Submitted by Meghvalli on 2 March, 2026 - 03:55

दशके सरली तरी तुझी आठवण आली नाही,
असं असूनही तुझी आठवण कधी ओसरली नाही।
विस्मरणाचा धीर मनाला कधीच जमला नाही,
दूर असूनही तू मनातून कधी दूर झाली नाही।
काळाच्या गर्दीत मी स्वतःलाच हरवून बसलो,
मनातल्या आपल्या त्या विणीची गाठ तुटली नाही।
ओठांवर शांतता, डोळ्यांत ओल दाटून आली,
दुःखाची सल जिवघेणी तरी ओढ अंतरी विरली नाही।
‘मेघ’ म्हणे, अंतर वाढले तरी नातं तुटलं नाही,
डोळ्यांआड असूनही तू स्मरणातून गेली नाही।
शनिवार, २८/०२/२०२६ | ११:४५ PM
अजय सरदेसाई — ‘मेघ’
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहीले कडवे जबरदस्त. जर आठवण
पहीले कडवे जबरदस्त. जर आठवण सरलीच नाही तर येणार कुठुन.
सगळी कविता छान.
धन्यवाद _/\_
धन्यवाद _/\_