बायकोशी खोटं कसं बोलावं?

Submitted by Madan Hunkare on 11 May, 2026 - 11:39

आपण आपल्या बायकोला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. तिच्यावर आपण प्रेम करतो. तिला फिरायला नेणे, हॉटेलिंग, सिनेमा, नाटक हे तर असतंच. पण तिच्या मनी ध्यानी नसताना अचानक तिला आवडते त्या रंगाची साडी घेऊन देणे, तिच्यासोबत शॉपिंगला जाणे ही कामं आपण मनापासून करत असतो.

कारण आपली बायको ही लाडाची असते. ती जगात एकमेव असते. ती नाही तर आपण नाही. आईच्या कुशीतून लहानाचं मोठं होऊन बाहेर पडल्यावर बायकोनंच आपल्याला मोठ्याचं लहान केलेलं असतं. आईने आपल्याला पायावर पालथं पाडून ढुंगणावर चापट्या मारून न्हाऊ घातलेलं असतं, तर बायकोनं दिवाळीला उटणं लावून खरारा करून अंघोळ घातलेली असते. आपण त्याची परतफेड करत नाही तरी ती राग मनात धरत नाही. उलट आपल्याला चांगलं चुंगल फराळाचं करून घालते. त्याचं कौतुक केलं कि तिला अस्मान ठेंगणं होतं. काही जास्त अपेक्षा नसतात बिचारीच्या.

तरी पण त्या प्रेमापोटीच आपल्याला तिच्याशी खोटं बोलावं लागतं.
अशी वेळ तुमच्यावर कधी आली का? तो काय प्रसंग होता? आणि तुम्ही काय खोटं बोललात?
त्याची रूखरूख लागली असेल आणि बायकोला सांगता येत नाही असे झाले असेल तर इथे मनमोकळेपणाने व्यक्त व्हा आणि हलके व्हा.

इथे सांगितलेले प्रसंग वाचून ट्राय करू नये. हे फक्त बायकोवर प्रेम करणार्‍यांसाठीच आहे. बायको तुम्हाला किती ओळखते यावरून थापा किती मारायच्या हे ठरते. कुणाला जर अशा प्रसंगी काय थाप मारायची हे सुचत नसेल तर इथेच विचारा. जाणकार सल्ला देऊ शकतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*नंतरच्या पोस्टी धाग्याचा हेतू पाहता अस्थानी वाटतात. * -
खरे - खोटे हा अनंतकाळचाच झगडा असल्याने, तसं झालं असावं ! Wink

सूनबाई, तुझ्या , किंवा कोणाच्याही, नवऱ्याची गॅरेंटी मात्र देऊ नकोस ; गेल्या तीस वर्षात त्याच्या वडिलांच्या खोटं बोलण्याची माझ्याकडे चहाडी करणं, एवढंच खरं बोललाय तुझा नवरा !!IMG_20260515_092919.jpg

मी व माझी बायको -

समजावणीच्या सुरात - "आत्ता मला तुझा राग जरी आला असला तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे राणी. After all, I love you!"
नाक मुरडून - "हुं, After 'all' म्हणे!"
मधाळ स्वरात - "अगं, तू माझी पट्टराणी आहेस!"
ओठाचा चंबू करून - "हुं, बोलू नकोस मला."

भाउंची चित्रं धमाल आहेत. आवाज मासिकात असायची तशीच, अशी चित्रं काढायला अनुभव लागतो.

मुलांनो, तुम्हाला वाटलं असेल कि मदन कुठे गेला? मी इथच होतो मित्रांनो. नातवाचा जुना लॅपटॉप वापरतो ना, त्याचा कीबोर्डच चालत नव्हता. मोबाईलची बटणं दाबून जमत नाही. मग नातवालाच सांगितलंण.
मुलाचं वय झालंय, त्याला त्रास देऊ वाटत नाही, त्याला यातलं कळतही नाही. नातवाने घडीचा कीबोर्ड आणून जोडून दिला. झाला चालू.
फक्त हात आपोआप लॅ[अटॉपच्या कॉबोर्डकडं जातो. या कीबोर्डवर जरा चुका होतात, पण घ्या संभाळुन.
वयस्कर तरूण आहे.

