मी उभी त्या किनाऱ्यावर ज्या किनाऱ्यावरी
कोणी नाही
दिसले क्षितिज दूरचे पण तसले काही नाही
येते चाहूल कुणाच्या येण्याची परत जाताना
पण मागे वळून बघत राहते त्या जाणाऱ्या लाटाना
रोज वांळुवरी उभी काय म्हणून बघते त्या सागराला
त्या असंख्य लहरी आणि त्या खळबळणाऱ्या आवाजाला
त्या झाडांना त्या रेतीला, त्या आकाशला आणि धरतीला
वाटते सांगावे त्यांना मनातले गुपित काही
अस काही जे कुणाला ठाऊक नाही
बरका, माझ्याही मनात राहतो एक अथांग सागर
तरीही मनाची माझी रीती आहे घागर
विचारांच्या लाटा सतत गर्दी करतात
आणि मोठ्या मोठया लहरी येऊन धडकतात
मोडतात घर माझे मी किनाऱ्यावर बांधलेले
आणि पुन्हा वेचले जात नाही स्वप्नं जे की सांडलेले
तुझ्यात अन माझ्यात एक अंतर आहे तू थकत नाही
पण मी थकत आहे
आणि एक आहे साम्य आपल्यात तुझ्या ही किनाऱ्यवर
कुणी येत नाही आणि मझ्याही
आर्तजा....
छान ! आवडली !!
छान ! आवडली !!
वा
वा
आवडली.
आवडली.
आपल्या अनमोल प्रतिसादा बद्दल
आपल्या अनमोल प्रतिसादा बद्दल धन्यवाद.