नाती

Submitted by शर्मिला. on 14 February, 2026 - 03:24

नाती

मैत्रीची नाती परकी झाली
रागावू कुणावर |

अंतस्थ नाती दूर राहिली
लोभवू कुणावर |

छाया माझी नाहीशी झाली
साथ मागू कुणाला|

अंतरीची वेदना जाळीत राहिली
दाद मागू कुणाला|

सरळ दिसणारी वाट निसरडी झाली
आधार घेऊ कुणाचा|

वेदना माझी गीत झाली
सूर मागू कुणाला|

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता जुनीच आहे सामो...
एकटेपणाचं फिलिंग कालातीत आहे. हल्ली सगळे तसे एकटेच असतात नं...

शर्मिला,
कविता छान आहे, पण वाचताना दुखलं काहीतरी आत.. तुम्हाला एक गोड hug!