आता जाऊ दे ना

Submitted by Meghvalli on 2 March, 2026 - 03:23

का हटून बसलीस, आता जाऊ दे ना,
सोड हा अबोला, आता जाऊ दे ना।

किती ताणशील टंटा, आता जाऊ दे ना,
हट्ट सोडून दे ग, आता जाऊ दे ना।

डोळ्यांतले ढग हे, आता जाऊ दे ना,
हसून जरा बोल ग, आता जाऊ दे ना।

रुसवे सगळे विसर, आता जाऊ दे ना,
माझ्या जवळी ये ग, आता जाऊ दे ना।

पूरे कर तक्रार,आता जाऊ दे ना,
का उगाच हा भार, आता जाऊ दे ना।

आठवणींचा मेळा, आता जाऊ दे ना,
कालचा तो हिशोब, आता जाऊ दे ना।

शब्द जरा कडवे, आता जाऊ दे ना,
मनातलं सगळं बोल, आता जाऊ दे ना।

हात माझा धर ग, आता जाऊ दे ना,
अंतर सगळं मिटू दे, आता जाऊ दे ना।

हसू पुन्हा फुलू दे, आता जाऊ दे ना,
कर न माफ आता, आता जाऊ दे ना।

रविवार, १/३/२६ , ८:०८ PM
अजय सरदेसाई -मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users