आता तुम्हाला हा खेळ माहिती झाला आहे, तेव्हा नव्याने त्याबद्दल लिहीत नाही.
मला पटकन आठवलेली गाणी लिहून सुरुवात करून देते.
मराठी:
बुगडी माझी सांडली गं जाता सातार्याला
चाळ माझ्या पायांत, पाय माझे तालात, नाचते मी तोर्यात मोरावाणी
चढविला पट्टा कमरेवरी
पैंजणं हरिची वाजली
शालू हिरवा... नवरत्नांची माला
पडला पदर, खांदा तुझा दिसतो, कमरेला कमरपट्टा कसतो गं
ना मानोगे तो दूँगी तोहे गारी रे... बाजुबंद खोल मोरी चुनरी भी फारी रे
एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज
पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा
हिंदी:
झुमका गिरा रे बरेली के बाजार में
मिला है किसी का झूमका ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
कान में झुमका, चाल में ठुमका, कमर पे चोटी लटके
पायलिया गीत सुनाये
बाजे पायल छुन छुन
छम छम घुंगरू बोले
छम छम घुंगरू बोले मेरी चाल नशीली डोले
कंगना रे कंगना रे
चूडी मजा न देगी, कंगन मजा न देगा
मेरे हाथों में नौ नौ चूडियाँ हैं
आकर्ण अरुणवर्ण नेत्र श्रवणि
आकर्ण अरुणवर्ण नेत्र श्रवणि दिव्य कुंडले
डोलाताति पुष्पहार भार फार दाटले
अष्टदंडि बाजुबंदी कंकणादि मुद्रिका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||२||
इंद्रनीळ पद्मराग पाचहीर वेगळा
पायघोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा
पैंजणादि भूषणेच लोपल्याती पादुका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||३||
-------------------------------
कोल्हापूर शहर । अवतीभवतीनं पानमळा ।
पूजा घेती तीन वेळां । अंबाबाई ॥
कोल्हापूर शहर । अवतीभवतीनं सोनार ।
नवा घडविला चंद्रहार । अंबाबाईला ॥
कोल्हापूर शहर । अवतीभवतीनं तांबट ।
नित्य पूजेला नवं ताट । अंबाबाईला ॥
कोल्हापूर शहर । अवतीभवतीनं पटवेगार ।
बाजूबंदाला गोंडे लाल । अंबाबाईला ॥
कोल्हापूर शहर । अवतीभवतीनं हंडे हंडे ।
तुझ्या गस्तीला राजा हिंडे । अंबाबाई ॥
-----------------------------------------------------------
देवळाची अघटित रचना । अवलोकन केले नयनां ॥
खांबांची गणती नाही ॥
नेसुनी पितांबर पिवळा । भरजरिची घालुनि चोळी ।
नाकीचा निर्मळ मोती । मळवट सदोदित भाळीं ॥
पाहुनिया अंबाबाई । मन माझे तल्लिन झाले ॥
महाळुंग उजवे हातीं । शिवलिंग मस्तकावरती ।
सूर्यकिरण मुखावरि आले ॥
पाहुनिया अंबाबाई । मन माजे तल्लिन झाले ।
-----------------------------
इंदु जोदण्यांवरी तानिवडे, वरती नागबंदाची फुले ।
हंसळिया भोवरिया, वरी पदक ल्यायली लेणे ।
नासिक रत्नबिंब, गळां ल्याइली त्रिदळ पाटी ॥
ऐसी बाळा कोल्हापूरची, महालक्ष्मी गोमटी ॥५॥
इंदु जोडवी, ल्याइली तोडे. सरळ साखळ्या हातीं काकणे ॥
ल्याइली नागदोरे. गळां ल्याइली सरी ॥६॥
----------------------
मळवट कस्तुरीचा । गळा हार रत्नांचा ॥
त्रिशूळ डमरू हातीं । गर्व हरिला दैत्यांचा ॥
वधिला महिषासुर । थोर प्रताप भूजांचा ॥ जय. ॥ २ ॥
शृंगार जडित लेणे । कटडियांची भूषणे ॥
अंदुवा झणत्कार । ढाळ देती रत्नांचा ॥
पाईचे पोल्हार । वाजती रुणझुण ॥ जय. ॥ ३ ॥
------------------
कोटीमदनरूपा ऎसी मुखशोभा ।
सर्वांगी भुषणें जांबूनदगाभा नासाग्री मुक्ताफळदिनमणिची प्रभा ॥
भक्तजनांते अभया देसी तूं अंबा ॥
--------------------------
झळझळ झळझळ झळकति तानवडें कर्णी ।
तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं ।
ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी ।
अद्भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ॥
---------------------
तानवडें…
तानवडें…
हा दागिना बघायला काय ऐकायलाही दुर्लभ. विठ्ठल-रखुमाईच्या वर्णनात वाचला होता, सुमारे २० वर्षांआधी !
नथ बेसर बालम मंगवा दोhttps:/
नथ बेसर बालम मंगवा दो
https://youtu.be/laz3TJMDFmE?si=20OZePDzbEXGJviI
मैने साम साम रक्खे तेरे झांझरोके जोडे
https://youtu.be/oafxkMv4xnc?si=6Blt30ZnpbJ6m0na
संदली संदली नैनाविच
https://youtu.be/YpkJO_GrCo0?si=Ct1g6-7bIQgG7XOS
शालू भरजरी नेसुन आले
शालू भरजरी नेसुन आले
कानी कर्णफुले नथही ल्याले
शृंगार करून घाईघाईने रंगमहाली उभी राहिले
वाट पाहुन नयन सख्या शिणले राती रडून एकली मी निजले
गायिका उषा मंगेशकर आहे.
पायलवाली देखना : एक राज
पायलवाली देखना : एक राज
मैने देखा था सपनों में इक चंद्रहार : गबन
पडला पदर खांदा तुझा दिसतो ग, कमरेला कंबरपट्टा कसतो : भाऊबीज
हौस पुरावा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज: सोनाराने टोचलं कान
सुखकर्ता दुखहर्ता मध्ये बर्याच अलंकाराचे उल्लेख आहेत.
<सुखकर्ता दुखहर्ता मध्ये बर्
<सुखकर्ता दुखहर्ता मध्ये बर्याच अलंकाराचे उल्लेख आहेत.> खरंच की.
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
रत्नखचित फरा तुज गौरीकुमार
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रात्र काळी घागर काळी
रात्र काळी घागर काळी
यमुना जळे ही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळा मोती एकावळी काळी वो माय
झन झन झन झन पायल बाजे कैसे जाऊ पी से मिलन को
पिया तोसे नैना लागे रे
मैने “पायल” है छनकाई, फिर
मैने “पायल” है छनकाई, फिर क्यूँ आया ना हरजाई….
ओ-हो-हो …. गरबा फेम फाल्गुनी पाठक
https://m.youtube.com/watch?v=oEV2TUEyPy4
Pages