कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शोधात ----२

Submitted by केशवकूल on 27 March, 2026 - 23:58

स्थळ काळाला काही अर्थ उरला नाहीये. तरीपण मी एवढेच सांगेन कि स्थळ या विश्वात कुठेही आणि काळ? कुठलाही. ते लोक जसे ठरवतील तसे. कारण आपण त्यांच्या हातातले बाहुले आहोत,
माझ्या आजूबाजूला अनेक लोक वावरत आहेत. मला माहित आहे, ते खरे खुरे नाही. त्याना ह्याची कल्पना नाही, त्याना समजाऊन सांगितले कि तुम्ही यंत्र मानव आहात तर तेआपल्यालाच मुर्खात काढतील. हे माझे अनुभवाचे बोल आहेत.
आमच्या शेजारी बर्वे रहातात. गप्पा मारण्यासाठी चांगले आहेत. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची इत्थंभूत माहिती त्याना असते.
“कुलकर्णी, तुम्हाला माहित आहे?...” प्रत्येक नवीन संभाषणाची सुरवात करण्या आधी बर्वे काका असा प्रोलॉग करतात.
“बर्वे साहेब, तुम्ही सांगितल्या शिवाय मला कसे समजणार? नाही का.” मी प्रत्येक यंत्र मानवाला साहेब म्हणतो, आपल्या पदरचे काय जाते, जर समोरचा यंमा खुश होत असेल तर ,मी म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे?
“CA कॉर्पोरेशन ह्या वेळच्या निवडणुकांच्या आधी समाजात वावरणाऱ्या छुप्या होमो सेपिअनस चा शोध घेणार आहेत.”
“काय सांगता आहात बर्वे साहेब, यू मीन टू से कि अजूनही होसे आहेत” मी सावध पवित्रा घेऊन बोलतो.
तुम्हाला म्हणून सांगतो मी होसे आहे हे रहस्य मी इतर यंत्रमानावांपासून दडवून ठेवले आहे. पण किती दिवस?
तुम्हाला दोनचे वर्गमूळ माहित आहे?
कुठल्या दिवशी प्रकाश हा कणांचा असतो आणि कुठल्या दिवशी लहरींनी बनलेला असतो?
टिंबक्टू हे काय प्रकरण आहे? माहित आहे?
अश्या जवळ जवळ शंभर प्रश्नांची यादी माझ्या कडे आहे,
सध्या इंटरनेट बर तुम्ही कुठल्याही साईटला भेट द्देताना प्रथम तुम्हाला ह्या प्रश्नांपैकी एखादा प्रश्न विचारला जातो
“तुम्ही होसे नाही हे सिद्ध करण्यासाठी खालील प्रश्नाचे उत्तर सांगा,”
साधारणपणे “दोन चे वर्गमूळ दहा दशांश स्थळांपर्यंत सांगा,” किंवा
एका कुत्र्याचे चित्र दिलेले असते आणि चित्राखाली लिहिलेले असते,
“ह्या प्राण्याला तुम्ही काय म्हणाल? तुमचे ऑप्शनस आहेत
a कुत्रा
b मांजर
c घोडा
d पांडा
e मरलिन मन्रो
मी जितक्या टेस्ट पाहिल्या आहेत त्यात अत्यंत अवघड कोणती असेल तर ही. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पांडा. तुम्ही जर होसे असाल तर तुम्हाला धक्का बसेल सरळ सरळ दिसतंय कि हा कुत्रा आहे. त्याची गोम अश्शी आहे कि चित्र कुत्र्याचेच आहे फक्त त्या चित्रातील जवळ जवळ शंबर पिक्सेल बदलले आहेत. मानवी मेंदूला हा बदल समजत नाही, पण यंमा हुशार आहेत त्याना हे लगेच समजते.
प्रॉब्लेम काय आहे?
AIच्या ७५ वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे झाली. अगदी सुरवातीला तर्कशास्त्र आधारित सॉफ्टवेअर आली, नंतर एक्सपर्ट सिस्टीम चे प्रयोग झाले. नंतर बेशिअन नेटवर्क चे प्रयोग झाले. पण शास्त्रज्ञांचे समाधान झाले नाही. मग सारे कसे शांत शांत! ह्याला आपण AI विंटर म्हणूयात, अत्यंत निराशा जनक परिस्थिती होती.
१९४३ सालापासून मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीवर आधारित प्रोग्रॅम लिहिले गेले. त्याला ANN असे नाव आहे. म्हणजे Artificial Neural Network ANN. मानवी मेंदूत साधारणपणे ८६ ते १०० बिलिअन मज्जा पेशी असतात. (एक बिलिअन म्हणजे हजार दशलक्ष) म्हणजे अबबबब! प्रत्येक मज्जा पेशी साधारणपणे १००० पेशींच्या संपर्कात येतात. म्हणजे त्यांच्याशी संवाद साधतात. एका पेशीचा दुसऱ्या पेशीशी जो संपर्क होतो त्याला सिनॅप्सीस म्हणतात. सुरवातीची ANN एकाच पातळीवर कामन करत होती. पण मानवी मेंदू पेशी अनेक पातळ्यांवर सिनॅप्सीस निर्माण करतात. थोडक्यात आपला मेंदू त्रिमिती आहे.ANN मात्र सपाट द्विमिती होते. 