.

Submitted by रानभुली on 11 March, 2026 - 02:37

.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पोस्ट अतिशय महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा मुद्दा पुढे आणते.

शहर नियोजनाच्या चर्चेत सायकल हा पर्याय कागदावर खूप आकर्षक वाटतो, पण प्रत्यक्ष रस्त्यावरची परिस्थिती सायकलस्वारांसाठी किती असुरक्षित आहे हे या अनुभवातून स्पष्ट होते. वाहतूक व्यवस्थेचा मूलभूत सिद्धांत असा आहे की रस्ते सर्वांसाठी असतात. मोटार वाहनांसाठीच नाही तर पादचारी आणि सायकलस्वारांसाठीही. मात्र आपल्या शहरांमध्ये रचना, अंमलबजावणी आणि चालकांचे वर्तन या तिन्ही पातळ्यांवर सायकलस्वारांचा विचार दुय्यम आहे ही ठळकपणे जाणवते.

मुळात लेनची कमतरता, बस स्टॉपस, ही वाहतूक नियोजनातली विसंगती नाहीये. तर मुळात सर्वंकष विचार करून न तयार केलेली डिझाईन थिंकिंग मधली उणीव आहे. रम्बल स्ट्रिप्ससारख्या उपायांबाबतही वैज्ञानिक निकष आणि स्थानिक परिस्थिती हा उपाय एखाद्या संदर्भात उपयुक्त असू शकतो पण सायकलसारख्या हलक्या वाहनांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे रोड सेफ्टी हे सायकल स्वरांसाठी बनवलेलंच नाहीये.

खूप मोठ्या काळासाठी विचार केला तर सायकल स्वारी ही आरोग्य किंवा छंद यापूर्ती मर्यादित नसून समाजाच्या आरोग्याशी निगडीत आहे. जसं की वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंधन बचत. या बाबतीत जागरूकता निर्माण करणं खूप गरजेचं झालं आहे.