Submitted by Kalpesh Gaikwad on 16 March, 2026 - 12:05
इरदा वाईट येथे परंतु बहाणा चांगला आहे
मी जिंदगी जगण्याचा विचार टाळला आहे
ज्यांच्या पोटी मुलगी, तोच आहे भाग्यवान
मी ही कमनशिबी नाही, मलाही मुलगा आहे
यौवनात खांदे माझे अरे! ओझ्याने वाकलेले
माझ्यावर स्वप्ने कैकाची नि मी थोरला आहे
त्याच्या चुकीबद्दल मी नेहमी मार खायचो ..
आई सारखी मला सांगायची तो धाकला आहे
तिला ही वाटते की जगावे आपण इतरांसारखे
मी ऐकले , ती बोलत होती की तो वेगळा आहे
न्याय देवतेने माफ करावे आता माझे सारे गुन्हे
ठाऊक होते, तिच्यासारख्या मी ही बावळा आहे
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खयाल आवडले.
खयाल आवडले.
दोन शेरांमध्ये एकेक ओळ सोडा.
नक्कीच
नक्कीच