Submitted by उपाशी बोका on 22 April, 2026 - 14:19
साधना यांचे शेती याविषयी लिहिलेले अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद वाड्यावरून वाहून जातात. म्हणून एक स्वतंत्र धागा सुरू करत आहे. इथे शेती संदर्भात साधना यांचे प्रतिसाद एकाच ठिकाणी मिळू शकतील आणि शेतीविषयी समस्या, उपाय आणि अनुभव यांची सर्वांना चर्चा करता येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाणी फाऊंडेशन जी शेती प्रमोट
पाणी फाऊंडेशन जी शेती प्रमोट करतेय ती शास्वत आहे कारण शक्य तिथे नैसर्गिक निविष्ठा वापरा व आवश्यक तिथे रासायनिक निविष्ठा वापरा हे जे आजच्या महाराष्ट्र कृषी विभागाचे व विद्यापिठांचे धोरण आहे तेच पा फा प्रमोट करतेय् आणि रिस्क व खर्च कमी व्हावा यासाठी गटशेती प्रमोट करतेय. उद्या गट मोठे झाले व चांगले कमाऊ लागले तर ते एफ पि ओ बनवुन त्याण्चे मॉडेल मोठ्या प्रमाणात राबवु शकतात.
सामो, पंजाबात जंगलराज आहे का ते माहित नाही. उडता पंजाब पाहिला तर तसा समज होऊ शकतो.
पण तिथे अडतेराज मात्र नक्कीच आहे. आज अस्तोत्वात असलेल्या नियमानुसार कुठलाही शेतकरी एपिएमसीच्या बाहेर विकु शकत नाही. म्हणजेच तो त्याचा माल घेऊन रस्त्यावर बसु शकत नाही. त्याने तसे केल्यास त्याला अडत्याची म्हणजे एपिएमसम्ची फी भरावी लागते. नव्या कायद्यात शेतकरी कुठेही विकु शकतो, एपिएमसीची भिती नाही. पंजाबात रुलिंग पार्टीतले कित्येक एपिएम्सीचे अडते आहेत. त्यांचे ठाणे उठले असते म्हणुन सगळ्यात जास्त विरोध तिकडे झाला.
राज्य पातळीवर महाराष्ट्रात तिन पैकी दोन रुल्स आधीच आहेत. त्यामुळे इथले शेतकरी ठंड होते.
Submitted by साधना on 21 April, 2026
पानी फा ने आजवर कोणाही शेतकर्
पानी फा ने आजवर कोणाही शेतकर्याला वॉटर व फार्मर कपचे बक्षिस सोडुन एकही पैसा दिला नाहीय. दिलेय ते मोटिवेशन, दिशा व ज्ञान. त्याचा खुप फायदा झाला. जिथे १२ ही महिने शेती होते तिथे शेतकर्यांनी खुप फायदा करुन घेतला. एक शेतकरी गट जो आधी शुन्य होता तो दोन वर्षात एक करोड टर्नोव्हरला पोचला. फार्मर कप चे २५ लाख बक्षिस होते. जो गट गेल्या वर्षी जिंक्ला त्यांनी ह्यापेक्षा जास्त प्रॉफिट शेतीत कमावला. फार्मर कप बोनस ठरला त्यांना.
कोकणात परिस्थिती खुप वेगळी आहे. इथे १२ महिने शेती शक्य नाही आणि ती करोड रुपयाची टर्नोव्हरवाली शेतीही शक्य नाही. त्यामुळे फक्त भात व नाचणीवर लक्ष केंद्रित आहे.
Submitted by साधना on 22 April, 2026
https://www.sahyadrifarms.com
https://www.sahyadrifarms.com/
मी इथून घेत होते. त्यांच्या वेबसाईटवर विलास शिंदे यांचे नाव आहे. कोव्हिडनंतर बाजार सुरु झाल्यावर मला जास्त चांगल्या दर्जाच्या भाज्या खरेदी करता येऊ लागल्या एवढेच. आता त्यांच्या साईटवर फळे दिसत आहेत, भाज्या नाही. कदाचित त्यावेळी तात्पुरत्या ठेवल्या असतील.
सध्या मी किसान कनेक्ट वापरते अधूनमधून. ती नगरबेस्ड कंपनी आहे.