माझा नवरा तर कशी झालीये भाजी वि चारले तर, पहीला घास घेण्याआधीच छान आहे बोलतो Sad
तसेच नवा ड्रेस घातला व खोलीत बराच अंधार असला .......... होल्ड युअर हॉर्सेस, हा काही रोमँटिक प्रसंग नाही. Wink
आणि विचारलं कशी दिसतेय, तर "छान दिसतेयस" म्हणतो. डोंबल्याचं!!
मग मी लाईट लावुन परत विचारते.

याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात
Reflex action Proud

पण बायकाना काय एवढी घाई असते.. पहिला घास पोटात जायच्या आधीच भाजी कशी झाली विचारायची.. खाऊ द्यावे चार घास सुखाने.. हवे तर तोपर्यंत चेहरा न्याहाळावा

हे तर सगळे नवरे करतात. पण सर्वच बायकांच्या लक्षात येत असेल हे आत्ता समजले.

शेवटी नवरा पण एक जीवच असतो. काय करेल तो तरी?
एकच प्रश्न फिरून फिरून विचारला तर कंटाळत असेल. त्याला भूतदया दाखवतं का कुणी?

ऋन्मेष Lol Lol
बरं घाबरुन असे होते म्हणावे तर, मी गरीब गाय आहे आणि हा वाघ तरीही हे असेच - प्रत्येक वेळी. आता मी विचारतच नाही Happy

हाहाहा ऋन्मेष व महु .... छान प्रतिसाद.

राजा हरिश्चंद्र ला मृत्यूनंतर नरकात पाठवलं. ते पाहिल्यावर तेथल्या लोकांना आश्चर्य वाटलं
त्यांनी विचारलं की तुमचे उदाहरण सत्यवचनासाठी दिलं जातं मग तुम्ही नरकात कसे?
त्यावर राजा हरिश्चंद्राने दुःखी आवाजात उत्तर दिलं
रोज सकाळी माझी बायको विचारत असे *मी कशी दिसते*?

डॉक. खरेंची पोस्ट आवडली!
मी ही एकदा जुन्या मैत्रिणीला कॉलेजच्या मेसेज सुरू केले, भरपूर गप्पा सुरू होत्या, बायकोपासून लपवून गप्पा मारत होतो तरीही तिच्या लक्ष आले, शक्य ती काळजी घेऊनही तिला कळले कसे? म्हणून विचारले तेव्हा तिने सांगितले, की मोबाईल मधे तो ड असताना गालातल्या गालात हसत होतास. हे मात्र लपवायला मला जमले नव्हते!

<<<< मोबाईल मधे तोंड असताना गालातल्या गालात हसत होतास. हे मात्र लपवायला मला जमले नव्हते!
>>>>>

मला याचे टेन्शन नसते. Thanks to u all..

कारण मी मैत्रिणीशी बोलत असो किंवा मायबोली किंवा व्हॉट्सॲपग्रूप उघडून बसलेलो असेना.. असाच हसत असतो. सेम इस्माईल Happy

एकदा खरेच मैत्रिणीशी गप्पा मारत असताना माझ्या आईने विचारले काय एवढा हसत आहेस??

त्यावर बायकोनेच परस्पर उत्तर दिले की अहो आई काही नाही मायबोली उघडून बसला असेल, तिथे कोणाशी तरी वाद घालत असेल, कोणालातरी पिडत असेल Wink

नवीन ड्रेस घातल्यावर मी कशी दिसते हे बायकांनी नवऱ्याला विचारूच नये.. पुरुषांना त्याचे उत्तर देण्यात काडीचाही इंटरेस्ट नसतो. मनातल्या मनात ते म्हणत असतात की काहीही घाल आणि कशीही दिस.. मला काय आता त्याचे.. बघणार तर तुला दुसऱ्या बायकांचे नवरे Happy

>>>>>>>नवीन ड्रेस घातल्यावर मी कशी दिसते हे बायकांनी नवऱ्याला विचारूच नये
घरकी मुर्गी दाल बराबर असते बस्स्स्स्स्स्स!!! हे आणि हेच्च्च्च्च्च्च्च कारण आहे. बायकोला दात ब्रश करताना, अवतारात वगैरे सर्व भूमिकांमध्ये पाहून शेवटी ग्लॅमर गेलेले असते. अरे दुसर्‍या बायका दात घासत नाहीका, त्या अवतारात नसतत का?

एक नम्रतेने सुचवावंसं वाटतं कि बायकांनी दात घासू नयेत, घासायचे असतील तर त्यासाठी एक वेगळा फ्लॅट भाड्याने घ्यावा, तिथे तयार होऊन चकाचक नवर्‍यापुढे यावं. म्हणजे ग्लॅमर जाणार नाही.

