Submitted by Meghvalli on 22 April, 2026 - 00:16

क्षणोक्षणी रात्र अधिक काळोखी होते,
टिपटिप टपोऱ्या चांदण्यात न्हाते,
ढगांमधून डोकावत चंद्र हासतो,
प्रेमाच्या सावल्यांत हलकेच विसावतो।
वार्यावर स्वार एक गीत सैरभैर पळते,
गुज त्या गीताचे कानांत घुमते,
डोळ्यांच्या काठावर स्वप्नांची पालवी,
स्वप्नांमागे झुलत झुलत मन का बरे पळते?
उत्तरांच्या शोधात मग हरवते वाट,
भावनांच्या धुंदीत गुंततो प्रत्येक श्वास,
हातात न धरता येणारे ते क्षण सारे,
तरीही मनात उरतो त्यांचा चिराभास।
क्षणभंगुर या स्वप्नांची हीच तर रीत,
आस लागूनही न मिळणारी प्रीत,
कळत नकळत मन गुंततच जाते,
उरते फक्त आपले अधुरे नाते।
बुधवार, २२/४/२६, ९:२४ PM
अजय सरदेसाई – ‘मेघ’
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा