
प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676
तू गेल्या काही वर्षांत अतिशय उत्तम काम केलं आहेस, त्या बद्दल तुला स्टार परफॉर्मन्स रेटिंग मिळालं आहे. पण sorry, तुझं प्रमोशन होऊ शकलं नाही, कारण..." This was last straw on the camel's back.
"मला हे प्रोसेस करायला वेळ हवा आहे.." असं म्हणे पर्यन्त मी चक्क रडायला लागले होते!
पुढचे एक दोन महिने मी मी राहिलेच नाही. गोष्ट फक्त प्रमोशनची नव्हती. आता पर्यंत माझा विश्वास होता की झोकून देऊन काम करायचं - result मिळतोच! कळत नकळत मी प्रमोशन आणि recognition मध्ये गल्लत केली होती. आता बाकीच्या गोष्टी पण वर येत होत्या. माझ्या मूळ तत्त्वांवरच माझ्या वरच्या लोकांचा विश्वास नव्हता. प्रमोशन कडे डोळे ठेवून डोळेझाक केलेल्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी आता मनात घर करून बसल्या होत्या. रोज office ला जाताना परत कधी निघायचं यावरच लक्ष लागे. कॉफी, दुपारचं जेवण - सगळं मी एकटीने करायला लागले. कुणी रस्त्यात दिसणार नाही असा रस्ता, अशी वेळ निवडायला लागले. एकलकोंडी, घुमी बनून गेले होते. घरी आल्यावर सुद्धा मुलांचा दिवस कसा होता, प्रमोद काय म्हणतो आहे, कशातच मन नव्हतं. जीव कुरतडला जात होता. कोंडी फुटत नव्हती.
आणि एकदा दुपारी जेवून परत माझ्या डेस्ककडे येताना मला जोआन, माझी जुनी co-worker भेटली. आम्ही एकमेकींना गेली सात आठ वर्ष ओळखतो. मला बघून ती थबकली. "तू बरी आहेस.ना? तुला एक hug हवी आहे का?" म्हणाली. माझे डोळे डबडबले. तिने मला मिठी मारली, आणि पाठीवर थोपटत म्हणाली - "तू म्हणजे फक्त ऑफिस मधली तू नाहीस.. तुझी मुलं, तुझं robotics च volunteering, असे खूप पैलू आहेत तुझे. हे लक्षात ठेवशील ना?"
घरी आल्यावर सुद्धा माझ्या मनात जोआनचा आवाज घुमत होता. प्रमोदशी बोलले. तो म्हणाला, "मनू , मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करतो आहे गं. तुला असं कोमेजलेलं बघवत नाहीये मला. थेरपी ची appointment घेशील का? प्रयत्न तर करायला काय हरकत आहे? मी आहे गं तुझ्या बरोबर.."
मला त्याच्याकडे बघून जाणवलं की काहीतरी चुकतंय. आपल्याला ही कोंडी फोडता येत नाहीये, तर काय हरकत आहे कुणाची तरी मदत घ्यायला!
मी मग एका थेरपिस्ट ची appointment घेतली. तिथेही तेच! मला काय होतं आहे हे मला सांगता येईना, मी परत रडायलाच लागले. पण थेरपिस्ट खरंच चांगला होता. त्याने मला एक एक करून गुंता सोडवायला मदत केली. त्याने मला रोज लिहायला सांगितलं - जेव्हा केव्हा वाटतं की 'मला आत्ताच्या आत्ता घरी जायचं आहे" , तेव्हा हे लिहायचं की कशा मुळे ही भावना trigger झाली. त्यावरून मला pattern शोधता आले. मग त्या पॅटर्न वरून आधीच मनाची तयारी केली, की आपोआपच ती भीती, अस्वस्थपणा यायचा वेळ कमी होत गेला.
