मनातली मूगडाळ
धरून चालूया की तुम्ही ३५ किंवा ४० वर्षांचं आयुष्य जगलेले आहात. या प्रवासात असे असंख्य प्रसंग आले असतील, जिथे तुम्ही “जाऊ दे”, “आपलीच माणसं आहेत”, “दुर्लक्ष करू” अशा विविध कारणांच्या आड अनेक अप्रिय अनुभव गिळून टाकले असतील जणू कित्येक किलो मूग गिळल्यासारखे.
पण हे सगळं कसं पचवायचं? कोणत्या मार्गाने, कोणत्या पद्धतीने?
की आयुष्यभर पोटात साठवत राहायचं…??
आणि वरून शांत असल्याचं नाटक करत राहायचं?
खरं तर जे बोललं नाही, जे व्यक्त झालं नाही, तेच आत खोलवर जखम बनून राहतं. म्हणून कधीतरी तरी स्वतःशी प्रामाणिक व्हा, मनातलं हलकं करा. कारण सगळं गिळून जगणं म्हणजे समंजसपणा नसतो. ते हळूहळू स्वतःपासून तुटत जाणं असतं.
आणि जे व्यक्त केलं जातं, तेच हलकं करतं. जे मनात धरून ठेवतो, तेच आतून पोखरतं. म्हणून प्रत्येक वेळी गिळून टाकणं हाच पर्याय नसतो. कधी शांतपणे बोलणं, कधी सीमारेषा आखणं, तर कधी “हे मला मान्य नाही” इतकं स्पष्ट सांगणंही तितकंच आवश्यक असतं. कारण स्वतःची मनःशांती जपली, तरच नाती टिकतात… आणि आपणही.
मनातली मूगडाळ हे भारी शीर्षक
मनातली मूगडाळ हे भारी शीर्षक दिलंय. अर्थपूर्ण आहे.
प्रतिसाद वाचून मग सविस्तर प्रतिसाद देईन.
अगदी बरोबर लिहिले आहेस
अगदी बरोबर लिहिले आहेस दक्षिणा
खूप छान , संयत शब्दांत लिहिलं
खूप छान , संयत शब्दांत लिहिलं आहेस.
कधी शांतपणे बोलणं, कधी सीमारेषा आखणं, तर कधी “हे मला मान्य नाही” इतकं स्पष्ट सांगणं हे तूच सांगितलेले तीन्ही उपाय आलटून पालटून करत असते...कधी उपयोग होतो, कधी नाही.
कधी कधी ती वेळ तर निभावून जाते, पण समोरच्याच्या मनातली अढी जात नाही...त्याची चूक असूनही.
छान लिहीले आहेस आणि खरेही आहे
छान लिहीले आहेस आणि खरेही आहे
आवडलं. स्वानंदी शी सहमत!
आवडलं. स्वानंदी शी सहमत!
छान लिहिलं आहेस. स्वानंदी शी
छान लिहिलं आहेस. स्वानंदी शी सहमत मी ही... किंबहुना प्रत्येक माणसाची हीच स्ट्रॅटेजी असेल.
>>> कधी शांतपणे बोलणं, कधी
>>> कधी शांतपणे बोलणं, कधी सीमारेषा आखणं, तर कधी “हे मला मान्य नाही” इतकं स्पष्ट सांगणंही तितकंच आवश्यक असतं. कारण स्वतःची मनःशांती जपली, तरच नाती टिकतात… आणि आपणही.<<<
काही नाही फायदा सांगुन. इतकी वर्षे ज्यांना समजत नाही , आता उगाच वेळ नाही घालवायचा. सरळ तोडुन टाकायचं नातं. सगळं छान आणि शांत वाटतं.
दक्षिणा, एकेक लेख जबरदस्त!
दक्षिणा, एकेक लेख जबरदस्त! काय खावुन राहिलात का गिळलात?
ह. घ्या.
हिलिंग जर्नी हॅज बिगॅन … असं समजायचं का?.
—
वरच्या लेखावरून आठवले,
माझ्या एका मैत्रीणीला असाच नारसिस्ट आईकडून लहानपणापासुन त्रास झालेला. तिला ऑटोईम्युन कॅडिशन्स्चा त्रास होता. एक दिवस सगळी भडास तिने काढली आणि तिला तब्येतीत फरक जाणवला. अर्थात, नाते तिने तोडलेच नंतर आईशी.
तर फार घुसमट ठेवली तर तब्येत खराब होते हे खरं आहे.
स्फुट आवडलं.
स्फुट आवडलं.