काय राखतो?

Submitted by Meghvalli on 25 March, 2026 - 11:06

विचारलंस आम्हाला—आम्ही आणखी काय राखतो,
ओठांवर शब्द आणि हातात लेखणी राखतो।

रक़ीबाचे दर्शन जेव्हा होते नकळत असे,
स्पंदनांच्या अंतरी मूक दुःखही राखतो।

तुझं प्रेमच कदाचित—माझा एखादा भ्रम असेल,
तरीही तुझा प्रत्येक घाव शिरोधार्य राखतो।

तुझ्या त्या आडमुठेपणाचा थांबत नाही सिलसिला,
जगण्यासाठी म्हणून थोडासा स्वतःचाच भ्रम राखतो।

हे प्रेमच वेडं आहे—मनास कधी न जुमाने,
तुझे प्रतिबिंब नेहमी डोळ्यांतच राखतो।

‘मेघ’ म्हणे—इतकं सोपं नाही मनाला ओळखणं,
या हृदयात दडवून अगणित गूढविश्वं राखतो।

बुधवार, २५/३/२६ , ७:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन Submitted by धनश्री- on 25 March, 2026 - 21:46>>> धनश्री, सॉरी राग मानू नका... कदाचित पुर्ण वाक्याची संगती लावून देखील त्या शब्दाचा अर्थबोध होत नाहीऐ म्हणून ही असेल, पण इतका wayward आणि off the target अंदाज या पुर्वी पाहिला नव्हता.... Biggrin

नवीन Submitted by धनश्री- on 25 March, 2026 - 21:46>>> धनश्री, सॉरी राग मानू नका... कदाचित पुर्ण वाक्याची संगती लावून देखील त्या शब्दाचा अर्थबोध होत नाहीऐ म्हणून ही असेल, पण इतका wayward आणि off the target अंदाज या पुर्वी पाहिला नव्हता....

कवीस वाचकाचा राग कसा येईल बरं ? तुम्ही दिलेली करेक्शन्स दाखवता! अजुन काय हवं ? सगळ्यांना सगळच यायला हवंच आसा कुठेही नियम नाही .

तुम्ही माझ्या कविता वाचता आणि तुमचा अभिप्राय देता हे माझ्यासाठी खूप मोठं आहे.

पुन्हा धन्यवाद _/\_

मेघवल्ली, फाविदडी यांनी माझी चूक दाखवलेली आहे. की रकीब आणि ईश्वर हे शब्द संपूर्णतः भिन्न रीतीने वापरले जातात. मग मी इतका ९० अंशी वाईड बॉल कसा टाकला? Wink

मी फक्त 'मूक' शब्दावरती सौम्य आक्षेप घेतला होता.