Submitted by माझेमन on 21 April, 2026
विकेंद्रित सहकारी शेती जी
विकेंद्रित सहकारी शेती जी पर्यावरणस्नेही आणि शाश्वत असेल आणि ती शेतकऱ्याला फायदेशीर असेल हाच सर्वोत्तम पर्याय वाटतो मला.
विलास शिंदेंची गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे!
Submitted by जिज्ञासा on 21 April, 2026
छान पोस्ट आहेत शेतीविषयक
छान पोस्ट आहेत शेतीविषयक
पाणी foundation ने पाणी ह्या विषयावर भरपूर काम करून आता मुळाशी जात परत सस्टनेबल शेती कडे नेट आहेत हे फार छान आहे.
ह्याचेही विडीओ करून काम पब्लिश व्हायला हवे.
जागरूकता वाढते.
गावी शेती स्वयंपूर्ण पद्ध्तीने असायची.
बियाणे स्वतःचेच पारंपारिक तयार केलेले, खत घरचे, थोडीफार कीटकनाशके लागायची.
आता बियाणे प्रत्येक वर्षी विकत घ्यायचे ( त्याचा दर, त्यात डुप्लिकेट बियाणे वै आपल्या हातात काहीच नाही. ) खत युरिया वर जोर हे हळूहळू होत गेले.
घरच्या गाई म्हशी बैलांना शेतातला वैरण चारा असायचा, आता डेअरी मधूनच पशुखाद्य विकत।
स्वयंपूर्ण कडून दुसर्यावर अवलंबून होत गेल्याने शेती आतबट्याचा व्यवहार होत गेली.
पवन कोणीतरी चक्र उलटे फिरवायला प्रयत्न करतेय हे ही नसे थोडके.
Submitted by झकासराव on 22 April, 2026
उबो मनापासुन धन्यवाद…
उबो मनापासुन धन्यवाद…
मी या विषयावर लिहिते आहेच.
शेती हा अतिशय मेहनतीचा,
शेती हा अतिशय मेहनतीचा, बेभरवशाचा आणि क्वचितच किंवा फार कमी फायदा होणारा धंदा आहे. तरीही शेतकरी हा शेतीचा धंदा का करतात, हा मला कायम पडणारा प्रश्न आहे.
विशेषत: महाराष्ट्रातील शेतकरी तर
नेहमीचबहुतेकदा रडत असतात की यंदा पीक चांगले आले नाही, नुकसान झाले, आता सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे. पिढ्यानपिढ्या शेतीमध्ये वाटण्या होऊन जर हातात अर्धा, एक किंवा जेमतेम ५ एकर जमीन असेल तर कितीसा फायदा होईल आणि त्यात पोट भरता येईल का, हा साधा विचार कुणी का करत नाही? आणि मग कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या करतात. हे आत्महत्येचे प्रकार केवळ महाराष्ट्रातच होतात का? की पंजाब, तामिळनाडू आणि इतर राज्यात पण तितकेच होतात? भारतातच होतात की जगात सर्वत्र होतात, याबद्दल कुणी विचार करतं का?माझ्या मते तर शेती झेपत नसेल तर त्यापेक्षा शेती विकून त्या पैशात एखादे किराणामालाचे दुकान किंवा चहाची टपरी टाकावी किंवा दुसरा व्यवसाय/नोकरी करावी. पूर्वी भांड्यांना कल्हई करणारे, सुरीला धार लाऊन देणारे, कापूस पिंजून देणारे, बांगड्यांचे कासार असे अनेक जण होते. बहुतेकांचे व्यवसाय कालौघात बंद पडले, तर त्यांनी आत्महत्या केल्या का? ते आता काय करतात? मग शेतकरी ते करू शकत नाहीत का?
एक गोष्ट चांगली आहे की नवीन पिढीला कळत आहे की हा आतबट्ट्याचा धंदा आहे, त्यामुळे त्यांना शेतीत फारसा उत्साह नाही. माझ्या मते या सगळ्यावर एकच उपाय आहे. अमूल दूध उत्पादनासारखे (cooperative) सहकारी मॉडेल आणावे किंवा कॉर्पोरेट कंपन्यांनी या क्षेत्रात उतरावे. (उदा. ITC, गोदरेज, महिंद्रा कृषीउद्योग यांच्याप्रमाणे). शेतकऱ्यांना शेतीची इतकीच आवड असेल तर त्यांनी अमूलप्रमाणे सहकारी मॉडेलने शेती करावी, ग्राहकाला थेट माल विकावा, नाही तर कॉर्पोरेट कंपनीला शेती विकून त्यांच्याकडे नोकरी करून शेतीची हौस भागवावी.
