
*११.पॉलीनेशिअन स्पा*
..हेमंत नाईक
०६.०४.२४
रोटोरुआमध्ये उगवणारे प्रत्येक गरम खनिज झरे येथील मुळ रहिवासी माओरीने ओळखले आणि नाव दिले.
पाण्याला वाईरीकी म्हणून ओळखले जाते, हे स्वतःच उच्च सन्मानाचे शब्द आहे. याचा अर्थ देवतांचे पाणी असा आहे जरी त्याचा अर्थ गरम पाण्याचा झरा असा केला जातो. या पाण्याला माओरी खजिना मानतात.
रोज सकाळी अंघोळ करताना आपण पवित्र मानलेल्या सात नद्यांना त्या पाण्यात येण्याचे आवाहन करणारा श्लोक म्हणतो.
गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥
माओरीना पवित्र असलेल्या नैसर्गिक गरम पाण्याच्या या पॉली्नेशियाई स्पा मध्ये सवयीने नकळत आजही हा श्लोक माझ्या ओठी आला.
पॉलिनेशियन स्पा १९७२मध्ये स्थापन झाल्यापासून रोटोरुआ पर्यटन उद्योगाचे प्रमुख आकर्षण आहे. जगातील अग्रगण्य नैसर्गिक गरम मिनरल्स स्नान आणि स्पा उपचार असलेली ही सुविधा पूर्वी माओरीच्या मुखीयाने स्थापन केलेल्या ऐतिहासिक बाथ हाऊसच्या जागेवर बांधण्यात आली होती ज्यासाठी हे शहर १८०० च्या दशकात प्रथम जगप्रसिद्ध झाले होते . .
पॉलिनेशियन स्पा येथील सुमारे अठ्ठावीस हॉट पूलमधील उपचारात्मक पाणी दोन भिन्न नैसर्गिक झऱ्यांमधून येतात.
पहिल्या प्रीस्ट स्प्रिंगचे नाव फादर महोनी या कॅथोलिक धर्मगुरूच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, जे १८७८ मध्ये पाण्यात आंघोळ केल्याने त्यांच्या अपंग संधिवात 'बरे' झाले होते. प्रिस्ट स्प्रिंगचे थोडेसे अम्लीय पाणी आहे ते थकलेले स्नायूच्या वेदना कमी करते.
दुसऱ्या राहेल स्प्रिंग अल्कधर्मी पाण्याचा स्त्रोत आहे, ज्यात सोडियम सिलिकेटची जंतुनाशक क्रिया त्वचेला पोषक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या असे म्हटले जाते की जे लोक राहेल स्प्रिंगच्या पाण्यात स्नान करतात त्यांना अविनाशी सौंदर्याचा आशीर्वाद मिळतो
या दोन प्रकारच्या खनिज पाण्याचे मिश्रण फक्त पॉलिनेशियन स्पामध्ये आढळते.
रोटोरुआ येथे ठिकठिकाणी ऍसिडिक गरमपाण्याचे झरे असल्याने हॉट वॉटर स्पा बरेच आहेत. त्यात जगप्रसिद्ध पॉलीनेशिअन स्पा अनुभवण्यासारखा आहे.
आम्ही दोन वर्षापूर्वी नोव्होटेल या लेक फ्रंट हॉटेलला उतरलो होतो , यावेळी मात्र टाउनहाउस बुक केले होते दोन बेडरूमचे. तळमजल्यावर लिव्हिंग किचन डायनींग व बेडरूम्म वा वरच्या मजल्यावरएक बेडरूम आणि मागच्या अंगणात स्वतंत्र हॉट स्पा असलेले. त्यामुळे रोज नातवासोबत स्पा एन्जॉय करता आला. इथे बोअरिंगला गरम पाणी बऱयाच ठिकाणी लागते त्यामुळे हॉटेल मध्येही याच खनिज गरम पाण्याचा वापर होतो.
