बायकोशी खोटं कसं बोलावं?

Submitted by Madan Hunkare on 11 May, 2026 - 11:39

आपण आपल्या बायकोला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. तिच्यावर आपण प्रेम करतो. तिला फिरायला नेणे, हॉटेलिंग, सिनेमा, नाटक हे तर असतंच. पण तिच्या मनी ध्यानी नसताना अचानक तिला आवडते त्या रंगाची साडी घेऊन देणे, तिच्यासोबत शॉपिंगला जाणे ही कामं आपण मनापासून करत असतो.

कारण आपली बायको ही लाडाची असते. ती जगात एकमेव असते. ती नाही तर आपण नाही. आईच्या कुशीतून लहानाचं मोठं होऊन बाहेर पडल्यावर बायकोनंच आपल्याला मोठ्याचं लहान केलेलं असतं. आईने आपल्याला पायावर पालथं पाडून ढुंगणावर चापट्या मारून न्हाऊ घातलेलं असतं, तर बायकोनं दिवाळीला उटणं लावून खरारा करून अंघोळ घातलेली असते. आपण त्याची परतफेड करत नाही तरी ती राग मनात धरत नाही. उलट आपल्याला चांगलं चुंगल फराळाचं करून घालते. त्याचं कौतुक केलं कि तिला अस्मान ठेंगणं होतं. काही जास्त अपेक्षा नसतात बिचारीच्या.

तरी पण त्या प्रेमापोटीच आपल्याला तिच्याशी खोटं बोलावं लागतं.
अशी वेळ तुमच्यावर कधी आली का? तो काय प्रसंग होता? आणि तुम्ही काय खोटं बोललात?
त्याची रूखरूख लागली असेल आणि बायकोला सांगता येत नाही असे झाले असेल तर इथे मनमोकळेपणाने व्यक्त व्हा आणि हलके व्हा.

इथे सांगितलेले प्रसंग वाचून ट्राय करू नये. हे फक्त बायकोवर प्रेम करणार्‍यांसाठीच आहे. बायको तुम्हाला किती ओळखते यावरून थापा किती मारायच्या हे ठरते. कुणाला जर अशा प्रसंगी काय थाप मारायची हे सुचत नसेल तर इथेच विचारा. जाणकार सल्ला देऊ शकतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायको फार सुंदर नसली तरी चालते. कारण लग्न वर्षभर जुने होताच आपल्याच बायकोच्या सौंदर्याचे काही अप्रूप उरत नाही.

अजिबात असहमत.

माझी पत्नी आज लग्नाला ३३ वर्षे झाली तरी सुंदर दिसते. अर्थात ती मॅरॅथॉन धावते त्यामुळे अजूनही सडपातळ आहे नि केसही अजून बऱ्यापैकी आहेत आणि लांबही आहेत. त्यातून तिला बर्यापैकीं ड्रेस सेन्स हि आहे आणि ती कधी ही बेंगरूळ राहत नाही. यामुळे तिच्या वयाच्या इतर स्त्रियांच्या मानाने नक्कीच जास्त तरुण, सुंदर आणि आकर्षक आहे.

पण याच्यासाठी थोडेसेच जास्त कष्ट घ्यावे लागतात. चेहरा स्वच्छ धुवून केस विंचरून थोडीशी पावडर आणि हलकीशी लिपस्टिक लावायला कितीसा वेळ लागतो?

बऱ्याच वेळेस बायका बाळंतपण किंवा मेनोपॉज या दोन स्थित्यंतरातून जात असताना स्वतःकडे नीट लक्ष देत नाहीत. यामुळे शरीराची आणि एकंदर मनाचीच ठेवण बिघडते. आता कुठे आम्हाला सौंदर्यस्पर्धेत जायचं आहे. मुलांच्या मागे पळण्यात कुठे वेळ मिळतो?

मग एकदा सोडून द्यायचं ठरवलं कि परत गाडी रुळावर येणे तितके कठीण होत जाते.

अर्थात मी सुद्धा वजन आणि एकंदर शरीर यष्टी व्यवस्थित ठेवून आहे. याचे बाळकडू मला अर्थातच लष्करात मिळालेले आहे. इतके कि बाहेर कुठेही जाताना मी जर दाढी केलेली नसली तर मला फार अस्वच्छ आणि अस्वस्थ वाटत राहतं. आम्ही दोघेही कधीही अव्यवस्थित किंवा कसे तरी कपडे घालून कुठेही जात नाही. घरात सुद्धा कपडे साधारणपणे व्यवस्थितच असतात.

