टक्कल एक गंभीर आजार

Submitted by Madan Hunkare on 30 April, 2026 - 22:45

टक्कल का पडते याबद्दल लहानपणापासून कुतूहल आहे.

आज शेवटाकडे जाताना जे समजलं ते सर्वांना सांगू इच्छितो. खूप अभ्यास केल्याने किंवा खूप जास्त विचार केल्याने टक्कल पडतं असा माझा निष्कर्ष आहे. मी कधीच जास्त वाचत नाही. विचार तर बिल्कुल करत नाही.

सर्वच विचारवंत टक्कलवंत असं नाही. विचारांचा लोड घेणार्‍यांना टक्कल पडतं असं वाटतं.
समुद्रकिनारी राहणार्‍या लोकांना आणि नारळ जास्त वापरणार्‍यांना टक्कल पडत नाही असाही समज आहे. नारळाचं तेल, नारळ खाल्ला कि केस गळत नाहीत. जेवणात पण नारळाचं तेल असणार्‍यांना ते वरदान आहे. तसंच दमट हवामानात मासे खाल्ल्याने पण टक्कल पडत नाही. बंगाली लोकांचे आणि केरळी लोकांचे केस दाट असतात.

पण केरळात टकले पण खूप वाढले आहेत. याचे कारण काय असेय?
मग मला समजले कि केरळात शि़क्षणाचे प्रमाण भारतात सर्वात जास्त आहे. म्हणजे टक्कल हे समुद्रकिनारी सुद्धा शिक्षणाद्वारे आक्रमण करते.
टकलाचे जंतू हे विचार करणार्‍या व्यक्तींवर हल्ला करतात.

जसे पावसाळ्यात सगळेच आजारी पड्त नाहीत तसे सगळेच टकले होत नाहीत. एका घरात एक माणूस टकला झाला कि त्याला संसर्ग होतो. त्यामुळे टकल्या माणसाचा कंगवा, साबण वापरू नये.

या निष्कर्षावर विद्वान लोकांनी संशोधन केले तर टक्कलाचे उच्चाटन करण्यास मद्त मिळेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेन्शन घेतले की केस पिकतात किंवा टक्कल पडते हे खरे असावे. माझ्या आयुष्यात अशी फेज असताना केस गळणे आणि केस पिकणे असे अनुभव घेतले आहेत. हा आपल्याला देवाने दिलेला सिग्नल असतो की बस आता उगाच जास्त टेन्शन घेऊ नकोस. मजेत जग.