न्यूझीलंड डायरी...१२ आज पाव जमीपे नही थे मेरे!!

Submitted by हेमंत नाईक. on 20 January, 2026 - 04:08

१२ आज पाव जमीपे नही थे मेरे!!
हेमंत नाईक

कोण म्हणतं घडयाळ मग जात नाही?
आज इथं न्यूझीलंडला एप्रिलच्या पहिल्या रविवारी, यंदा ७ एप्रिल ला तिन वाजता चक्क एक तास घड्याळ मागे केले जात आणि काटा दोन वर मागे फिरवला गेला .

हे सार डे लाईट अडजस्टमेन्ट साठी असतें. तसेच सप्टेंबरला शेवटच्या रविवारी मध्ये घड्याळ एक तास पुढे केले जाते.

जे देश विषवृत्ता पासून खूप दूर आहेत तेथे ही अडजस्टमेन्ट केली जाते.

आज रोटोरुआच्या व्हॅली परडाईस स्प्रिंग बद्दल लिहिणार आहे.. मुख्य शहरापासून १५ कि मी. वर जंगलात हा *व्हॅली परडाईस स्प्रिंग* म्हणजे नितळ पाण्याचा खळखळणारा झरा असलेली सुंदर स्वर्गस्वरूप दरी हा एक जंगलातील सुंदर स्पॉट आहे.

सुरवातीला सोव्हीनिअर शॉप व रेस्टॉरंट आहे. येथे लहान मुलासाठी मिनिट झू आहे..

ज्ञात तथ्य,जगात सिंहांची आपत्तीजनक घट झाली आहे ते नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

मूलतः आफ्रिका, युरोप, मध्य पूर्व आणि आशियाच्या मोठ्या भागांमधून, सिंह आता आफ्रिकेतील काही जंगलात आणि भारतातील (आशियाई सिंह) गिरच्या अभयारण्यातील लोकसंख्येपर्यंत मर्यादित आहेत. गेल्या शतकात अंदाजे दोन लाख जंगली सिंह होते, परंतु आजकाल त्यांची संख्या फक्त विस हजाराच्या च्या आसपास आहे आणि अजूनही कमी होत आहे.

या व्हॅली परडाईस स्प्रिंग येथे असलेल्या झू मध्ये पाच सहा आफ्रिकन लायन असून त्यांना दुपारी २.३० वाजता त्यांना फीडिंग केले जाते... इतरही बरंच प्राणी आहे.. कांगारुसारखा छोटा वालबे, लामा , विविध पक्षी, हरण, पाण्यातील सुंदर ट्राऊट मासे आणि त्यांना फीड करण्यासाठी तुम्हाला फीडिंग दिले जाते.. हरण तुमच्या जवळ दिलेले खाद्य खातात त्यामुळे इतक्या जवळ येणारी माणसाळलेली हरण प्रथम बघितली.

इथे वाहणारा झराही इथले मुख्य आकर्षण आहे नितळ स्वच्छ पाणी त्यात पोहणारे बदक आणि आजूबाजूस असलेली घनदाट हिरवी झाडी आणि अशा या सुंदर निसर्गातून तुमचा झऱ्याच्या कडेकडेने होणारा प्रवास कसा संपतो तुम्हालाच कळत नाही.

उंच भव्य रेडवुड वृक्षांमध्ये जमिनीपासून उंच एक आश्चर्यकारक चालणे - रोटोरुआत केलेच पाहिजे!

_आज पाय जमीनीवर नव्हते माझे_
_पंखाविना कळले सुख उडतानाचे.._
_धरेचा रंग सभोंवती फक्त्त हिरवा_
_हिरव्यात हरवलेले आकाश निळे_

*रेड वूड वॉक* हे अजून एक रोटोरुआचे अजून एक आगळेवेगळे आकर्षण आहे. तेथे उंच उंच वृक्ष असून जमिनीवर चाळीस पन्नास फूट उंचीवर चालण्यासाठी वॉक वे असून ते विश्वास पंचवीस ठिकाणी ससपेन्शन ब्रिजेसने एकमेकांना जोडले आहे हा उंचावरून फिरण्याचा अनुभव आणि सभोवतीचा निसर्ग अविस्मरणीय आहे.

आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचे रक्षण करण्यासाठी वॉकवे विशेष डिझाइन आणि तसा तो बांधण्यात आला आहे.

१२० वर्षे जुन्या रेडवूड जंगलात ७०० मीटर लांबीचे पूल आणि मधोमध दाट झाडीच्या मधील प्लॅटफॉर्म.
भव्य रेडवुड्सच्या झाडांमध्ये उंचावर जा. रोटोरुआच्या रेडवुड फॉरेस्टचा आणि वरून आणि सुमारे दीडशे वर्षांच्या दिग्गज वृक्षाना जवळून अनुभवता येते.

हे पर्यावरणीय वॉक जंगलातील अनोखे पक्षीनिरीक्षणही प्रदान करते, त्याचे नयनरम्य सौंदर्य आणि मधूर किलबिल कान आणि डोळे दोन्ही तृप्त करते.

_उंचउंच रेडवूड झाडें_
_उंचावर आम्ही सर्व.._
_हिरव्यात नभ अवघे झाकले_
_खाली दिसें हिरवे सौंदर्य.._

_झाडामध्ये जोडणारे_
_अनेक झुलते पूल.._
_पक्षी निरीक्षणास इथं_
_उंच गोल प्लॅटफॉर्म.._

_जमिनीवर चालण्याची_
_सवय ती आम्हास_
_उंचावरून चालण्याची_
_गंम्मत आगळी खास_

✍️हेमंत नाईक
०७.०४.२४

Group content visibility: 
Use group defaults