Submitted by अर्जुन ..✍️ on 23 February, 2026 - 10:38

आठवणींमध्ये रमणारे,
गाण्यांच्या त्या सुरावटीत...
वेड्यासारखे डुलणारे,
मन आता त्या वाटेवर जात नाही.
तासनतास गप्पांमध्ये रंगणारे,
निखळ, निर्मळ संवादांतून...
स्वतःचा शोध घेत बसणारे,
आता कुणाची वाट पाहत नाही.
कवितांचे मर्म जाणणारे,
कथांमधील पात्रांतून...
स्वतःचे प्रतिबिंब शोधणारे,
या मनाला आता काहीच सुचत नाही.
भौतिक सुखाच्या गराड्यात,
आणि एकटेपणाच्या सावलीत...
मन कशातच गुंतत नाही,
अन एकांतातही आता मन हे झुरत नाही.
माणसांच्या या गर्दीत
एक वेगळीच शांतता आहे;
आपल्या लोकांमध्ये राहूनही
मन मात्र खूप एकटे आहे.
अपेक्षांचे ओझे नाही,
कोणाची हाक यावी असेही नाही;
पण एकटेपणाच्या या सावलीत
मन मात्र मुळीच दुसऱ्यांसाठी थांबत नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा सुंदर
वा सुंदर
Meghvalli - धन्यवाद
Meghvalli - धन्यवाद
सुंदर!
सुंदर!