मनाचे वय

Submitted by 'कल्पनेचा कुंचला' ✍️ on 18 January, 2026 - 03:00

जे हातात आहे, फक्त त्याचीच काळजी असावी
आणि वाढणाऱ्या वयाला रसिकतेने मात द्यावी
छंद असे जोपासावे, ज्यामुळे आयुष्याला अर्थ मिळावा
आणि आपल्या प्रकाशाने समोरचाही उजळून निघावा

चेहऱ्यावर कितीही सुरकुत्या पडू देत
आणि डोक्यावरचे कितीही केस गळू देत
पण शरीराचे अति लाड करताना मात्र
मनाच्या शुद्धीकरणाची सद्बुद्धी घडू देत

फक्त सौंदर्यावर जमणारे प्रेम फार काळ टिकत नाही
वयासोबत कमी होत जाणाऱ्या गोष्टींवर गर्व करून चालत नाही
जे विचारांनी आणि भावनांनी जवळ येतात
ते मात्र कधीच एकमेकांना विसरत नाहीत

शब्दांची निवड मोत्यासारखी असावी
करुणा आणि प्रेमाची शिदोरी व्हावी
आणि आपल्या शब्दांना एक धार यावी
की अनेकांची मने घायाळ व्हावी

वय कितीही असू दे, मनाने मात्र तरुण असावे
शरीर कसेही असू दे, मन मात्र निर्मळ असावे
कशाला हवी चर्चा त्या वाढणाऱ्या वयाची
आणि एक दिवस मातीत मिसळणाऱ्या या नश्वर देहाची

© 2026 Arjun (कल्पनेचा कुंचला' ✍️). All Rights Reserved.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users