वर्ष २०२५ च्या आनंददायी घटना ; What made me happy in 2025

Submitted by अनिंद्य on 31 December, 2025 - 01:40

येत्या काही तासातच हे भिंतीवरून कचरापेटीत जाईल, याच्या जागी नवीन वर्षाचे नवे calender स्थानापन्न होईल. वर्ष २०२५ संपेल, नवे वर्ष सुरु होईल. वर्षभर घडलेल्या चांगल्या, उत्साहवर्धक, आनंददायी घटनांचा मागोवा घेण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस नाही.

मागच्या वर्षी याच दिवसात असाच धागा काढला होता, त्यात आपण सर्वांनी सरत्या वर्षाच्या आनंददायी घटना शेयर करून धाग्याला चार चाँद 🌙 🌙 🌙 🌙 लावले होते.

https://www.maayboli.com/node/86148

म्हणून यावर्षीही हा आनंद स्मरणाचा धागा.

मनुष्यस्वभाव दु:खाला गोंजारण्याचा आणि मिळालेल्या- मिळत असलेल्या सुखाला फारसा भाव न देण्याचा असतो. सुखस्मृतींचे स्मरण का कोण जाणे जाणिवपूर्वक केले नाही तर “आपोआप” घडत नाही.

२०२५ मधे घडलेल्या चांगल्या घटना, मिळवलेले-मिळालेले छोटे-मोठे यश, साधलेला उत्कर्ष, चढलेली पायरी, एखादी विशेष आनंदाची घटना, bucket list मधली जमून आलेली गोष्ट, मित्र-परिवारासह केलेले आनंद देणारे पर्यटन, झालेली इच्छापूर्ती- वांछासिद्धी याचे सुखद स्मरण करण्यासाठी हा धागा.

IMG_0926.jpeg

तर मंडळी, सरत्या वर्षाच्या Rear view mirror मधे तुम्हाला कोणते आनंदक्षण दिसतात ? २०२५ मधे घडलेले कोणते प्रसंग आठवून आनंद होतो ? अवश्य लिहा. आपल्या प्रतिसादांची वाट पहातो आहे.

नवीन पेरणी करतांना मागील सुगीचे सर्वात चांगले, सकस बियाणे शेतकरी वापरतात. Lets take only the happy memories and best learnings from 2025 and leave behind the chaff.

24410c61-197b-40b9-88f5-aa87ec2f0e58.jpeg

(वरील फोटोचा आणि धागाविषयाचा काही संबंध नाही. फक्त चॉकलेटप्रेमींची जीभ चाळवण्यासाठी डकवलाय)

सर्वांसाठी येते वर्ष सुखसमृद्धीधनस्वास्थ्यवैभवसंपृक्त ठरो ही मंगलकामना.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! काय छान धागा आहे
२०२५ माझ्याकरता फार फार मस्त गेले.
- फेब्रुवारीत नवा जॉब मानसिक स्वास्थ्य देउन गेला
- २ प्रोफेशमल सर्टिफिकेटस प्रयत्नपूर्वक मिळवली.
- कौटुंबिक आघाडीवरतीही प्रियजनांचे यश साजरे करता आले. मेनी प्राऊड मोमेन्टस.
- मेडिटेशन फार फार फार उत्तम झाले. नवीन स्तोत्रे सापडली.
- दुर्गेची ३२ नावे पाठ आहेत आता. नखे कुरतडण्याची सवय पार पळुन गेली. ही सर्वात मोठी या वर्षाची, सरता सरता दिलेली देण आहे.

