कॅटाप्लाना - पोर्तुगीझ क्लॅम स्टू

Submitted by मेधा on 21 June, 2009 - 17:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२०-३० लिटल नेक किंवा चेरी स्टॉन क्लॅम
२०-३० मसल्स
१०-१५ मोठे श्रिंप -
२ रोमा टॉमेटो
दोन स्पॅनिश कांदे
एक बे लीफ ( तेजपान म्हणजे दालचिनीचं पान असतं, ते नव्हे, लॉरेल लीफ )
२ पाकळ्या लसूण
मरिनारा सॉस किंवा टॉमेटो पेस्ट अर्धा कप
ऑलिव्ह ऑइल
कोशर सॉल्ट किंवा सी सॉल्ट
पार्स्ले
चांगला इटालियन ब्रेड

क्रमवार पाककृती: 

श्रिंप साफ करून घ्यावेत ( शेल काढून, धागा काढून , धुउन, पाणी निथळून )
श्रिंपचे शेल्स बुडतील एवढ्या पाण्यात उकळावेत व ते पाणी गाळुन घ्यावे.
कांदे बारीक चिरून घ्यावेत.
टॉमेटो बारीक चिरून घ्यावेत.
मसेल्स व क्लॅम्स स्वच्छ धूऊन घ्याव्यात.
लसूण बारीक चिरून घ्यावी.

एका जाड बुड्याच्या पातेल्यात ( डच अव्हन सारखे पातेले बेस्ट ) तेल तापवून त्यावर कांदा व लसूण परतून घ्यावे. कांदा पारदर्शक झाला की त्यात एक बे लीफ घालावे, टॉमेटॉ , टॉमेटो पेस्ट/ मारिनारा सॉस घालावा व श्रिंप च्या शेल्सचे पाणी अर्धा कप घालावे. आवडत असल्यास थोडी व्हाईट वाईन सुध्दा घालता येईल. मंद आचेवर, झाकण लावून हे मिश्रण १०-१२ मिनिटे उकळू द्यावे.
नीट ढवळून परत थोडे पाणी घालून त्यात श्रिंप्स, मसेल्स व क्लॅम्स घालून घट्ट झाकण लावून दोन्-तीन मिनीटे शिजू द्यावे.
उघडून बारीक चिरलेली पार्स्ली घालून लगेच सर्व्ह करावे. ( पसरट सूप बोल किंवा पास्ता डिश मधे )
बरोबर इटालियन ब्रेडच्या स्लाईसेस घ्याव्यात.

कियांटी, रिओहा किंवा शिराझ बरोबर एकदम मस्त लागतो हा प्रकार.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

आवडत / चालत / मिळत असल्यास दोन लिंक चोरिझो सॉसेज चे तुकडे कांद्याबरोबर परतून घालावेत.
प्रोझुटो च्या जाडसर स्लाइसेस मिळाल्यास त्याचे पण चौकोनी तुकडे घालता येतात.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेटवर वाचून; रेस्टॉरंटमधे खाऊन; घरी केलेले प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users