शरीर अस्ताव्यस्त वाढत चाललंय, पोट सुटून नगारा झालाय तरी एकदा जेवायला बसलं कि दाबून खायचं आणि पार्टीत गेल्यावर नको तितकी दारू प्यायची आणि मिळेल तितकं हादडायचं याची मला तिडीक बसते.

नीटनेटके राहणे हा सवयीचा भाग केला तर तेअजिबात कष्टाचे होत नाही.

रोज रात्री ज्या बाईसोबत झोपायचे तीच सकाळी डोळे उघडल्यावर बघायची त्यात आयुष्यभर कशी मजा येणार मग भले ती कितीही सुंदर का असेना.
मुळात जिच्यावर/ ज्याच्यावर आपण प्रेम करतो तिच्या /त्याच्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत असतात. वय वाढलं म्हणून साडी नेसून चार दागिने घातलेली बायको कमी सुंदर होते असं थोडीच आहे? आम्ही नाटक सिनेमाला जातो तेंव्हा हा फरक मला जास्तीच जाणवतो.

अनेक वेळेस आजूबाजूच्या बायका आपल्याला अंधारात कोण बघतंय? म्हणून काहीही कपडे आणि कसा तरि मेकअप करून आलेल्या दिसतात. आणि माझी बायको छान पैकी साडी बिडी नेसून गजरा माळून येते. यावर मी खुश आहे हे तिला माझ्या डोळ्यात दिसत असतं.

आयुष्य हा एक सण किंवा समारंभ आहे तेंव्हा आपण चांगलं राहिलं चांगले कपडे घातले पाहिजे हे देव आनंद म्हणून गेला ते आम्हाला पूर्णपणे पटलं.

असं राहिलं तर आपल्यालाच छान वाटतं
आळसावलेली बायको मध्ये पण एक सौंदर्य असते. अगदी थकलेल्या बायकोचं डोकं चेपल्यावर तिच्या चेहर्यावर दिसणारे समाधान सुद्धा वेगळेच सुंदर दिसते.

त्या ऐवजी बायको अशी हवी जी आपल्याला कंफर्ट झोन देईल. तिच्याशी काहीही बोलताना किंवा तिच्यासमोर कसेही वागताना फार विचार करावा लागणार नाही,

येथे त्याऐवजी पेक्षा त्याशिवाय हा शब्दप्रयोग जास्त खुलून दिसेल.

बायको( किंवा नवरा) केवळ सुंदरच नव्हे तर समंजस आणि आपल्याला समजून घेणारी/ घेणारा असेल तर आयुष्य फार सुखाचे होते

सुबोध खरे तुमची बायको फार सुंदर आहे आणि कॉलेज क्वीन होती म्हणालात. तुम्ही आपला मुद्दा पटवताना उदाहरणे त्यांचीच दिलीत. जे एक स्पेसिफिक उदाहरण झाले.

पण कॉलेज क्वीन कॉलेजमध्ये एकच असते. जगात मोजक्याच बायका फार सुंदर असतात. त्या खालोखाल ज्या ठिकठाक सुंदर असतात त्यांच्यातही आहे ते जपायला वेळ आणि पैसा खर्च करणे हे सर्वांना इच्छा आवड असूनही शक्य नसते. आणि त्यानंतर सर्वसाधारण रूपाच्या आल्या ज्या वेळ आणि पैसा खर्च करूनही मुळातच रूपवान नसल्याने या बायकांमध्ये उठून दिसत नसतील ... त्यामुळे जर सौंदर्य हा निकष ईतका महत्वाचा झाला असता तर सर्वसाधारण रूपाच्या बायकांची प्रेमप्रकरणे आणि प्रेमविवाह झाली नसती. प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या सौंदर्याच्या तुलनेत सुंदर बायको हवी झाली असती. इथे निसर्गाचा समतोल बिघडला असता. आणि हे निसर्ग स्वतःच होऊ देत नाही. याबाबतीत तो फार चलाख असतो. त्याला प्रेम त्यांच्यातही फुलवायचे असते ज्यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. त्यामुळे त्याने सौंदर्याच्या आकर्षणापलीकडे जात स्त्री पुरुष केमिस्ट्री तयार केली Happy

या केमिस्ट्रीत एवढी ताकद असते की जिच्याशी तुमची ती जुळते ती स्त्री तुम्हाला जगातली सर्वात सुंदर स्त्री वाटू लागते. मग तिचा रंग रूप बांधा कपडे स्टाईल वगैरे जे काही असेल त्या सर्वांचे जे एक पॅकेज बनते ते आपल्याला जगातल्या दुसऱ्या कुठल्याच मुलीत आढळत नाही.

