
गेली तीन-साडेतीन वर्षे मी ज्या ठिकाणी काम करते, ती संस्था बंगळूर शहराच्या मध्यवर्ती भागात असली, तरी संस्थेच्या विस्तीर्ण आवारात असंख्य झाडं आहेत. इमारती मोजक्याच आहेत. त्यामुळे आत प्रवेश केला की एकदम प्रसन्न वाटतं. आजूबाजूला वाहत्या रहदारीचे रस्ते असले, तरी आत मात्र छान शांतता असते. उन्हाळ्यात तर बाहेरून आत आलं की तापमानातला फरक चांगलाच सुखावह वाटतो. सध्या पानगळ सुरू आहे, त्यामुळे जरा रखरखाट आहे खरा, पण विविध प्रकारचे पक्षीही या दिवसांत दिसायला लागले आहेत. आमच्या विभागाच्या इमारतीला आमच्या मजल्यावर एक लाऊंज आहे, जो एका बाजूने पूर्ण खुला आहे. फावल्या वेळात तिथे उभं राहणं हा बर्याच जणांचा आवडीचा उद्योग आहे, माझाही आहे. समोर भरपूर झाडं दिसतात आणि कधीकधी झाडांवरचे पक्षीही दिसतात. दुपारी जेवण झालं की आम्ही आवारात चक्कर मारतो, तेव्हाही पक्षी दिसतात.
असे गेल्या काही दिवसांमध्ये दिसलेले आणि कॅमेर्यात पकडता आलेले हे काही पक्षी!
एशियन ब्राऊन फ्लायकॅचर

एशियन टिट
ब्लॅक-रम्प्ड फ्लेमबॅक(सुतारपक्षी)
ब्ल्यू-कॅप्ड रॉक थ्रश
ब्ल्यू-नेप्ड मोनार्च
कोतवाल
ग्रीनिश वार्ब्लर
हेअर-क्रेस्टेड ड्रॉंगो
हूपो (हुदहुद)
इन्डिअन व्हाईट-आय (चष्मेवाला)
स्वर्गीय नर्तक (इंडिअन पॅरेडाईज फ्लायकॅचर)
स्वर्गीय नर्तकाची मादी
स्मॉल मिनिव्हेट (निखार)
पर्पल-रम्प्ड सनबर्ड (जांभळ्या पाठीचा सूर्यपक्षी)
सूर्यपक्ष्याची मादी
टिकेल्स ब्ल्यू फ्लायकॅचर
व्हाईट-चीक्ड बार्बेट
रुफस ट्रीपाय (टकाचोर)
Spotted owlet (पिंगळा)
हे फोटो बऱ्याच दिवसांपूर्वी काढले होते त्यामुळे विसरून गेले होते 

अजून एक फोटो
छान आलेत सगळे फोटो . ऑफिसमधून
छान आलेत सगळे फोटो . ऑफिसमधून असे सुंदर पक्षी बघायला मिळणे हि खूप मोठी गोष्ट आहे.
धन्यवाद नवीन प्रतिसादकांना!
धन्यवाद नवीन प्रतिसादकांना!
मी तीनचार दिवसांपूर्वी मिसेस नर्तक आणि तिच्या मागे मिस्टर नर्तक उडताना पाहिले!
लंपन, मिसेस नर्तक आवडलं
Spotted owlets चे फोटो टाकायला मी विसरलेच होते. आता टाकले आहेत. आणि फोटोत पकडायला न जमलेलेही काही पक्षी आहेत. राखी धनेशाची जोडी दिसली होती एकदा. खंड्या एकदोनदा दिसलाय आणि आवाज तर खूप वेळा ऐकू येतो. शिक्र्याचाही आवाज खूप वेळा ऐकू येतो पण दिसला नाही अजून.
नवीन आलेले पाहुणेही देखणे
नवीन आलेले पाहुणेही देखणे आहेत, खास करून Spotted owlet फारच क्यूट.
कसलाच भारी धागा आहे हा. हे
कसलाच भारी धागा आहे हा. हे असले पक्षी ऑफीसमधून बघायला मिळतात म्हणजे कमालच झाली. फोटो पण कसले भारी काढलेत. हे असले फोटो काढायला लोकं जंगलात रानात भटकत फिरतात. आमच्या ऑफिसमध्ये हे असलं नसतं. आमच्याइथे कबूतर असतात. ऑफिसच्या वरच्या मजल्यावर मधोमध एक ओपन टेरेस आहे. तिथे एक कबूतर जखमी अवस्थेत आला होता उडता येत नव्हतं. लोक्स त्याला जेवणाच्या वेळी चपाती वैगरे टाकायचे. खाऊन खाऊन बॉयलर कोंबडीसारखा जाड झाला होता. नंतर बरा झाला तरी उडून जात नव्हता.
काय सुरेख आलेत फोटो.
वावे, काय सुरेख आलेत फोटो. निखार हे नाव अगदी शोभते.
एशिअन टिट म्हणजेच चिकडी का?
बार्बेट म्हणजेच तांबट मला वाटतं.
अरे वा छान. पक्षी टिपायला फार
अरे वा छान. पक्षी टिपायला फार चिकाटी लागते बुवा...

![]()
माझाही एक. गच्चीत पाण्याचं भांडं ठेऊन बसल्या जागी टिपलेला बुलबुल.
वाह मस्त !
वाह मस्त !
सुंदर.
सुंदर.
Submitted by किल्लेदार on 1
Submitted by किल्लेदार on 1 April, 2026 - 09:06 >>> शार्प!!!
सुरेख फोटो, इतके पक्षी ऑफिसात
सुरेख फोटो, इतके पक्षी ऑफिसात बघायला मिळतात हे अहो भाग्य.
एकापेक्षा एक सरस फोटो आहेत.
एकापेक्षा एक सरस फोटो आहेत. खरंच भाग्यवान आहेस तू, तुला एवढे पक्षी सहज बघायला मिळतात.असे फोटो काढता येणं म्हणजे ग्रेट आहे. तुला ती नजर, पेशन्स आहे वावे. तुझे बाकी पण फोटो बघितले आहेत, सॉलिड असतात.
किल्लेदारांचा पण मस्त आहे झब्बू.
मलाही उबोंसारखं वाटलं होतं शिर्षक वाचून.
Pages