
१५."असेही चमचमते चांदणे!!!"
हेमंत नाईक
११.०४.२४
हॅमील्टन गार्डन बघून वैटामो येथे वळणदार रस्त्यावरून जाताना खिडकीबाहेरचा निसर्ग आचंबित करत होता.तासभरात येथे पोहचलो.
ग्लोवर्म केव्ह एकशेतीस वर्षांहून अधिक काळ पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वायटोमो केव्ह पैकी सर्वात प्रसिद्ध आहेत.
वैटोमो येथे तीन गुहा आहेत, प्रत्येक गुहेचा अनोखा अनुभव आहे.
त्यांच्या विपुल प्रमाणात ग्लो वर्म्स, विस्तृत भूमिगत नदी प्रणाली आणि आश्चर्यकारक स्टॅलेक्टाइट आणि स्टॅलेग्माइट्स फॉर्मेशन्ससाठी या प्रसिद्ध आहे.
*वैटोमो गुहांची सहल म्हणजे दुसर्या जगाची सहल....!!*
असेही गाईडने माहिती देतांना सांगितले.
वैटोमो येथे असताना तुम्ही पायी तीन्ही गुहा पाहू शकता; वैटोमो ग्लोवर्म लेणी, रुकुरी गुहा आणि अरनुई गुहा.
प्रत्येक गुहा अद्वितीयपणे जादुई आहे आणि स्वतःचा इतिहास सांगते..
हमिल्टनपासुन ७७ किमी वरअसलेल्या या ग्लो वर्म केव्ह हे न्यूझीलंड चे प्रमुखआकर्षणआहे जगातील न्यूझीलंडला येणारा प्रत्येक पर्यटक हा येथे गेल्याशिवाय राहत नाही
“ओर्चान्कॅम्पा ल्युमिनोसा”(अर्चोना- SPIDERLIKE कंप-लार्वा,ल्युमिनोसा- LIGHT PRODUCING) हा ग्लोवर्म मंदअसा निळा प्रकाश आपल्या लार्वा अवस्थेत असतांना शेपटातून रेडीएट करतो त्याचा शेपटात असलेल्या केमिकलचे ऑक्सिजन बरोबर अक्शन होऊन लाईट तयार होतो आणि या आणि अशा लक्षावधी लार्वा या गुहेच्या छतास व भिंतीस चिकटलेल्या आहेत. या गुहेच्या तळास दोन मी वैटोमो नदीचे पाणी आहे. तीस लाख वर्षापूर्वी जेव्हा हा सर्व भाग समुद्राखाली होता तेव्हा व्होल्कानिक आणि जीओलोजीकल घडामोडीमुळे तयार झालेल्या व पावसाचे पाणी झिरपून तयार झालील्या या लाईम स्टोन गुहांचा शोध माओरी चीफ टेन तीनारौ याने १८८९ मध्ये लावला. साधारणत: १०० ‘ उंचीच्या डोंगरावरून खाली उतरून या केव्हस मध्ये प्रवेश आहे. प्रत्येकी ७५ डॉलरचे तिकीटआहे यात गाईड आणि बोट टूर इन्कलुड आहे... जास्त असले तरी पण तासभराच्या या टूर मधे पूर्ण पैसे वसूल होतात.
येथील ग्लो वर्म ग्रोटोमधून एक लहान बोट राईड सुरू करण्यापूर्वी गुहेतून जाताना जीऑलॉजिकल वंडर्स आश्चर्यचकित करतात.
लाईम स्टोन मध्येपाणी झिरपून तयार झालेले STALCTITIES आणि STAGLAMITIES व इतर फोर्मेशन या ठिकाणी दिसतात . तसेच कोरल व शिंपले याचे जीवाश्म देखील येथे आहे.
आत केव्ह मध्ये कमालीची थंडी जाणवत असल्याने स्वेटर्स घालण्याची सुचना गाईड ने दिली होती.जमिनीच्या खाली सुमारे शंभर फूट खोल नदीतील बोट राईडवर, तुम्ही शांतपणे बसा अशी सूचनाही दिली. (ग्लो वर्म्सना आवाज आवडत नाही) आणि मग या गुहेतील गुढ रहस्यमय निशब्द प्रवासासाठी आम्ही उत्सुक झालो होतो.
