तिसर्‍यांची मसाल्याची भाजी ( तोंडाक )

Submitted by मेधा on 21 June, 2009 - 16:46
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चार वाट्या सुट्या तिसर्‍या
चार कांदे,
दोन बटाटे
एक लसणीचा कांदा
पाच हिरव्या मिरच्या
एक वाटी नारळ
एक चमचा खसखस
अर्धा चमचा जिरे
दोन मोठे चमचे गरम मसाला
चिंच, मीठ

क्रमवार पाककृती: 

एक कांदा उभा पातळ चिरून घ्यावा. हा कांदा , खोबरे व खसखस थोड्या तेलावर भाजून, पाट्यावर जाडसर वाटून घ्यावा. त्यातच चिंच, लसणीच्या आठ पाकळ्या व जिरे घालून वाटावे.

उरलेले कांदे बारीक चिरून त्यात शिंपल्या, वाटण, मिर्च्यांचे तुकडे, बटाट्याचे चौकोनी तुकडे, गरम मसाला , मीठ एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
अस्सल खाणारे दोन जण
अधिक टिपा: 

मुंबईत असताना खाऊन पाहिलाय हा प्रकार पण स्वतः केलेला नाही.

माहितीचा स्रोत: 
गोमंतकीय पाककृती - सौ लक्ष्मी भिकू पै-आंग्ले
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोनू, आज काय तिसर्‍या स्पेशल की काय.
जीवघेणी रेसिपी आहे. कधी खाऊन पाहिली नाही. पण मस्तच लागत असणार.

शोनू, तिसर्‍या म्हणजे पिप्पीज का मसेल्स?

मसेल्स नव्हे. इथे क्लॅम्स म्हणुन मिळतात. चित्र कुठे दिसलं तर टाकते लिंक थांब.

मी सेम अशीच करते... काय लागते.....

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...