शब्दांचा योगी

Submitted by अर्जुन ..✍️ on 19 January, 2026 - 13:28

रात्रीच्या त्या काळोखात,
मज नीज काही येईना...
आयुष्याच्या प्रवासात,
तो भास मला जगू देईना.

कितीही मी लांब गेलो,
तरी फिरून समोर येते,
मनाच्या संघर्षात,
पुन्हा डोळ्यांसमोर तीच दिसते.

कितीही पाठ फिरवली,
तरी गाण्यातून ऐकू येते,
आणि कवितेच्या शब्दांतून,
माझ्याशीच बोलू पाहते

शब्दांचा हा योगी,
भान हरपून गेला,
त्या आठवणींमुळे,
लेखणीचा सखा झाला.

असं हे वेड मनावर राज्य करते,
क्षणोक्षणी लिहायला प्रेरणा देते,
आणि लेखणीच्या रूपात,
मनातच घर करून राहते.

© 2026 Arjun (कल्पनेचा कुंचला' ✍️). All Rights Reserved.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users