एका ग्रुप १६चा असतो अनेक पायऱ्या उतरल्यावर गुहेच्या तळाशी एका बोटीमध्ये आपल्याला बसवण्यात येते आणि निशब्द शांततेत आपला जेमतेम ५’ उंचीच्या गडद अंधारअसलेल्या गुहेतील प्रवास सुरु होतो … आजूबाजूस वर बघतो लक्षावधी ग्लोवर्म निळसर रंगीत तारकाप्रमाणे चम चम करत असतात…जणू काही विश्वातील सर्व आकाशगंगांचे विश्वरुपी दर्शनच आम्हाला झाले होते!! तीस मिनिटाच्या या बोटीच्या सहलीत सर्वजण निशब्द होते आणि सरतेशेवटी जसे गंगेचे गोमुख येथे जसे उगमस्थानआहे तसे वैटोमोनदीचे उगमस्थानातून डोंगराखालील कपारीतून आम्ही बाहेर आलो. …विस्मयकारी अनुभवांचा एक अमुल्य ठेवा घेवुन.
रुकुरी गुहा ही वैटोमो क्षेत्रातील सर्वात मोठी गुहा आहे आणि ती ४०० ते ५०० वर्षांपूर्वी सापडली होती. या व्हीलचेअर प्रवेश करण्यायोग्य गुहेत मानवनिर्मित दगडी प्रवेशद्वाराद्वारे प्रवेश करून आत मध्ये नागमोडी लाकडी वॉक वे द्वारे ही केव्ह एक्सपलोर करता येते रॉक फॉर्मेशनबद्दल जाणून घेऊ शकतो.
शेवटी अरनुई केव्ह आहे. अरनुई हे कोणत्याही ग्लो वर्म्सचे घर नसले तरी, कोणत्याही पाण्याच्या अनुपस्थितीमुळे, ते वैटोमो प्रदेशाने देऊ केलेल्या काही सर्वात नेत्रदीपक फिकट तपकिरी, गुलाबी आणि पांढर्या स्टॅलेक्टाइट्सचे घर आहे. अरनुईमध्ये तुम्ही जिथे पाहता तिकडे नाजूक, चमचमीत रचनांनी सुशोभित केलेले आहे, जे पाहून आपण मंत्रमुग्ध होतो..
प्रत्येक गुहा एकमेकांपेक्षा खूप वेगळी असल्याने तुम्हाला कोणती गुहा भेट द्यायची हे निवडण्यात अडचण आहे एन्ट्री फी पण बरीच आहे. बहुतेक पर्यटक ग्लो वर्म केव्ह मात्र आवर्जून बघतात.येथे मल्टी-केव्ह कॉम्बोजसह, तुम्ही तुमच्या वैटोमोमध्ये असताना दोन किंवा तीन लेण्यांना सवलतीच्या दरात भेट देऊ शकता!
*_असेही चांदणे_*
_नभीचे चमचमते चांदणे_
_धरेच्या पोटात दिसले.._
_अनेक आकाशगंगांचे_
_विश्व आज मी पाहिले.._
_सोबतीस झुळ झूळ नदी_
_गुहेत वाहती थंडगार वारे.._
_सौंदर्य अप्रतिम सुंदर पाहुनी_
_बोल आमुचे मुके जाहले.._
_निरव शांत होती शांतता_
_गडद अंधार दाट होता.._
_जीव लक्षावधी छतास वरती_
_दीप मंद ते निळे तेवत होते.._
_तिस जादुई त्या मिनिटांची_
_नकळत गुढ सफर संपली.._
_हिरव्या दरीच्या कपारीतून_
_बोट उजेडात ती आली.._
_पाहुनी ही ईश्वरी लीला_
_अजब दुनिया विस्मयकारी.._
_लेखणी ती उतावीळ होता_
_डायरी अजून समृद्ध जाहली.._
✍️हेमंत नाईक
११.०४.२४
या गुहांबद्दल आधी वाचले होते,
या गुहांबद्दल आधी वाचले होते, इथे मायबोलीवरच.
तुमचा अनुभवही आवडला.
धन्यवाद..
धन्यवाद..