ज्या बायका तुम्हाला बाह्यसौंदर्याची काळजी न घेणाऱ्या वाटतात त्यांची सुद्धा स्वतःची एक सादगी असते जी त्यांच्या जोडीदाराला आवडत असण्याची शक्यता तुम्ही ध्यानात घेत नाही आहात. तुम्हाला ती आकर्षक वाटत नसावी कारण तुम्ही तिच्या प्रेमात नसता. जो असतो त्याच्या नजरेतून तिचे तेच रूप आकर्षक असते.

आणि हो,
बायका चित्रपट बघायला अंधारात आपल्याला कोण बघते याचा विचार करून नटून थटून घेत नाही हा तुमचा अनुभव सिंगल स्क्रीन आणि ऑर्कुट काळातील वाटतो. आजकाल मल्टिप्लेक्सचा आणि इंस्टाग्रामचा जमाना आहे. पिक्चरला गेले म्हणजे फोटो काढायचे असतात, शो ऑफ करायचा असतो. बरेचदा मॉलमध्ये फिरायचे असते. काही नाही तर चित्रपटाच्या पोस्टर समोर सेल्फी काढायच्या असतात. त्यामुळे सगळ्या मुली बायका नटून थटून आल्या असतात. किंबहुना हल्ली बायकांचे काही ग्रुप ड्रेस कोड ठरवून पिक्चर बघायला येतात Happy तसेच जेन झी जनरेशनचे मेकअप स्टाईल सगळेच वेगळे असते. त्यामुळे कदाचित आपले निकष लावता ते जाणवत नसेल.
असो, पण हा माहोल एन्जॉय करायला मी नेहमी वीस पंचवीस मिनिटे आधी थिएटरला पोहोचतो. आणि त्या वातावरणात ऑड मॅन आऊट ठरू नये म्हणून स्वतःही चांगले कपडे, गॉगल वगैरे घालून जातो Happy

यातही गंमत बघा. तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये लिहिले की दाढी केली नसली तर तुम्हाला अस्वच्छ वाटते. पण त्याचवेळी stubble beard ठेवणे ही आजकालची एक स्टाईल आहे. हे कित्येक मुलांनाही आवडते आणि आजकालच्या कित्येक मुलींनाही अशी दाढी शोभणारे मुले आकर्षक वाटतात.

सामो जी, मला ते महुं समजलंच नाही. आत्ता समजलं. थॅंक्यू.

कॉबोर्डावर हात बसला कि मग लिहीन तसा धागा.

खरे साहेबांचा फोटो गेल्या वेळी बघितला होता. बरं झालं ते आमच्या एरियात नव्हते. नाहीतर हँडसम म्हणून जी पब्लिसिटी झाली त्यातला कॉन्फिडन्सच गेला असता. पिक्चरमधे जाऊन हिरोच व्हायचं होतं. आमच्या कडं फक्त स्टाईल मारली कि काम व्हायचं.

आशु २९ जी, माफ करा. कॉबोर्ड मुळं प्रत्येक बाळाला उत्तर देता आलं नाही,
स्त्रिया चतुर हे तर किशोर कुमार साहेबांनी सांगितलेलं आहे सोयरा बानूला. पण चतुर बायका गप्प बसून ऐकतात. त्या सोंंग घेतात आणि नवर्याला चुका करू देतात.

एखादी मुलगी नवीन लग्न करून आली कि आसपाअस्च्या बायका काही दिवस नवीन नवर्याचं पण कौतुक करतात. म्हणजे तो गाफील राहतो. मग हळूच आपल्या नख्या बाहेर काढून त्या मुलीला सगळं शिकवतात. नवर्यावर संशय घेणं, नवरे बाहेर काय करू शकतात हे मीठमसाला लावून सांगतात आणि तिलाही आपल्यासारखी बनवतात. मग गंमत बघत बसतात. भांड्याला भांडं लागलं कि त्यांचा जीव भांड्यात पडत असतो.

असं पुरूषांचं नसतं. त्याचं अस नेटवर्किंग नसतं. त्यांना कुणी शिकवायला येत नसतं. नाहीतर एका बाईसाठी युद्ध करून लाखो का मेले असते?

