हृदयातून उमटली असेल...

Submitted by Meghvalli on 13 May, 2026 - 06:16

कदाचित ती त्याचीच ख्वाहिश,
हृदयातून उमटली असेल।
ही जीवनाची आर्त फरमाइश,
हृदयातून उमटली असेल।।

झऱ्याची ती छमछम धून,
किंवा सागराची शांतता गहिरी,
ती सृजनाची सुंदर नुमाइश,
हृदयातून उमटली असेल।।

डोळ्यांत दाटलेली ओल,
ओठांवरील ती निःशब्दता,
अंतरीय वेदनेची पैदाइश,
हृदयातून उमटली असेल।।

मातीतून आलो सारे आपण,
मातीतच विरून जाणारे,
ही सनातन जी रवाइश,
हृदयातून उमटली असेल।।

आईच्या त्या प्रार्थना अजुनी,
मनात घुमत राहतात,
त्या आर्त प्रार्थनांची जुंबिश,
हृदयातून उमटली असेल।।

शून्यात हरवल्यागत वाटले,
ते पुन्हा गवसले कसे ‘मेघ’,
ती परतीच्या प्रवासाची ख्वाहिश,
हृदयातून उमटली असेल।।

बुधवार, १३/५/२६, २:४५ PM
अजय सरदेसाई ‘मेघ'

Group content visibility: 
Public - accessible to all site users