Submitted by Meghvalli on 17 May, 2026 - 04:23

आज पुन्हा त्या आठवणीस मी रस्त्यात गाठले होते,
तिने ओळख दिलीच नाही, अश्रू डोळ्यांत दाटले होते।।
मग मीच सांगितली ओळख कॉलेजमधली,
डोळ्यांत झलक ओळखीची… तरी ओठ मिटलेच होते।।
बसमधून जाताना दिलेले स्मित ती विसरली होती,
कॉलेज आयुष्यातील ते पान कधीच फाटले होते।।
कॅन्टीनच्या त्या टेबलावर धूळ साचली होती,
त्या गप्पांचे आवाज तिथेच हरवले होते।।
निरोप घेताना हातही थरथरले क्षणभर,
शब्द मात्र ओठांआड कुठेतरी अडकले होते।।
गर्दीतही काही क्षण थांबून काळ पाहत होता,
जुने दिवस डोळ्यांमध्ये हळूच परतले होते।।
ती वळून गेली तरी रस्ता सुन्नच राहिला,
वार्यावर कितीतरी प्रश्न तसेच उरले होते।।
रविवार, १७/५/२६, १:३० PM
अजय सरदेसाई - मेघ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा