आमच्या वर्गात एका मुलाचे आडनाव हेन्दरी होतं. त्याचं आठवा हेन्री हे नाव पडलं ते शेवटपर्यंत,
मी थोडा वाकडा चालायचो. म्हणून मला देवानंद हे नाव पडलेलं.
मुलींच्यात - एक मुलगी डब्यावर अमूल बटर आणायची. तिला मख्खन क्वीन असं नाव मुलींनी दिलं होतं. नंतर फक्त ए मख्खन एव्हढच राहिलं.
एक मुलगा खरं बोलायचा. इतरांच्या व्रात्यपणात सामील व्हायचा नाही. त्याला गांधीजी नाव पडलं होतं.
एका मुलाचा हात प्लास्टर मधे होता. त्याला तुंड्या संज्या नाव पडलेलं कारण संजय नावाचे दहा बारा जण होते. बाकिच्यांना अनुक्रमे कवी संज्या, पंचाईत संज्या आणि बाईल्या संज्या अशी नावे होती.
पंचाईत संज्या म्हणजे त्याच्यावर एकदा दुसर्या भागातल्या मुलांनी आयडेन्टिटी क्रायसिस होऊन पिछवाड्यावर वार केले होते.
बाईल्या संज्या हा देखणा असल्याने कायम मुलींच्यात असायचा. जेव्हां कधी मुलांच्यात येईल तेव्हां त्याला या नावाने हाक मारली जायची.
अशीच शाळेत किंवा मित्रमैत्रिणींच्यात पडलेली मजेशीर नावं आठवूयात.
लहानपणी कॉलनीच्या क्रिकेट टिम
लहानपणी कॉलनीच्या क्रिकेट टिम मध्ये कच्चा लिंबु म्हणुन प्रवेश मिळाला तेव्हा चेंडु जास्त वर जाऊन खाली येताना कॅच पकडताना मी जीभ बाहेर काढायचो आणि ती कॅचही माझ्या हातुन सुटायची. मग दोन तीन वर्षे माझं टोपण नाव जीभकाढ्या पडलं होतं.
एका मित्राचा धाकटा भाऊ शरद्या-टेरद्या म्हणायचा त्याचं फक्त टेरद्या उचलुन नंतर मित्रांनी त्याचे टेरू केले. ते ही काही वर्षे चालले.
शाळेत सरांची टोपण नावे - एक सारखे किटकिट करायचे म्हणुन 'किटकिट्या', एका सर सारखे 'डाफरतात' म्हणुन 'डाफऱ्या', एक धावत येऊन रपकन पाठीत रट्टा मारायचे पोरं कळवळायचे त्यांचे 'सांड' एक दारुडे होते (शाळेत पिऊन येत नसत पण एक दोनदा वास आला असे काही मुलं म्हणत) त्यांचे 'मड्डु', एक न चिडणारे त्यांचे 'योगी'.
असा धागा होता का?
असा धागा होता का?
मला लहानपणी चाळीतील मित्र मामा हाक मारायचे.
आणि चाळीतील बायका होनाम्या हाक मारायचे. कारण मी फार गुबगुबीत होतो.
शाळा कॉलेजमध्ये मी माझ्या वयाच्या मुलाना वयापलीकडचे ज्ञान द्यायचो म्हणून गुरू हाक मारायचे.
आता माझ्या मुलांनी जी नावे दिली आहे तो स्वतंत्र धाग्याचा विषय ठरेल...
थंडगार प्रतिक्रिया देते
थंडगार प्रतिक्रिया देते म्हणून किंवा काहीही फरक पडत नाही आणि आडनावावरून
कुल्लू पाडलं होतं कॉलेज मध्ये नाव
शाळेत एव्हडी नावं ठेवली नाहीत
शाळेत एव्हडी नावं ठेवली नाहीत पण कॉलेजमध्ये एकीचं नाव शुभांगी होतं तिला बॉलर शोएब अख्तर आवडायचा ती ते कबुल करायची नाही तरी पण आम्ही तिला शोएब म्हणून हाक मारायचो.
मला कॉलेजमध्ये सिमरन म्हणूनच हाक मारायचे जो की इथला आयडी आहे कदाचित मी फारच आज्ञाधारक होते कॉलेजात असताना किंवा त्यांना DDLJ ची सिमरन आठवत असावी.आणि खऱ्या नावालापन सूट होतं म्हणून असेल कदाचित .पण आवडतं मला हे नाव म्हणून आयडी घेताना हाच घेतला.