- नवा जॉब
- उज्जैन महाकाल दर्शन - आयुष्यात पहिल्यांदा
- professional आणि personal level वर स्वतःला सुधारताना, grow होताना बघितलं
इतके दिवस stagnant असल्यासारखं वाटत होतं
- डिसेंबर मध्ये एक नवीन आवड जोपासायला सुरुवात केलीये - plants ची Happy
हे जमलं तर मजा येईल
- सगळ्या सोमी वरून exit घेतली मिळालेला वेळ चांगल्या रीतीने वापरतेय, कामात आणि मुलांकडे फोकस वाढवतेय

तीथवालला जायची इच्छा होती. काश्मीरमध्ये जाणे होणार होते. परंतु तीथवालपर्यंत जाऊ याची खात्री नव्हती तरी प्लॅनमध्ये घुसवले. जायच्या दिवशी खूप अडचणी आल्या. मी तर नाद सोडलाच होता. पण नवऱ्याने शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत आणि आमचा प्रवास घडवून आणला.

अनिंद्य तुमच्या घरातील भिंतीवरती हे कालनिर्णय आहे का? काय सुंदर पीच रंग आही भिंतीला. फार फार आवडता रंग आहे माझा. या रंगातील कपडे महाग असतात. म्हणजे तोच पॅटर्न/ कंपनी/स्टाइल पण वेगळा रंग स्वस्त असेल पण पीच आला, की कपडा महाग ठेवतात इथे.

>>>leave behind the chaff.
होयच!! मस्त वाक्य.
---------------
पीच कलर आहे की क्रीम? दोन्ही भयंकर सुंदर दिसतात.

छान धागा!
आदिकैलास यात्रा - one of my dream destination कायम स्मरणात राहील असाच सुंदर प्रवास झाला आणि छान ब्रेक ताजेतवाने करुन गेला. तसेच त्याचे लिखाण हाही एक सुखदायी अनुभव होता. त्यानिमित्ताने परत मायबोलीवर धावती का होईना, रोज चक्कर मारायची सवय लागली Happy

मुख कर्करोग पुन्हा उद्भवला नाही, स्कॅनिंगचा कालावधी दर सहा महिन्यावरून वर्षात एकदा असा झाला. मुलाला नोकरी लागली पुण्यात. छान झाले.
वर्षात एकदा गणपती पुळे आणि अक्कलकोट, आदमापूर, गोकर्ण महाबळेश्वर, मुर्डेश्वर गोंदवले, दोनदा जोतिबा आणि महालक्ष्मी झाले.
ऑफिसमध्ये बढती मिळून प्रोफेसर झालो.
वर्ष छान गेले आमचे.

>>>>>>मुख कर्करोग पुन्हा उद्भवला नाही, स्कॅनिंगचा कालावधी दर सहा महिन्यावरून वर्षात एकदा असा झाला.
अरे वा!! मोठी बातमी आहे. वर्थ सेलिब्रेटिंग. तुमची पुढील सर्व वर्षे निरोगी, निरामय जावोत.

हे वर्ष माझ्यासाठी मस्त गेलं
जॉब मध्ये पण आणि घरी सुद्धा.
१.जॉब मध्ये केलेल्या कामाच आणि मेहनतीचं चीज झालं..केलेल्या कामाच सेंट्रल लेव्हलला कौतुक झालं.(Employee of the month and Performance reward)
२.कितीतरी वर्ष प्लान करून ठेवलेली गिरनार यात्रा उत्तमरित्या पार पडली.
३. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात एक धमाल फॅमिली ट्रिप झाली.
४.वजन कमी करायच ठरवलं होतं ते झालं..मी गोडखाऊ आहे..त्यामुळे साखर सोडण माझ्यासाठी फार अवघड होत..पण केलं मी...

...>>>>>>>>मुख कर्करोग पुन्हा उद्भवला नाही, स्कॅनिंगचा कालावधी दर सहा महिन्यावरून वर्षात एकदा असा झाला.
छान बातमी...तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो...पुण्यातल्या गटग ला तुम्ही सांगली वरून आवर्जून आला होतात..तेव्हा तुमच्याशी बोलायची संधी मिळाली नाही.

