माझे तुझे नाते

Submitted by विद्याधीश on 10 March, 2026 - 11:55

माझे तुझे नाते असे ऊन-सावली समान
एका विना दुजा नाही, दोन जीव एक प्राण

माझे तुझे नाते जसे, सूर्य भिजे पावसात
भेट होई जेव्हा कधी, इंद्रधनू फुलतात

नाते जसे कमळात, अडकला कोणी भुंगा
हवीशी ही कैद तरी, सुटकेचा मांडी दंगा

गोकुळीची राधा तू अन्, कृष्ण मी गं द्वारकेचा
दोघांमध्ये फक्त आता आर्त स्वर बासरीचा

शापित मी यक्ष सखे, वाट पाहतो मेघाची
तुझ्यासाठी पाठवण्या, ओळ एक कवितेची

-विद्याधीश

Group content visibility: 
Public - accessible to all site users