असे दोन तीन महिने होऊन गेल्या नंतर एकदा संध्याकाळी आम्ही चौघे - प्रमोद, मी आणि मुलं बाहेर जेवायला गेलो होतो. आणि अचानकपणे मला जाणवलं - "आपण इथे नाहीच आहोत. जणू काही माझ्या मनावर मीच निराशेचा कोष विणला होता. Negative विचार आणि स्व संवादातून हळूहळू तो घट्ट होत गेला होता. मी घुसमटत होते.. प्रमोद आणि मुलं सदैव इथेच होते, माझ्या सोबत, माझ्यासाठी थांबलेले, पण खूप दिवस मीच कुठे तरी भरकटले आहे.. पण आता तो कोष मी फाडला आहे, मला आता श्वास घेता येतोय, मुलांची किलबिल जाणवते आहे. माझ्या हातावर असलेल्या प्रमोदच्या हाताची उब मला आता सुखावते आहे.." इतका उत्कट क्षण होता तो! आपण भरकटलो तरी हे माझं इवलं जग माझ्यासोबत आहे, असेल.. हे समजण्याचा आश्वासक क्षण!
थेरपी सुरू केल्यावर मला हे समजलं होतं की आपण बरे होतो आहे, पण असा एकदम निर्णायक क्षण येईल अशी अपेक्षाच नव्हती. त्या नंतर जादू झाल्या सारखं वाटलं, निराशेचा कोष गळून पडला आणि मी परत मी झाले!!
या गोष्टीला आता दोन तीन वर्ष झाली. पण अजूनही मी डायरी लिहिते. आपल्याच वागण्याकडे त्रयस्थपणे पाहिलं, की आपोआपच solution समोर यायला लागतं.
काल ऑफीस मधून बाहेर पडता पडता रश्मी दिसली. मी दचकलेच तिला बघून. आत्मविश्वासाने वावरणारी, उत्साही रश्मी एकदम मलूल दिसत होती. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ आली होती, डोळे पाणारले होते. तिच्या recent divorce विषयी बोलली होती मागच्या महिन्यात. मी पटकन तिचा हात धरून तिला विचारलं - "बरी आहेस ना ग रश्मी? तू म्हणजे कुठलं एक नातं नाहीस, तुझं office मधलं काम, तुझं कथ्थक, तुझं फूड बँकेचं काम.. खूप पैलू आहेत तुझे. लक्षात ठेवशील ना?"
काल पासून रश्मी मनातून जात नाहीये. आता सोमवारी परत जाईनच तिच्या डेस्क वर तिच्याशी बोलायला, पण वाटलं लिहावी ही अशीही आपली गोष्ट. असलीच कुणी जराशी गडबडलेली मनू किंवा रश्मी इथे, तर कळू दे तिलाही - बये, एकटी नाहीस तू. तुझ्या सोबत तुझं स्वतःचं कोणी ना कोणी थांबलं आहे, फक्त तो निराशेचा कोष फोडायचा अवकाश आहे..
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
खूप छान लिहिले आहेस.
खूप छान लिहिले आहेस.
अशी जोआन, असा प्रमोद, असा थेरपिस्ट सर्वांना मिळो....
छान!
छान!
छान!
छान!
किती सुंदर लिहिलंय.
किती सुंदर लिहिलंय.
आता पर्यंत माझा विश्वास होता की झोकून देऊन काम करायचं - result मिळतोच! >> मिळणारे result स्वतः ला कामात हरवून देण्याच्या समाधानात असतात.
प्रमोशन, raise... मिळतोच असं नाही. कित्येकदा तर दखलही घेतल्या जात नाही.
धन्यवाद मानव, धनवन्ती, मंजू
धन्यवाद मानव, धनवन्ती, मंजू ताई, वामिका आणि शर्मिला!
धनवन्ती,
मी खूप नशीबवान आहे. अशी जोआन, प्रमोद, असा थेरपिस्ट आणि खूप प्रेमळ माणसं माझ्या आयुष्यात आली आहेत.. सगळ्यांनाच अशी माणसं मिळू दे.
शर्मिला,
खरं आहे तुमचं. काम करायची मजा घेता यायला हवी. आपण कोण आहे हे आपल्याला पक्क ठाऊक असेल, तर आपल्या कामासाठी, आपल्या तत्वांसाठी external recognition ची आवश्यकता नाही. असा logical विचार माणसापर्यंत पोचण्यासाठी negativity च vicious circle तोडणं मात्र गरजेचं आहे.
छान
छान
छान लिहिलयं!
छान लिहिलयं!