प्रत्येक पुरुष देखणा आणि प्रत्येक स्त्री सुंदर असेलच असे नाही हे मान्य केले तरी आपण नीटनेटके राहू शकतोच.
स्वच्छ इस्त्रीचे आपल्याला शोभतील असे कपडे घालणे कोणालाही शक्य आहे.
चेहरा हसतमुख ठेवणे हे प्रयत्नपूर्वक करता येते.
शरीरयष्टी उत्तम ठेवणे हेही शक्य आहे!
कमांड हॉस्पिटल पुणे येथे CO(कमांडिंग ऑफिसर ) च्या कार्यालयाच्या बाहेर एक पूर्ण आकाराचा आरसा लावलेला होता आणि त्याच्या खाली लिहिलेले होते.Am I looking smart?
CO ला भेटण्याच्या अगोदर आपण आपले कपडे टोपी ठीक करून आपला बेल्ट नीट करून बूट साफ करूनच आत जाणे अपेक्षित होते.
माझ्या घरातून बाहेर पडताना असलेल्या बुटाच्या कापटवर मी पण आरसा लावलेला आहे.
बाहेर पडताना आपले बाह्यरुप व्यवस्थित ।आहे हे पाहूनच आम्ही बाहेर पडतो. ही एक सवय आहे.
आणि ती लावून घेण्यासाठी फार पैसे ही खर्च करावे लागत नाहीत.
मी "आहे असा आहे" हा दुराग्रहच बऱ्याच वेळेस अडसर बनून राहतो!

stubble beard ठेवणे ही आजकालची एक स्टाईल आहे.
अशा स्टाईल येतात आणि जातात.
नोकरीच्या मुलाखतीसाठी, सरकारी कार्यालयात न्यायालयात असे कुणी जात नाही.
Well groomed man is always appreciated.

<<<< नोकरीच्या मुलाखतीसाठी, सरकारी कार्यालयात, न्यायालयात असे कुणी जात नाही.
>>>>>

जातात.
बरेच लोकं आपली स्टाईल स्टेटमेंट जपतात.
एखाद्याकडे असे वागण्याचा कॉन्फिडन्स नसेल तर गोष्ट वेगळी. मग तो मन मारून जगतो.

जे धार्मिक कारणासाठी भली मोठी दाढी ठेवतात त्यांना चालते तर ज्यांना आवड आहे आणि शोभते ते छोटी ठेवू शकतातच.

बाकी क्लीन शेव म्हणजे वेल ग्रूमड आणि छान दाढी राखणे म्हणजे त्याच्या विरुद्ध हे ब्रिटिशांनी आपल्या मनात रुजवलेल्या कल्पना आहेत. बाहेर पडूया त्यातून आता.

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी किंवा विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी आपल्या नेहमीच्या दाढीत वरील ठिकाणी गेल्याने त्यांना हटकले जातेय असे दृश्य डोळ्यासमोर आले Happy

त्यामुळे जर सौंदर्य हा निकष ईतका महत्वाचा झाला असता तर सर्वसाधारण रूपाच्या बायकांची प्रेमप्रकरणे आणि प्रेमविवाह झाली नसती
https://www.youtube.com/watch?v=L0INTFQk1eM&list=RDL0INTFQk1eM&start_rad...

डॉक. सुबोध खरे अतिशय बरोबर नी वास्तविक सांगत आहेत, बऱ्याच मुली/ महिलांना चांगले राहता येत नाही, चांगले राहणे सहज शक्य असते. पण मी जशी आहे तशी आवडून घ्या असा त्यांचा दुराग्रह नवऱ्याकडे असतो.
माणसाने कधीही चांगलेच दिसावे ह्या मताचा मी आहे. सुंदर दिसणाऱ्या/राहणाऱ्या माणसाचे वेगळेच इंप्रेशन पडते, त्याना पाहूनही दिवस चांगला जातो किंवा प्रसन्न वाटते.

प्रदीर्घ व बऱ्यापैकी सुखी संसार केलेल्या ( तेंही प्रत्येकी एकेकाच पत्नीबरोबर ! Wink ) माझ्या व माझ्या अनेक मित्रांच्या अनुभवावरून सांगतो - बायकोशी बारीक सारीक खोटं बोलणं म्हणजे तिची फसवणूक किंवा विश्वासघात असतो असं अजिबात नाही; उलट, बहुतांशी, त्यात एक गंमत असते व त्याकडे दुर्लक्ष करून बायकाही त्यात सहभागी होत असतात. -

आता खूप काळजी वाटणारच ना, कारण तुम्ही लग्नापासून कधीच असे विचित्र नाही वागलात माझ्याशी ! काल तर देवळात जातो असं सांगून चक्क तिथेच गेलात, मित्रांच्या पत्त्यांच्या अड्ड्यावर न जातां !!20190201_190648 (2).jpg