उबो किराणा दुकान चालवणे
उबो किराणा दुकान चालवणे तितकेच कठिण आहे जितके शेती. गावात किराणा दुकान असेल तर त्यात ९५ टक्क्यांपर्यंत उधारी चालते. लोक देतात थोडे थोडे पैसे, त्याला दोन महिने ते वर्ष लागु शकते.
शेवटी प्रत्येक धंद्यात स्किल हवे. ते नसले तर शुन्य. शेतीतही स्किल हवे ज्याची वानवा आहे.
शेतकरी आत्महत्यांमागे खुप कारणे आहेत. कित्येक शेतकर्यांच्या विधवांनी त्यांच्या मागे तीच शेती नीट चालवुन पोटे भरलेली आहेत.
शेवटी प्रत्येक धंद्यात स्किल
शेवटी प्रत्येक धंद्यात स्किल हवे. >>
प्रत्येक शेतकऱ्याने धंदाच करावा असं थोडंच आहे. तसं म्हटलं तर नोकरी करायला पण स्किल हवे. चहाची टपरी, वडापावची गाडी यात असे काय विशेष स्किल हवे? अनेक अशिक्षित लोकही असले उद्योग करून पोट भरतात. माझ्या माहितीत एकाने गावी लग्नाचा हॉल बांधला आहे. एक जण इलेक्ट्रिकची कामे करतो, एकजण केबल टीव्ही चालवतो. पोट भरायची वेळ आली की माणूस काहीतरी धडपड करतोच. मग यात आणि शेतीमध्ये असा काय फरक आहे किंवा शेतीत इतके काय उदात्त आहे की नुकसान होत असेल तरी हा धंदा करावा? उलट शेती हा इतका कष्टाचा, बेभरवशाचा आणि अत्यल्प मोबदला देणारा असेल तर शेती करावी कशाला?
केवळ उत्सुकता म्हणून शेतीमधील उत्पन्नाचे आकडे शोधले, तेव्हा ही सरकारी माहिती मिळाली ज्यानुसार महाराष्ट्रात सरासरी महिना ₹ ११,४९२ फक्त मिळतात. (आकडेवारी जुनी आहे, आता थोडे जास्त उत्पन्न असेल.) इतके कमी उत्पन्न असेल तर कुणी शेती का करावी आणि मग सरकारकडे दरवेळी भीक का मागावी? शेतकरी आणि शेतीचे उगीचच उदात्तीकरण करून ठेवले आहे. त्यापेक्षा मुंबईत caregiver चे काम केले तर खाऊन पिऊन आणि रहायची सोय होऊन महिन्याला ₹ २०,००० तरी मिळतात. मग शेती करायची कशाला? असा विचार कुणी केला तर काय चुकले?
इतर मुद्देपण माझ्या वरील प्रतिसादात मांडले आहेत.
शेती असेल तर केली नाही तरी
शेती असेल तर केली नाही तरी अगदी नाईलाज नसेल तर जमीन विकू नये
शेवटी प्रत्येक धंद्यात स्किल
शेवटी प्रत्येक धंद्यात स्किल हवे. >>
प्रत्येक शेतकऱ्याने धंदाच करावा असं थोडंच आहे>>>
हाहा…. शेती हाच धंदा समजुन करावा आणि सगळ्यात आधी त्या धंद्याचे स्किल शिकुन घ्यावे असे मला म्हणायचेय. कुठला शेतकरी आज शेतीकडे धंदा म्हणुन बघतोय? आमच्याकडे तर म्हणतात ‘उगीच पड नको राहायला म्हणुन काहीतरी करायचे‘ हा दृष्टीकोन ठेवला तर काय भले होणार आहे?
आजचा शेतकरी हातात स्मार्टफोन खेळवतो पण शेती करायची वेळ आली की तीच बाबा आदमच्या जमान्यातली पद्धत वापरतो. आज निसर्ग बदललाय, आज तीच जुनी पद्धत वापरत बसलेले शेतकरी बुडणारच.
