रसिकता

Submitted by एक लेखक on 19 March, 2026 - 22:22

आमचे एक साहेब होते. अतिशय देखणे. सुंदर स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित व्हायच्या.
ते भलतेच रसिकही होते आणि सभ्यही होते. त्यांच्याकडे हेल्दी प्लर्टिंग म्हणजे काय हे शिकायला मिळालं.

त्यांनी एकदा विचारलं होतं कि " तरूण कुणाला म्हणायचं ?"
आम्ही सर्वांनी वपु स्टाईल पुस्तकी व्याख्या सांगितल्या. ते फक्त मिस्कील हसायचे, नाही नाही अशी मान हलवायचे. मग शेवटी आम्ही हरलो म्हटल्यावर ते म्हणाले

" रोजच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी जो वेगवेगळ्या रस्त्याने जातो तो तरूण "
आम्हाला काही पटले नाही. मग ते म्हणाले " अरे रोज एकाच रस्त्याने गेलास तर तुला तेच ते निसर्ग सौंदर्य दिसेल ना ? वेगवेगळ्या रस्त्याने गेलास तर वेगवेगळे सौंदर्य दिसेल " निसर्ग हा शब्द दुसर्‍यांदा जाणीवपूर्वक काढून टाकलेला असल्याने झटकन समजलं. त्यानंतर रस्ते बदलत राहिलो तो आजतागायत.

अ‍ॅक्च्युअली तरूण असणे म्हणजे रसिकता टिकवून ठेवणे. रसिक माणसाला वेगवेगळ्या रसाचं आकर्षण असायला हवं. वेगवेगळ्या रसांचा आस्वाद घेता यायला हवा. त्याला दाद देता यायला हवी. अ‍ॅप्रिशिएट करता यायला हवं. त्याला रसिक म्हणावे. पण एव्हढेच का ? जो रसिक आहे तोच निर्मितीक्षम असू शकतो आणि जि निर्मितीक्षंम आहे त्याच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दाद देणारा तो सुद्धा रसिकच.

समजा एखाद्या माणसाने एक कथा लिहीली जिचा विषय एक माणूस बाजारातून घरी चालला आहे इतकाच आहे. बाजारातून घरी जाताना त्याच्या मनात काय चाललं आहे हे तो थेट शब्दात मांडेल किंवा अप्रत्यक्ष मांडणी करेल. पैकी थेट मांडणी समजण्यासारखी आहे. पण प्रतिमांच्या सहाय्याने कल्लोळ मांडला तर फार थोड्यांना समजेल. पण समजलं नसताना ते समजून घेण्याचा प्रयत्न करणारा तो रसिक. त्याला तरूण म्हणायला हवे. तारूण्य नेहमी प्रयोग करू पाहतं. ते शक्यता धुंडाळतं.

एक माणूस बाजारातून चालला आहे यात किती शक्यता आहेत. त्याला मुलासाठी हवं ते घेता आलेलं नाही. बायकोसाठी गहाण पडलेलं मंगळसूत्र सोडवून आणता आलेलं नाही. हे न सांगताही कल्लोळ सांगायचा हा प्रयोग आहे. मग तो थोडक्या लोकांसाठी करायला धैर्य लागतं. ते धैर्य असलेल्या निर्मात्याला दाद देणारा एक जण असेल तर त्या रसिकासाठी सुद्धा लिहीणारा, निर्मिती करणारा धाडसी निर्माता हा सुद्धा रसिकच.

वार्धक्य हे जड असतं. त्याला नव्याला सामोरं जाता येत नाही. ते त्याच्या काळात अडकून पडलेलं असतं. पंतोजींच्या शाळेतून काळाच्या खिडकीतून आलेल्या वृद्ध पंतोजींनी आधुनिक शाळेतल्या घनमूळ, वर्गमूळ करण्याच्या पद्धती पाहून संताप व्यक्त करावा, हे काय चालू आहे असा त्रागा करावा तसं. त्याला नवं समजून घ्यायचं नसतं. त्या मागचा थॉट समजून घ्यायचा नसतो.