<<< अरे दुसर्‍या बायका दात घासत नाहीका, त्या अवतारात नसतत का?
>>>

असतात ना..
पण त्या त्याही अवतारात छान वाटतात Happy
किंबहुना बरेचदा तश्याच जास्त छान वाटतात.

>>>>>>>पण त्या त्याही अवतारात छान वाटतात Happy
मला वाटते पुरुष अति बहिर्मुख असतात. जरा ब्लिंग ब्लिंग चकाकणारं दिसलं , त्यांना आवडतं. याउलट स्त्रियांकरता 'कनेक्शन' महत्वाचे असते. महु यावरी एक धागा मंगता है Happy तो ही तुमच्या ष्टायलीत.

<<<< जरा ब्लिंग ब्लिंग चकाकणारं दिसलं , त्यांना आवडतं. याउलट स्त्रियांकरता 'कनेक्शन' महत्वाचे असते.
>>>>

असे सरसकट नसावे किंवा मग मी अपवाद असेल... कदाचित पुन्हा माझी कर्क रास याला कारणीभूत ठरली असेल Proud

पुरूषांना रोमान्स आवडतो पण त्यांना खूप इतर गोष्टी आवडत असतात,
ट्रेकिंग, भटक्ण्ती, साहस, क्रिकेट, दारू, जुगार, मटका, गाणं. मित्र. बायकांना रोमान्स ८०% महत्वाचा वाटत असेल तर पुरूषाला २०%,
पुरूषाचा सर्वात आवडता छंद काय असेल तर तो सत्ता गाजवणे, रस्त्यात नडणार्‍यांना मर्दानगी दाखवणे. लढाई करणे हे बाप्पानेच त्याच्या डोक्यात फीड केले आहे.

महाभारत काळापासून बायका लढायांना कारण होतात. एका बाईचा अपमान होतो, ती शपथ खाते आणि लाख दीड लाख पुरूष मरतात. एव्हढे मेल्यावर पण कुणी बिचारे पुरूष म्हणत नाही. उलट ती बाई आपला पण पुरा करते. थाटात मोकळ्या केसाचा अंबाडा बांधते, एव्हढे पुरूष मोकळ्या केसांमुळं मेले त्याचं काहीच नाही. त्यांना काही लढायला जायचं नसतं . मग रोमान्स साठी भरपूर वेळ राहतो.

उलट पुरूषाला २०% रोमान्स साठी ८०% इतर गोष्टी शिकून घ्याव्याच लागतात.
बचेंगे तो और भी रोमान्सेंगे.

पूर्वी तसे असेल. आता स्त्रियांकरता आभाळ खुले आहे. त्यांना देशविदेशांत एकटे दुकटे फिरणे, खेळ खेळणे, वाचन, अन्य मैत्रांबरोबरचे कनेक्शन, शिक्षण, सेल्फ इम्प्रुव्हमेन्ट (स्व-सुधारणा) अश्या नानाविध विषयांत रस असतो. रोमॅन्समध्ये रस असेलच असे नसते.

बायकोला दात ब्रश करताना, अवतारात वगैरे सर्व भूमिकांमध्ये पाहून शेवटी ग्लॅमर गेलेले असते.

ज्यांचे ठरवून लग्न झालेले आहे ( अरेंज्ड) त्यांनी मुलगी पाहताना एका गोष्टीची कल्पना करणे आवश्यक आहे. हि मुलगी नाईट गाऊन मध्ये डोक्याला तेल लावलेली असताना कशी दिसेल. अशी असताना आपल्याला पसंत असेल तर पुढे दुःख करावे लागणार नाही.

याचे कारण दाखवायला आलेली मुलगी हि सर्वात सुंदर कशी दिसेल याची सर्वतोपरी काळजी घेऊन आलेली असते आणि दाखवायच्या वेळेस बहुतांशी तुमच्याशी कोणताही वाद न घालता हो ला हो करणार असते. SHE IS IN HER BEST LOOKS AND BEHAVIOUR.

हीच गोष्ट प्रेमविवाहात सुद्धा बऱ्याच प्रमाणात सत्य आहे. जोवर तुम्ही एकत्र राहायला लागत नाही तोवर तुम्हाला आपल्या जोडीदाराचे बरेच पैलू लक्षात येत नाहीत.