दुसऱ्या एका धाग्यावर पुढील
दुसऱ्या एका धाग्यावर पुढील प्रतिसाद दिसला.
<< आपणही आता शेती करावी वाटू लागलं आहे >>
शेती करायची असेल तर आधी "स्टार्टअप महाराष्ट्र"चा हा व्हिडिओ बघा. शेती हा प्रकार बिझनेस म्हणून बघितला पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. समाजसेवा किंवा आवड म्हणून शेती करायला गेलात तर उपाशी राहाल.
५० मिनिटांचा व्हिडिओ कुणी बघेल याची शक्यता कमी वाटते, म्हणून सार थोडक्यात लिहितो.
- मुक्तक जोशी (ऑलगॅनिक फार्म, संभाजीनगर) यांनी शेतीचा काहीही अनुभव नसताना १ गुंठा शेती विकत घेऊन हळूहळू ती वाढवत नेली. अनेक स्टार्टअपमध्ये काम केल्यावर ते शेतीकडे वळले. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, जवळपास १२ हजार किमी प्रवास करून, त्यांनी नक्की काय चुकतंय याचा सखोल अभ्यास करून, शेतीचा उद्योग वाढवत नेला. त्यांची मते:
- शेतीचे प्रॉब्लेम म्हणजे शेतकरी स्वतःच शेतीकडे बिझनेस म्हणून बघत नाही, पोर्टफोलिओ diversification करत नाही आणि विक्री स्वतः करत नाही.
- शेतकऱ्यांमुळेच निसर्ग कोपतोय कारण ते भरमसाठ रासायनिक खते वापरत आहेत.
- फोकस्ड आणि गणिती हिशोब करून शेती करणे गरजेचे आहे, तर पैसे नक्की मिळू शकतात.
- शेती तोट्याची होण्यामागे कॅशफ्लो हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच रिस्क रिवार्ड रेशिओ बघितला पाहिजे. Input cost कमी केली पाहिजे.
- शेती हा मोठा जुगार आहे, त्यामुळे अत्यंत गरीब माणसाने शेती करू नये. त्याला सोबत जोडधंदा ( उदा. electrician, welding वगैरे) करणे आवश्यक आहे म्हणजे शेतीत नुकसान झाले तरी काही उत्पन्न मिळू शकेल, अश्याच माणसाने शेती करावी.
- अभ्यास करून मग शेती करणे गरजेचे आहे.
- लोकांना स्वस्तात अन्न हवे हा गैरसमज आहे. चांगल्या अन्नासाठी जास्त पैसे द्यायला लोक तयार असतात. विश्वासार्हता फार महत्त्वाची आहे. पण त्याचवेळी जर परवडत नसेल तर हा उद्योग करू नये.
- गोपालन (दूध, तूप, लोणी, चक्का, दही, ताक), कोंबड्या (मांसविक्री आणि अंडी), बोकड/शेळीपालन वगैरे पूरक धंदे कॅशफ्लोसाठी उपयुक्त ठरतात.
- companion planting करावे. उदा. मक्याबरोबर चवळी किंवा कोथिंबीर, टोमॅटोबरोबर बेसिल, बाजरीबरोबर मटकी वगैरे.
- शेतीमध्ये turn-around time आणि variables खूप जास्त असतात. त्यामुळे त्यांनी कमी वेळेत खूप प्रयोग करून बघितले.
- नीट अभ्यास करून शेती केली तर ती नक्कीच फायद्याची होऊ शकते.
companion planting करावे. उदा
companion planting करावे. उदा. मक्याबरोबर चवळी किंवा कोथिंबीर, टोमॅटोबरोबर बेसिल, बाजरीबरोबर मटकी वगैरे.
मिश्र शेती ? हे तर आम्ही लहान (आत्ता ४० चा असणार मिलेनियल) असताना पासून आमची माती आमची माणसे मधे डॉ. बुधाजीराव मुळीक आणि मानसिंग पवार सांगत असत ! दीड पिढी जाऊन दुसरी सरण्याच्या उंबरठ्यावर पण जर शेतकरी राजाला नफा नुकसान कळत नसेल तर कठीण आहे !