रसिक माणूस हा नेहमीच मनाने तरूण असतो.
सिनेमा मधे आपण काय बघतो ? एक हिरो आहे आणि त्या हिरोची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा आहे. आपण काय बघतो ? नायकपट ?
सिनेमा तेव्हढाच असतो का ?

बाजारातून घरी चाललेला माणूस एव्हढाच विषय असेल सिनेमाचा तर तो सिनेमा नाही का ? आपल्याला झालेली सवय असते त्या सवयीने सिनेमा बघायचा आणि त्यावरून तो कसा आहे हे ठरवायचं हे अ‍ॅप्रिसिएशन आहे का ? आपण रसिक की पंतोजी ? सिनेमाला कथा असेल तरच तो सिनेमा असतो का ? कि मुळात ते कॅमेर्‍याचे माध्यम आहे ? ती कला आहे आणि ती कला दाखवायची हौस असलेला रसिक निर्माता आहे. इथे निर्माता म्हणजे कलेचा निर्माता या अर्थाने. त्याला समजून घेणे ही रसिकता नाही का ?

पण अशा एखाद्या दुसर्‍यासाठी सिनेमा बनवणे हे भयंकर खर्चिक काम आहे. शिवाय त्याला थेटर मिळायला हवे. तरच रसिक येतात. पण काळ बदलला आहे. तुम्हाला व्यवसाय महत्वाचा नसून रसिक मिळवणे हे हवे आहे. त्यासाठी युट्यूब आहे. पण व्यवसाय नाही तर दुसरा सिनेमा बनवावा कसा ?

या दृष्टीने ए आय हे टूल म्हणून वापरले तर खर्च कमी होईल. एक्सपरिमेंट करत राहणार्‍याला हे वरदानच आहे. ए आय हे कॅमेर्‍यासारखे एक टूल आहे असे समजून राही बर्वेसारखे रसिक कलाकार कलाकृती बनवतात तेव्हां त्यामागची धडपड, त्यातले नावीन्य याचा आस्वाद घ्यायला तरूण असायला हवे.

रोज वडापाव खाऊन खाऊन तुत्तीच्या फळांच्या गराचे मोरांबे टेस्ट करावेसे वाटत नसतील तर आपले टेस्टबडस बधीर झालेत असे नाही का होत ? वडापावची सवय लागलेल्या रूचिरेला जर गुलकंद नको तर वेगवेगळी चव घेणार कशी ? कुणीच परफेक्ट नाही. पण परफेक्शनचं वर्तुळ मर्यादीत करून टाकून त्यातून जगाकडे पाहणे हे वृद्धत्वच. शरीराने वृद्ध पण मनाने तरूण म्हणजे अनुभवी रसिक. अशांचा अनुभव आणि नानीन्याचा हव्यास अशा रसिकांना तोड नाही. याउलट नुकतंच समजू लागलेलं असणं ही अवस्था निसरडी असते. आता समजतंय हेच अंतिम ज्ञान असा समज झाला तर कोसळकडेच आजूबाजूला उभे ठाकतात. अशा कड्यांवरून चालताना तुच्छकटाक्षाने पाय घसरतो.

जीभ जर वृद्ध झाली तर रसिकता टिकेल का ?
जीभच नाही तर अन्य ज्ञानेंद्रियांनी सुद्धा सवयीचं तेच बघायचा आग्रह धरला तर आपले तारूण्य मृत झाले असे समजावे का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