… अनिंद्य तुमच्या घरातील भिंतीवरती हे कालनिर्णय आहे का?…

होय. घराची भिंत + रंग फिका पीच. मन शांतावणारा रंग.

… या रंगातील कपडे महाग असतात… हे नव्हते माहित.

Thank you for the compliments.

सर्वांचे छान अपडेटस् आहेत, पुन्हा येतो नंतर.

मुख कर्करोग पुन्हा उद्भवला नाही, स्कॅनिंगचा कालावधी दर सहा महिन्यावरून वर्षात एकदा असा झाला. >> उत्तम बातमी

धनश्री पीचबद्दलचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. एक तर येता जाता हा कलर मिळत नाही आणि त्यातला ड्रेस/टॉप जनरली महागच असतो.

मुख कर्करोग पुन्हा उद्भवला नाही, स्कॅनिंगचा कालावधी दर सहा महिन्यावरून वर्षात एकदा असा झाला.
छान बातमी...तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो.

धनश्री, अश्विनी_९९९, मंजूताई, माझे मन धन्यवाद. 25 सप्टेंबर 2020 मध्ये कोविड अगदी जोमात असताना माझी शस्त्रक्रिया झाली. त्यादिवशी एकूण पाच झाल्या. केमो आणि रेडिएशन साठी दोन महिने यांची रोज भेट व्हायची.
दुर्दैवाने बाकी चौघे देवाघरी गेले.
माझे काम शिकवणे म्हणजे बोलणे आहे. मी सहा महिने text to speech चा वापर करून शिकवले.
आता काहीही अडचण नाही. दहा वीस मिनिटे संवाद झाला की मुलांना माझे बोलणे समजते. मी आता 90 मुलांना पण नवनवीन विषय शिकवतो.

अर्थात माझी इच्छाशक्ती, सहचारिणीचा आणि मुलांचा भक्कम पाठिंबा, डॉक्टरांचे कौशल्य आणि शेवटी नशीब यांनी साथ दिली. 76 किलोवरून आधी 48 किलो आणि आता 57 किलो आहे. तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणी असल्या तर काहीच अडचण नाही.

शरदजी ,तुमची अचिव्हमेंट खरंच आनंददायी आहे. तुमचं अभिनंदन. यातून पूर्णपणे बरे व्हाल या शुभेच्छा !

आनंददायी घटना म्हटले तर वाईटातून चांगल्या बघायला लागतील.
माझं खांदा आणि हाताचं दुखणं जून पासून सुरू झालं. त्याची ट्रीटमेण्ट सुरू करताना लक्षात आलं कि आहार आणि व्यायाम यांचा मेळ नीट बसला नव्हता. यातून मग कारणं समोर आली आणि उपचारांचा फायदा झाला. दुखणे आता कमी झाले आहे. म्हणजे योग्य उपचार सुरू आहेत हे आनंददायी आहे.

या वर्षी तिर्थन व्हॅली मधे कॉन्सर्टच्या निमित्ताने जाणं झालं. तीर्थन नदीच्या पाण्यात पाय सोडून बसण्याचा आनंद मिळाला. कमी गर्दीचं सर्वात सुंदर गाव बघता आलं. पुढच्या वर्षात पुन्हा जाऊन ग्रेट इंडीयन नॅशनल पार्क मधे जायचं आहे.

@ Sharadg, ब्रावो !

Huge respect ! 🫡

oesophageal carcinoma ने आईला हिरावून नेले. तेव्हां पोरगेल्या वयाचा मी तिच्या संघर्षात सतत सोबत होतो. म्हणून तुमचा लढा अगदी व्यवस्थित समजू शकतो, relate करू शकतो.

तुमची चिकाटी, इच्छाशक्ती आणि त्याला नशीबाची साथ अशीच भरभक्कम राहो. २०२६ अधिक चांगले, आनंदाचे जावो असेच म्हणतो.