हीच गोष्ट मुलाच्या बाबतीत सुद्धा आहे. पण मुलाचे रूप थोडे कमी असेल तर ते पत्करायची बऱ्याच मुलींची तयारी असते. मुली केवळ रूप ना पाहता इतर बऱ्याच गोष्टी पाहत असतात याचे कारण एकंदर आयुष्यात लग्नात त्यांची गुंतवणूक मुलांपेक्षा जास्त असते.

मी माझ्या एम डी च्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असे. वयाच्या पंचविशीला तुम्ही सुंदर दिसत नसाल तर ते तुमचं दुर्दैव आहे. पण पंचविशीला तुमची बायको/ नवरा सुंदर नसेल तर तो तुमचा गाढवपणा आहे

( सौंदर्याची व्याख्या ज्याची त्याची वेगळी असते. मल्याळी मुलाला सरदारांनी आवडणार नाही).

यावर एक मुलगी मला विचारती झाली कि सर तुम्ही असं कसं म्हणता?

मी तीला शांतपणे म्हणालो - हे बघ सकाळी उठून तू ज्याचा चेहरा सर्वात प्रथम पाहणार, तोच जर चांगला नसेल तर दिवस कसा चांगला जाणार? आयुष्य तर लांब राहिलं

यावर सर्व विद्यार्थ्यांचा तेथे हास्यकल्लोळ झाला.

बायको फार सुंदर नसली तरी चालते. कारण लग्न वर्षभर जुने होताच आपल्याच बायकोच्या सौंदर्याचे काही अप्रूप उरत नाही.

म्हणजे रोज रात्री ज्या बाईसोबत झोपायचे तीच सकाळी डोळे उघडल्यावर बघायची त्यात आयुष्यभर कशी मजा येणार मग भले ती कितीही सुंदर का असेना..

त्या ऐवजी बायको अशी हवी जी आपल्याला कंफर्ट झोन देईल. तिच्याशी काहीही बोलताना किंवा तिच्यासमोर कसेही वागताना फार विचार करावा लागणार नाही.

पहाटे, नवरा झोपलेला असताना मी अजुनही त्याच्या पापण्यांचे लांब केस बघत असते Happy पूर्वी दाट होते आता जरा विरळ झालेत. डोळ्यांच्या पापण्यांवरती सुरकुत्या आल्यात.
अजुनही त्याची पाठ असताना त्याच्या पाठीवरच्या तीळांत नक्षत्रे शोधत असते .
तेव्हा सौंदर्य किंवा देखणेपणाचे अप्रुप उरत नाही हे खोटे आहे. फक्त स्वभवातल्या धारदार कडा कळलेल्या असतात आणि त्या नॅव्हिगेट करायला आपणही शिकतो.
यीटस ची ही कविता फार आवडते.
.
When you are old and grey and full of sleep,
And nodding by the fire, take down this book,
And slowly read, and dream of the soft look
Your eyes had once, and of their shadows deep;
.
How many loved your moments of glad grace,
And loved your beauty with love false or true,
But one man loved the pilgrim soul in you,
And loved the sorrows of your changing face;
.
And bending down beside the glowing bars,
Murmur, a little sadly, how Love fled
And paced upon the mountains overhead
And hid his face amid a crowd of stars.

<<< तेव्हा सौंदर्य किंवा देखणेपणाचे अप्रुप उरत नाही हे खोटे आहे.
>>>

सौंदर्याचा आस्वाद घेतला जातो त्या त्या वेळच्या आपल्या मूडनुसार..
पण अप्रूप मात्र नेहमी त्याचेच असते जी वस्तू आपल्याला प्राप्त झालेली नसते हा मानवी स्वभाव आहे.

साहेब, मी सुरवातीलाच बायकोची ठाम समजूत करून ठेवलीय, मी १00% खोटारडा आहे म्हणून ! आता मस्तपैकी, " आज मित्रांबरोबर पार्टी आहे ", " अज घोड्यांच्या रेसवर 1000 रुपये हरलो ", " काल ऑफिसने मेमो दिलाय ".. सगळं, सगळं घरी खरं सांगतो आणि तिला तें खोटंच वाटतं !!I IMG_20260515_102555_1.jpg

माझा नवरा तर कशी झालीये भाजी वि चारले तर, पहिला घास घेण्याआधीच छान आहे बोलतो Sad>>सार्वत्रिक सत्य सामो..किंवा नो कमेंट इज द बेस्ट कमेंट असे असते.
यावरील ऋ. चा प्रतिसादही पटला.

Pages