लोक सवयीने पेरणी करतात,
<< एक प्रश्न विचारायचा आहे. पेरणी करताना पंचांग किंवा नक्षत्र बघून पेरणी करतात का? (म्हणजे पिकाला योग्य त्या वेळी पुरेसे पाणी मिळेल या हेतूने.) की कृषी खाते जो पावसाचा अंदाज देते, त्यानुसार पेरणी करतात? की इतर काही ठोकताळ्याने. >>
लोक सवयीने पेरणी करतात, पंचांग किंवा कृ खा चे ऐकत नाहीत.
गेले किमान दहा वर्षे तरी कृषी खाते सांगतेय की उशिरा पेरणी म्हणजे जुन शेवट किंवा जुलैत पाऊस निट सुरु झाला की पेरण्या करा पण लोक ऐकत नाहीत. गेल्या वर्षी कोकणात पहिली पेरणी कुजुन/वाहुन गेली व परत भात विकत आणुन पेरावे लागले.
मी जे लिहिते ते आंबोलीचे लिहिते आणि आण्बोली मोठा अपवाद आहे, इथले वातावरण पुर्ण महाराष्ट्रात कुठेही नाही आणि त्यामुळे इथली शेती वेगळी आहे.
इथे लोक मे च्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करतात. कारण इथे परंपरेने मे च्या १५ ला पाऊस सुरु व्हायचा. दिवसातुन दोन चार मोठ्या सरी आणि नंतर मृग लागले की दिवसभर संततधार असे रुप असायचे. आंबोलीचा पाऊस खुप थंड आहे, जमिन लगेच थंड करतो, त्यात भात नाचणी उगवत नाही. म्हणुन लोक २५ मे ला पेरण्या करायचे. आता १५ मे ला पाऊस पडत नाही पण लोक अजुनही २५ मे लाच पेरण्या करतात, मोटरीने विहिर्/नदीचे पाणी देत बसतात.
इतरत्र २५ दिवसात लावणी करतात पण इथे ३०-३५ दिवसाचे रोप झाले कीच लावणी करतात. कोकणात नासणा ऑगस्टात पेरतात, इथे भात व नासणा एकत्रच करतात. तरी दोन्हीची कापणी तिकडे कोकणाची संपल्यावरच करता येते. भात १४० दिवस व त्या पुढचाच लावता येतो.
यंदा फार्मर कपमुळे कोकणात कृषी अधिकार्यांनी लोकांना जुन २५ पर्यंत पेरणी करायला दिली नाही. नाहीतर लोकांनी ८ जुनला पेरणी केली असती आणि ती सुकुन गेली असती. ज्यांनी केली त्यांनी परत केली असणार.
मी अधुन मधुन बायो डायनॅमिक कॅलेंडर वापरते. पण पावसाळ्यात नाही, इथे पाऊस असला की कामे थंडावतात त्यामुळे त्याकडे बघुन काम करावे लागते. अमावस्येच्या दोन दिवस आधी अजिबात पेरु नसे असा त्यांचा नियम आहे. मी
परवा १३ ला अमावस्येला पेरला. अजुन दोन दिवस थांबता आले असते पन पाऊस चुकुन पडलाच तर पेरता आले नसते म्हणुन पेरला. माझा दुसरा १४० दिवसाचा भात मी ५ जुनला पेरला. तेव्हा आंबोलीत रिमझिम पाऊस होता पण कोकण कोरडे होते.
Submitted by साधना on 15 July, 2026 - 10:05
लगे हात खतांचा वापर जास्त का
लगे हात खतांचा वापर जास्त का होतो तेही सांगते. भात/नासणा लावणीसाठी उपटल्यावर त्याचे पेंडी बांधतात. त्यासाठी तो एका ठराविक उण्चीचा व्हावा लागतो. पेरल्यावर शेतकरी लक्ष ठेऊन असतो. भात वाढत नाही असे त्याला वाटले तर तो घायकुतीला येतो आणि परत युरीया टाकतो, पेरताना टाकलेला असतोच. हा परत परत टाकलेला युरीया जास्तीचा ठर्स्तो.
तसेच भात लावणी केल्यावर तो लगेच काळा व्हावा ही अपेक्षा असते. काळा म्हणजे पानाचा डार्क ग्रिन रंग. हा हवाच असे त्याला वाटते, नसेल आला तर परत रडारड. सल्ला द्यायला व नावे ठेवायला इतर असतातच. . परत युरीया मारा मग... असे करत नको तितके खत शेतात पडते.
Submitted by साधना on 15 July, 2026 - 10:17