ह्या धाग्याचे शीर्षक लिहितांना भरत यांचे भरतवाक्य आठवले - “आनंदी / दु:खी व्यक्ती असते. वेळ, घटना इ. आनंददायी / दु:खदायी असतात”

मग “आनंदी घटना” खोडून “आनंददायी घटना” केले. 🙂

थँक्यू भरत !

शरदजी, खरंच छान बातमी.
>>> तुमची चिकाटी, इच्छाशक्ती आणि त्याला नशीबाची साथ अशीच भरभक्कम राहो. २०२६ अधिक चांगले, आनंदाचे जावो.
+१

अनिंद्य, तुमच्या आईंबद्दल वाचून वाईट वाटलं. तेव्हा पोरगेल्या वयाचे असून तुम्ही त्यात त्यांच्या सोबत सतत उभे होतात हे महत्त्वाचं!

शरद जी, खूप छान वाटलं तुमच्या तब्बेती विषयीच वाचून.
येत्या वर्षात अजून सुधारणा होऊदे. >> +११
अनिंद्य, तुमच्या आईविषयी वाचून वाईट वाटले. लहान वयात आपल्यालाच खरी गरज असते आईची पण तरी ही तुम्ही तिच्या पाठी उभे राहिलात हे महत्वाचं .

छान धागा. आता दिवसभर गेलं वर्षं कायकाय झालं ते आठवण्यात जाईल.
एकट्याने भारतात आलो, आणि भरपूर माबोकरांची भेट झाली.
मुलाची आईस हॉकी मध्ये या सीझनला जरा थोड्या वरच्या गटात निवड झाली.
हार्मोनियम इथे आणून जमेल तसं हात फिरवणे चालू केले, सफाई आणि सराव खूप हवा आहे. तो होईल न होईल, गाणं आवडलं तर मुखडा, आवडलेला पीस तरी वाजवून, बसवून बघू ची हौस सध्या पुरवतो आहे.

चाफा, अबोली आणि सोनटक्का ही तीन आवडती झाडं अजून जगवून ठेवली आहेत. कळ्या मोहोर अजून मारतोच आहे पण फुलतील! जाताहेत कुठे! नाही तर परत आणू!

शरद, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा!

छान आनंददायी धागा आणि प्रेरणादायी (बरोबर ना?) प्रतिसाद. माझी achievement काहींना फारच छोटी वाटेल, पण माझ्यासाठी मोठी आहे. गेल्या १०-१२ वर्षात अभ्यासेतर वाचन शून्यावर आले होते. त्याबद्दल खंत वाटत होती. २०२३-२४ मध्ये ऑडिओ बुक्स ऐकायला सुरुवात करून निदान पुस्तके कानावर पडतील अशी सुरुवात झाली. २०२५ च्या शेवटच्या तिमाहीत एक पुस्तक हाती पडले, ते वाचावेसे वाटले आणि संपूर्ण वाचून काढले. माझ्या पूर्वीच्या वेगाच्या तुलनेत हा अत्यंत कमी वेग होता, फार वेळ लागला, पण मी नेटाने संपवले. त्यामुळे आता जरा कॉन्फिडन्स आला आहे. आता वाचन पुनरुज्जीवित करणे आणि लेखनही करणे ह्याकडे लक्ष राहील.

हपा
माझीही तक्रार आहे वाचनाची सवय कमी झाल्याची.
पण ही तक्रार जवळच्या अनेकांची सुद्धा आहे. स्क्रीनटाईम कमी केला पाहिजे का?

…वाचन पुनरुज्जीवित करणे आणि लेखनही करणे…

@ हरपा, हे Best

@ अमितव, चाफा माझाही फेव.

@ रानभुली, compromised फिटनेस परत मिळवण्यासाठी शुभेच्छा.

तिर्थन व्हॅली !! हेवा वाटला.

Ashwini_९९९

Nothing pleases more than efforts being recognised.

त्यात साखरेवर कंट्रोल केलात ही तर super achievement आहे. Power to you !

Pages