पॉलिनेशियन स्पा येथे प्रतिष्ठित भू-औष्णिक आंघोळीचा अनुभव आहे, ज्यामध्ये अम्लीय आणि अल्कधर्मी नैसर्गिक खनिज स्प्रिंग्समध्ये स्नान करण्याच्या संधी आहेत. इथे वेगवेगळ्या पूल असून, प्रायव्हेट स्पा पण उपलब्ध आहे. वेगवेगळ्या तापमानाचे पूल आहेत.
आम्ही येथे आलो असताना समोर सुंदर विस्तीर्ण रोटरूआ लेक वरतून पडणारा थंडगार पाण्याचा पाऊस आणि स्पा पूल मध्ये गरम पाण्याचा शेक हा दुर्मिळ योग अनुभवता आला. पोलिनेशीअन स्पाचा अनुभव सर्वं थकवा दूर करणारा ठरला.
बदकाच्या आकाराची आणि त्याच्या प्रमाणेच पाण्यावर व जमिनीवर चालणारी डक बस द्वारे सुमारे अडीच तासाची सिटी व लेक टूर येथे कंडक्ट केली जाते.
रोटोरुआ लेक वर वॉटरफ्रंट बघताना भान विसरायला होते.. तळ्यात दोन काळे हंस स्वरूप पक्षी दिमाखात विहार करत होते अनेक बदके होती आणि समोरच पाण्यावर उतरल विमान होत, इथून विमानाद्वारे उंचावरून निसर्ग बघण्याच्या ट्रिप या लेक वरून आयोजित केल्या जातात.
या तळ्याकाठी मुलासाठी अनेक खेळणे उपलब्ध असलेले गार्डन, रंगीबेरंगी फुले आणि स्केटिंग ट्रेक, वूडन वॉक वे, मखमली हिरवळ सारच खूप छान होते.
इथे ठिकठिकाणी माओरी संस्कृती दाखवणारे शो आयोजित केले जातात. येथून काही अंतरावर जेट बोटिंगचा वेग अनुभव घेता येतो.
लेक जवळ असलेल्या विस्तीर्ण सरकारी गार्डन मध्ये वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली अप्रतिम भव्य वास्तू अगदी दिमाखात उभी होती. पूर्वी म्युझिअम म्हणून वापरात असलेली इमारत आणि तिच्या सभोवती असलेला निसर्ग डोळ्याचे पारणें फेडतो.
या सुंदर निसर्गाचे वर्णन करायचा एक प्रयत्न या शब्दातून..
*_तथास्तु.._*
_निसर्ग सुंदर किती किती हा_
_त्याहुनी सुंदर ही भव्य वास्तू.._
_आनंद नांदे सदैव इथे_
_ईश्वर किविंना म्हणे तथास्तु.._
_पाहता या अद्भुत रुपाला_
_भान भानावर न राहते.._
_डोळ्यांचे पारणें फिटते कसे?_
_नेमके ते मज आज कळे.._
_शब्दात वर्णन करायला_
_जरी शब्द अपुरे जरी.._
_स्वानंदात मी डुबायला_
_नित्य लिहितो काहीतरी.._
_मित्र नित्य ग्रुपवर माझ्यासवे_
_जरी नाही ते आज इथे_
_कॉमेंट्स अन लाईक्सने_
_लेखणीस माझ्या स्फूर्ती मिळे_
_नाही काही आवडले जरी_
_खुशाल सांगा तुम्ही मला_
_चूक सुधारण्यासाठी हवा_
_सखा सोबती तो मित्र खरा_
_ हेमंत नाईक_
०६.०४.२४
वा झर्यांबद्दल खूप छान माहीती
वा झर्यांबद्दल खूप छान माहीती दिलीत. डक बस मजेशीर आहे.
कविता छान
स्नान, स्पा हे तर फारा आवडीचे
स्नान, स्पा हे तर फारा आवडीचे विषय. हा भाग आवडला नसता तरच नवल.
पुभाप्र.
धन्यवाद धनश्री, आणि अनिन्द्य.
धन्यवाद धनश्री, आणि अनिन्द्य.