(अर्थात, धाग्याच्या शीर्षकाचा संदर्भ अशा छोट्या, निष्कपटी खोटं बोलण्याशीच आहे, अशी माझी समजूत आहे. )

हो भाऊ गंमत असते
खोटे बोलण्यात सुद्धा आणि इतके वर्षाच्या अनुभवानंतर पकडण्यात सुद्धा Happy

भाऊंची व्यंगचित्रं आवडली.
खोटं बोलणारा नवरा आणि ते पकडणारी बायको यातलं व्यंग हा व्यंंगकारांचा आवडता विषय असतो.
नवरा बायको हे नातंच मजेशीर असतं. त्यात सगळे फ्लेवर्स नसतील तर जीवन बेचव होऊन जाईल.

*तुमच्या चित्रातल्या नवरा बायकोला घारु अण्णा व विमलाताई म्हणणार मी* - अगदी खुशाल ; माझ्या व्यंचिना नांवं ठेवणाऱ्या तुम्ही जणू पाहिल्याच असल्याचा दावा मात्र करू नका . खूप मोठी यादी आहे तुमच्या आधी !!! Wink

भाउ Lol

सामो
माबोवर घारू अण्णा नावाने एक आयडी आहे हां.
लोकं त्याला प्रेमाने घाऱ्या असेही म्हणतात.

बायकोशी खोटं बोलायचं आहे, पण का?
हा प्रश्न पडला मला.

>>>>>माबोवर घारू अण्णा नावाने एक आयडी आहे हां.
लोकं त्याला प्रेमाने घाऱ्या असेही म्हणतात.

अरे बाप रे Happy

>>>पण का?
हलका फुलका धागा आहे. नवरा व बायकोच्या स्वभावातील विसंगती हेरुन एग्झॅजरेट करुन बोलायचे आहे Happy

*बायकोशी खोटं बोलायचं आहे, पण का?*
- धागा " बायकोशी खोटं कसं बोलावं " असा आहे, " बोलावंच " असा नाही ! ज्यांना नाही खोटं बोलायचं/ बोलावंसं वाटत, त्यांनी खुशाल मुकावं त्या आनंदाला !!! Wink

>>>>>सामो जी, मला ते महुं समजलंच नाही. आत्ता समजलं. थॅंक्यू.
नो प्रॉब्लेम.

>>>>>असो, पण हा माहोल एन्जॉय करायला मी नेहमी वीस पंचवीस मिनिटे आधी थिएटरला पोहोचतो. आणि त्या वातावरणात ऑड मॅन आऊट ठरू नये म्हणून स्वतःही चांगले कपडे, गॉगल वगैरे घालून जातो Happy
मलाही नाटकाला मस्त कपडे घालून, मंद पर्फ्युम (होय मंदच कारण नाहीतर शेजारच्यांचे डोके उढू शकते) फवारुन, लवकर जायला आवडते. काय मस्त आवरुन, अत्तर, गजरा करुन लोक येतात. हे सिनेमाला होत नाही तिथे संमिश्र/ सर्व स्तरातील पब्लिक असते.
पण मराठी नाटाकांना आपले लोक फार छान तयार होउन येतात.

मी बरेचदा दाढीची खुटं, विस्कटलेले केस, कार्गो ट्राउजर , टी शर्ट वर फोटोग्राफर्स जॅकेट अशाच अवतारात असतो. पण नंतर क्लीन शेव्ह ठेवावी असा विचार केला. मग त्याला सूट होतील असे फॉर्मल्स , केस वगैरे व्यवस्थित बसवून काही दिवस ऑफीसला गेलो. तर एक दिवस बायको ऑफीसलाच टपकली. नेमके त्या दिवशी एक डेलिगेशन आलेलं त्यात एक सुंदर मुलगी होती.

बायको खूप दिवस आडून आडून तिच्याबद्दल विचारत होती. मग एक दिवस डोक्यात लख्ख प्रकाश पडला. नवरा एव्हढा व्यवस्थित का रहायला लागला याची माहीती काढायलाच ती आली होती. कारणं सगळी खोटी होती. बायका बिनदिक्कत खोटं बोलू शकतात. नवर्‍याला ते पकडणं अवघड असतं. पण मी कितीही सांगितलं कि ती एक दिवसासाठीच आली होती तरी तिचा विश्वास बसलेला नव्हता. मग मी सांगायचंच सोडून दिलं.

Pages