⠀⠀⠀⣠⣶⣾⢿⡿⣿⣟⡿⣿⢿⡿⣿⣟⡷⣶⢶⣦⣤⣄⣀⡀⢀⣴⣶⡶⣶⢶⣦⡀
⠀⠀⢸⣟⣷⢯⣿⣻⢷⣯⢿⣯⢿⣽⣷⣻⢿⡽⣟⣾⣽⣻⢿⡅⢸⣿⣳⡿⣯⣟⣿⠆
⠀⠀⣸⣿⣼⢿⣧⢿⡿⣼⣿⣻⢿⣼⢧⣿⣟⣿⢿⣻⣼⣟⡿⡇⢸⡿⣧⣿⣻⢿⣼⠄
⢠⣾⣿⣳⣯⣿⢾⡿⣽⣟⣾⡽⣟⣯⣿⢾⣽⡾⣟⡿⣾⣽⣻⡅⢸⣿⣽⢾⣻⣯⣿⠂
⠈⢿⣞⣷⣟⡾⣿⡽⣟⣾⢯⣟⣿⣳⣯⡿⣞⣿⡽⣟⣷⣯⢿⡅⢸⣿⣞⣿⣽⣞⣿⠄
⣠⣿⣟⣾⣽⣻⢷⣟⡿⣽⣻⣟⣾⣽⣳⣿⣻⢷⣟⣿⣳⣯⢿⡃⢸⣷⢿⣞⣷⣯⣿⠄
⢻⣟⣾⣽⢾⣻⣟⣾⣟⣿⣳⣯⣟⣾⣟⣾⡽⣿⣞⣯⣷⣟⣿⡃⢸⣿⣻⢾⣻⡾⣽⠆
⢠⣿⣻⢾⡿⣽⣾⣻⢾⣳⣟⣷⣯⡷⣿⣞⣿⣳⣯⣟⣾⣽⠾⠇⠸⣿⣽⣻⢷⣿⣻⠇
⣿⣿⣹⢿⣹⡿⣾⣹⡿⣏⣿⡾⣷⣿⢷⣏⣷⡿⣷⣏⡿⠁⠀⠀⠀⠀⠀⠁⠈⠀⠀⠀
⠙⣷⢿⣻⣽⢿⡽⣷⣟⡿⣞⣿⣳⣯⡿⣯⢿⣽⡷⡟⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
⠀⠀⠉⠉⠉⠋⠙⠃⠋⠙⠙⣷⣟⡷⣟⣿⣻⣾⡝⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⢠⣿⢯⣟⣿⣳⢿⡾⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⢠⣿⣟⣯⡿⣞⡿⠋⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⢀⣿⣟⣾⣽⣻⠏⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⢸⣿⣾⣽⣾⡏⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠸⣟⣾⡽⣷⠇⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠹⢯⣿⣽⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⢈⣉⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀

लेख आवडला
निसर्ग हा शब्द दुसर्‍यांदा जाणीवपूर्वक काढून टाकलेला असल्याने झटकन समजलं>>>>> अगदी अगदी!
त्यांच्याकडे हेल्दी प्लर्टिंग म्हणजे काय हे शिकायला मिळालं.>>> यावरुन आठवले अगं तुझ दिसतयं ग! तुझ दिसतयं ग!.... काय? मग थोडा पॉज घेउन रामावरचे प्रेम . हे झाले अध्यात्मिक फ्लर्टिंग. पुर्वी काही किर्तनकार करायचे म्हणे
उतार वयातील स्त्री पुरुष मैत्री मधील नाते संबंधात देखील अनेक भावनिक कंगोरे असतात. तसेही स्त्री पुरुषांमधील मैत्रीला बरेच गुंतागुंतीचे पदर आहेत.स्त्री पुरुष मैत्रीला पुर्वी मैत्री या पातळीवर समाजमान्यता नसायची पण पुर्वी गुरुबंधू /गुरुभगिनी या पातळीवर त्याला मान्यता व मर्यादाही होत्या. कुठल्याही निसरड्या क्षणी ही मैत्री शारिरिक पातळीवर येउ द्यायची नाही यासाठी गुरुबंधू गुरुभगिनी ही अध्यात्मिक काटेरी सीमारेषा ठळकपणे सुस्पष्ट केलेली असायची. थट्टा मस्करी असायची पण या सीमारेषेचे भान ठेउन. हल्ली आपण त्याला फ्लर्टींग म्हणतो. अजून बरच काही पण आत्त्ता नको!