Submitted by विद्याधीश on 4 March, 2026 - 10:38
(वृत्त - आनंदकंद)
श्वासात सूर ताजे, ओठी उदास गझला
हर्षास टाळण्याचा, निष्फळ प्रयास गझला
या मैफलीत आता, माझे न कार्य उरले
कोणी न येथ माझा, देऊ कुणास गझला?
गेला जरी फुलांचा हंगाम दूरदेशी
ओसाड जीवनाला, देती सुवास गझला
भट्टीत वास्तवाच्या, स्वप्नांस जाळले मी,
घडवून घेतल्या ह्या, त्यातून खास गझला
आले कुणी न जेव्हा, होती गरज उबेची
होऊन दोस्त आल्या, भेटावयास गझला
घरदार सोडुनी मी, रानवनात फिरतो
गझलाच अन्न वस्त्रे, माझा निवास गझला
पाऊस थांबण्याचे दिसते न चित्र "विद्या"
बहुतेक ऐकवील्या कोणी नभास गझला
-विद्याधीश
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडली. छान लिहिलीये.
आवडली. छान लिहिलीये.
धन्यवाद!
धन्यवाद!
छान , मस्त
छान , मस्त
आवडली. मस्त जमलीय.
आवडली. मस्त जमलीय.
>>>>>>पाऊस थांबण्याचे दिसते न
>>>>>>पाऊस थांबण्याचे दिसते न चित्र "विद्या"
बहुतेक ऐकवील्या कोणी नभास गझला
वाह वाह! वाह वाह!