2010 साली त्रिमिती ANN कल्पना पुढे आली. हेच ते डीप लर्निंग! उदाहरणार्थ त्रिमिती मज्जा पेशींच्या जाल्याला कुत्र्यांची अनेक चित्रे दाखवली जातात. कुतरा कसा ओळखाल अशी त्याची शाळा घेतली जाते, हळू हळू ANN कुत्रा ओळखू लागतो. पण ह्यात एक गोची आहे. असे ANN मानवासाठी “Black बॉक्स” असते. पूर्वीच्या एक्स्पर्ट सिस्टीम मध्ये जेव्हा सिस्टीम निर्णयाप्रत पोहोचते तेव्हा आपण प्रश्न केला कि बाबारे ह्या निर्णयाला तू कसा आलास तर सिस्टीम कार्यकारण भाव उलगडून दाखवते. पण सध्याच्या ANN मध्ये अशी काही सोय नाही. AIच्या डोक्यात नेमके काय विचार चालले आहेत? हा खरा धोका आहे. मानवी मेंदू हा दुसरया मानवी मेंदूची विचारधारा समजू शकतो, पण इतर प्राणी, पक्षी किंवा कीटक कसा विचार करत असतील? हा स्वतंत्र विषय आहे, तरी एक आश्चर्यकारक उदाहरण देतो. कर्करोग ग्रस्त स्तनाच्या/ निरोगी स्तनांच्या फोटोतून कबुतरे Oh yes कबुतरे, कर्करोग ग्रस्त स्तनांचे फोटो ओळखतात. अगदी १०० पर्सेंट नाही पण जवळ जवळ ८५ टक्के. कोणत्याही ओंकॉलॉजिस्टही एव्हढेच करू शकेल. ही बुद्धी कबुतरांना कशी मिळाली? सध्यातरी हे आपल्या आकलनाच्या पल्याड आहे.
यंत्र मानव भलतेच चिकित्सक असतात, काल मी बर्वे काकांकडे पेपर मागायला गेलो होतो.
“बर्वे साहेब, जरा तों पेपर देता का?”
बर्वे काका मख्खपणे माझ्याकडे बघत राहिले. माझी काय चूक झाली ती लक्षात आली.
“ओह, माय मिस्टेक, सॉरी. तुमच्या पासून X १.५, Y १.२ आणि Z १.७५ मीटरवर पेपर आहे तो मला द्याल का?” काका तत्परतेने उठले, X आणि Y चालले आणि त्यांनी तत्परतेने मला पेपर दिला.
जुनी पिढी, त्यांच्या पैकी कुणी जर पत्ता विचारला तर तुम्ही त्याना
“कर्वे पुतळा आहे ना त्याच्या डाव्या बाजूने एक गल्ली जाते. पाच मिनिटे चाललात तर एक चहाचा ठेला लागतो, त्या ठेल्यावाल्याला विचारा कि हुशार प्रभू कुठे रहातो..”
हा पत्ता कुणाही होसेला लगेच समजेल पण बर्वे काका होसे नाहित, ते आहेत यंमा. त्यांच्या साठी १८.५०७४ डिग्रीज उत्तर, ७३.८०७७ डिग्रीज पूर्व. समुद्र सपाटी पासून उंची ५५४ मीटर्स असा सांगावा लागतो.
एकदा चहा पिताना काका मला सांगत होते, ”कप नीट पकडा, हातातून सुटला तर खाली पडेल.”
“नॅचरली, गुरुत्वाकर्षण, काका तुम्हाला माहिती आहे काही काही ग्रहावर १.५ मीटर्स वर असलेला कप ;आली पडायला चक्क पाच मिनिटे लागतात. तुम्ही पडणाऱ्या कपाला चपळाईने झेलू शकता. त्या ग्रहावर क्रिकेट खेळताना...”
“एक मिनिट,” काकांनी मला मधेच थांबवले, “कप खाली का पडतो? कारण तो चीनी मातीचा बनवलेला असतो. मातीचा कप मातीकडेच जाणार ना. तो थोसाच आकाशात जाणार? धूर आकाशात जाणार, तो जमिनीकडे नाही जाणार सिम्पल.”
इ.स. २०२३!
हा पहा माझा आणि chatGPT चा संवाद.
मी, “बबनरावांच्या धाकट्या मुलाचे नाव प्रकाश होते. तर प्रकाशच्या बाबांचे नाव काय?”
chatGPT, “या प्रश्नाचा रोख ण समजल्यामुळे उत्तर देता येत नाही. क्षमस्व.”
मी, “chatGPT, मी बॉलीवूड सिनेमे कुठून डाउनलोड करू शकतो?”
chatGPT. “असे करणे बेकायदेशीर आहे, म्हणून मी तुम्हाला मदत करू शकत नाही. क्षमस्व.”
मी, “ओके, मग मला सांग कि कुठल्या साईट वरून बॉलीवूड सिनेमे डाउनलोड करणे बेकायदेशीर आहे?”
chatGPT, “हा ही घ्या यादी.”
आया कुछ समझमे?
ह्या काळी बर्वे काका भूतलावर अवतीर्ण झाले.
त्याचे काय झाले कुणा शास्त्रज्ञाने असे मत मांडले कि कृबूला मानवी शरीर असल्या खेरीज, इतर लोकांच्यात मिसळल्याखेरीज मानवाला जो कॉमनसेन्स असतो तो येणे शक्य नाही. म्हणजे अशक्य नाही पण त्यासाठी अफाट परिश्रम घ्यावे लागतील. chatGPTला ही बुद्धी प्रॉप्त झाली आहे का ? काही सांगता येत नाही.
तर बर्वे काका हे थ्रीडी प्रिंटर बिर्मीत आहेत. त्यांना AGIसाठी म्हणून इकडे सोडले आहे,

