्रण वाढवतील अशी भीती आहे. काही जण उसाचा रस मिसळला जात असल्याचे आरोप करताहेत. वाहनाच्या टाकीच्या झाकणाजवळ मुंग्या आहेत असे व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. गडकरींनी ते फेटाळले आहेत.

नियमन आणि देखरेखीचा अभाव: E85/E100 सारख्या उच्च-मिश्रण इंधनाची योग्य साठवणूक आणि वितरणासाठी पेट्रोल पंपांना वेगळी यंत्रणा लागेल. ही यंत्रणा उभी राहण्यास वेळ लागेल आणि त्यावर कठोर नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक असेल.

इंधनाचे विविध प्रकार उपलब्ध झाल्यामुळे सामान्य ग्राहक गोंधळून जाऊ शकतो. एकाच पंपावर वेगवेगळी इंधने असल्यास चुकीचे इंधन भरण्याचा धोका वाढतो. कुठल्या रांगेत उभे रहायचे हे समजणार नाही. चुकीच्या रांगेत उभे राहिल्याने वेळ जाईल. तसेच सर्वच पंपांवर वेगवेगळ्या रांगा लावण्याइतकी जागा उपलब्ध नसेल.

E100 सर्वाधिक धोकादायक आहे. त्याची इंधन कार्यक्षमता सर्वात कमी असेल आणि बहुतेक सध्याच्या वाहनांच्या इंजिनसाठी ते पूर्णपणे अयोग्य आहे.

काँग्रेसने आरोप केला की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र निखिल गडकरी (Cian Agro Industries) आणि सारंग गडकरी (Manas Agro Industries) इथेनॉल उत्पादन व्यवसायात आहेत, आणि सरकारच्या इथेनॉल प्रोत्साहन धोरणाचा त्यांना फायदा होत आहे. Cian Agro चा महसूल १८ कोटींवरून ५२३ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे आणि शेअरच्या किंमतीत २,१८४% वाढ झाल्याचेही नमूद केले.

गडकरी यांनी हे आरोप सुद्धा फेटाळले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या मुलाच्या कंपनीत भारताच्या एकूण इथेनॉल उत्पादनाच्या ०.५% पेक्षाही कमी उत्पादन होते आणि ते conflict of interest चा आरोप नाकारतात नाकारतात. ते इथेनॉलला स्वच्छ इंधन म्हणून समर्थन देतात.

https://www.ndtvprofit.com/economy/e-20-fuel-impacting-mileage-and-maint...

https://energy.economictimes.indiatimes.com/news/oil-and-gas/e20-petrol-...

https://www.newindianexpress.com/business/2025/Aug/31/benefits-outweigh-...

https://poonawallafincorp.com/blogs/pre-owned-car-loan/e85-fuel-everythi...

https://www.cartoq.com/car-news/india-draft-rules-e85-e100-ethanol-fuel-...

https://www.gaonconnection.com/rural-news/e85-fuel-launch-will-e20-cars-...

https://www.youtube.com/watch?v=Mo5_TRX5iSg

https://www.jagran.com/automobile/car-buyer-guide-multiple-ethanol-varia...

https://www.thehindu.com/news/national/gadkari-lobbying-for-ethanol-blen...

https://www.telegraphindia.com/india/father-makes-policy-sons-make-profi...

https://www.tribuneindia.com/news/india/ethanol-policy-enriched-gadkaris...

https://www.news18.com/amp/india/less-than-0-5-nitin-gadkari-clears-air-...

https://www.financialexpress.com/india-news/no-role-of-mine-gadkari-brea...

सर्वेबद्दलची ही लिंक
https://www.etvbharat.com/en/!business/petroleum-ministry-debunks-claims...

या शिवाय ऊस आणि तांदूळ यांना लागणार्‍या पाण्याबद्दल चिंता व्यक्त होतेय. शेतकर्‍यांना दोन पैसे मिळतील. पण व्हायरल दाव्यात एक लीटर इथेनॉल साठी १०००० लीटर पाणी लागते असे म्हटले आहे. याचा अर्थ एक लीटर पेट्रोल साठी जेव्हढा तांदूळ पिकवावा लागेल, त्याच्या लागवडीपासून ते प्रक्रियेपर्यंत लागणारे पाणी. ज्याप्रमाणे आज पश्चिम महाराष्ट्रात ऊस घेतल्याने इथे पाण्याचा वापर वाढला आणि अन्य भागात पाणि नाही असे चित्र दिसेल.

गडकरी हे वाहतूक आणि रस्ते मंत्री आहेत ना? त्यांना पेट्रोलियम खात्यात अशी ढवळाढवळ करण्याचा अधिकार आहे का?

इन्स्टाग्राम्स डार्क सीक्रेट हा बीबीसीने बनवलेला इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट पाहिला नसेल तर
https://www.bbc.com/news/articles/cvgm4e0316zo

इन्स्टाग्रामच नाही तर फेसबुक पासून सुद्धा सावध राहण्याची गरज आहे.
हा मूळ रिपोर्ट भारतात दिसत नाही.
https://www.bbc.co.uk/iplayer/episode/m002z09x/eye-investigations-the-ca...