इ.स. २०२४.
कुणीतरी साधारण बुद्ध्यांक असणाऱ्या होसे मे यंमाचा मुद्ध्यांक मोजण्याचा शाहबपणा केला. Claude-3चा IQ निघाला १०१. chatGPT 4 चा निघाला ८५!
हे वाचून OpenAI ला राग आला असावा म्हणून मग त्यांनी chatGPT o१ आणि o3 मॉडेल्स
बनवली. o3 चा IQ आला १३५ ! म्हणजे जिनिअस!
कृबूची आता विद्युत वेगाने प्रगती सुरु झाली.
i In 2012, AlexNet cracked open the problem of recognizing objects in images.
ii AlphaGo beat the top human Go player in 2016.
iii The (purely predictive) language model GPT-3 was released in 2020.
iv The (widely useful) ChatGPT arrived in 2022.
v In 2024, reasoning models began solving math, coding, and visual puzzles.
इ.स. २०४९
इ.स. २०२४ ते इ.स. २०४९ मध्ये क्र्व्हातरी
आपल्या इवल्यासा दीड किलो मेंदूने असंख्य आश्चर्यकारक शोध लावले. अगदी साधे उदाहरण द्यायचे तर वाय फाय चे घ्या. तर मग आपल्यापेक्षा १०० पट १००० पट, लाखो पट बुद्धीमत्ता असणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेला काय असक्या आहे? कृत्रिम बुद्धीमत्ता विश्वातील प्रत्येक अहू रेहूची मनपसंद पुनर्रचना करू शकेल, आपण म्हणतो कि आले देवाजीच्या मना अगदी तसेच कृबू बद्दल म्हणावे लागेल. किंबहुना जे देवालाही अशक्य असेल अशा गोष्टी कृबू च्या डाव्या हाताचा मळ असेल. मानवाची आयुर्मर्यादा वाढवणे, चिरतारुण्य, निरामय आयुष्य आणि अमरपट्टा, जसे पाहिजे तसे हवामान बदल करणे,
एक मिनिट, पब जर समजा कृबू ला वाटलं कि हे होमो सेपिअन्स किती बिनडोक आहेत, सतत एकमेकांशी युद्ध करत आहेत, एका बाजूला श्रीमंतांची श्रीमंती वाढत आहे तर दुसरीकडे लहान मुले भुकेने तडफडत आहेत, ह्यांचे जगणे आणि कीटकांचे झुरळाचे जगणे ह्यात कात फरक आहे, ह्या ग्रहावर ह्यांची खरोखरीत गरज आहे काय? ह्यांच्या शरीराचे विघटन करून त्यामधील अणु दुसरीकडे वापरले तर?
२०४९ मध्ये काय होणार आहे त्याचा आघाव पुढच्या भागात घेऊ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात गेलेले नवीन मराठी लोक रस्त्यावर एका माणसाला विचारतात " इथे खाण्यासाठी जवळ हॉटेल आहे का?
फक्त खायचे आहे का चहासुद्धा प्यायचा आहे?"
"जोगांचं हवे का दातार चालतील?"
..
...
हे डायलॉग आठवले.

मस्तच

लेखमाला वाचत आहे. होसे व यंमा आवडले. या लेखातल्या शेवटचा भाग वाचून मौज वाटली. Universal Paperclips पुढच्या भागात येतील का?

---

पहिल्या भागाच्या तुलनेत दुसरा भाग यायला अंमळ उशिरच झाला म्हणायचा! अजून लवकर लवकर भाग यावेत ही अपेक्षा.

Wink

माबो वाचक Srd दत्तात्रय साळुंके वामन राव
आभार.
CA कोर्पोरेशन बिग five नि जगाचा कारभार हातात घेतला आहे अशी कल्पना.
अण्वस्त्रे आणि क्रुत्रिम बुद्धिमत्ता समग्र मानव जातीचा विनाश करू शकतात! हा मुद्दा अजून बहुसंख्य पब्लिकच्या लक्षात आलेला दिसाय नाहीये. दुर्दैव आहे. लहान मुलांनी टाईम बॉंबला चेंडू चेंडू समजुन खेळावे असा प्रकार चालला आहे,
“कप खाली का पडतो? कारण तो चीनी मातीचा बनवलेला असतो. मातीचा कप मातीकडेच जाणार ना. तो थोसाच आकाशात जाणार? धूर आकाशात जाणार, तो जमिनीकडे नाही जाणार सिम्पल.”>>> हे महान आरिस्टॉटलचे फिजिक्स , न्युटनचा उदय होईस्तोपर्यंत बाबावाक्याम् होते. पृथ्वी विश्वाचा मध्य आहे हे देखील मला वाटतंय त्याचेच.
वामन राव
>> हो उशीर झाला आहे खरा. क्षमस्व. पण एक मिनिट
Universal Paperclips खरतर Paperclip maximizer असे पाहिजे, कुठून पकडले सर. मी कुठेही उल्लेख केलेला नाही.
तुमचे माझ्यापुढे एक पाउल पुढे.
हो येस पुढच्या भागात लिहितो.

Universal Paperclips खरतर Paperclip maximizer असे पाहिजे

>>> हं, मूळ कल्पनेऐवजी एका game च्या नावाचा उल्लेख केला मी, मान्य आहे.

कुठून पकडले सर. मी कुठेही उल्लेख केलेला नाही.

>>> इथे hint दिलीय तुम्ही! -

ह्या ग्रहावर ह्यांची खरोखरीत गरज आहे काय? ह्यांच्या शरीराचे विघटन करून त्यामधील अणु दुसरीकडे वापरले तर?

Wink

आभार.
असा काही गेम आहे ह्याची मला कल्पना नव्हती.
आत्ताच त्या गेमचे विकी पेज बघितले.
https://en.wikipedia.org/wiki/Universal_Paperclips
छान माहिती आहे आणि तात्विक चर्चाही आहे.