Submitted by एक लेखक on 26 December, 2025 - 10:23
सोळा वर्षाच्या आतल्या अल्पवयीन मुलांना सोशल मीडीयात बंदी असावी का ?
याचे फायदे तोटे काय आहेत ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मागे मी फेसबुक इन्स्टावर
मागे मी फेसबुक इन्स्टावर दिसणाऱ्या एका वल्गर कार्यक्रमांच्या व्हिडिओचा निषेध केला होता. कारण त्यावर कुठलाही सेन्सॉर नसून ते लहान मुले सुद्धा बघू शकतात. तेव्हा काही जणांनी म्हटले होते की अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया अकाउंट उघडायला बंदी आहे. तर लहान मुलांची चिंता करू नये.
India's got latent - चला निषेध नोंदवूया.
https://www.maayboli.com/node/86266
मद्रास उच्च न्यायालयाने १६
मद्रास उच्च न्यायालयाने १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडीयावर बंदी घातली आहे.
https://www.youtube.com/watch?v=njuSicUIh9Q
हा विषय महत्वाचा वाटत नाही कि
हा विषय महत्वाचा वाटत नाही कि अन्य कुणाचा धागा असेल तरच प्रतिसाद देणार ?
फायदे म्हणजे विकृत लोकांच्या
फायदे म्हणजे विकृत लोकांच्या अमिषाला बळी न पडणे.
तोटा फक्त एवढाच की १७ व्या वर्षी अचानक मोकळे कुरण मिळाल्याने, तोल जाउ शकतो. जर लहानपणापासून पाहीले असते तर ग्रॅज्युअल ओळख झाली असती.
बंदी असावी .कारण सोळाच्या आत
बंदी असावी .कारण सोळाच्या आत म्हणजे कितीही म्हटलं तरी अपरिपक्व वय ते वय शालेय शिक्षणाचं आहे .त्याचंच असावं समाजमाध्यमांवर यायला पुढची सगळी वर्ष आहेतच. उगाच मोलाचा वेळ जातो तो वेगळाच.आणि सोशल मिडिया जबाबदारीने वापरण्याची अक्कल त्या वयात कमीच असते तसंच ते अतिशय ॲडीक्टिव माध्यम असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या त्या वयासाठी घातकच.
फायदे धनश्री ने लिहिल्याप्रमाणे ओळख असावी पण ती जबाबदार व्यक्ती क्या देखरेखीखाली असावी काय चूक काय बरोबर याच्या सीमारेषा अल्पवयीन मुलांना ओळखता येण्यासाठी मोठ्यांच मार्गदर्शन हवंच.
बंदी असावी पण नुसतीच बंदी
बंदी असावी पण नुसतीच बंदी नाही उपयोगाची, त्या जोडीला मुले आणि पालकांसाठी सातत्याने मार्गदर्शन असावे. बरेच सोशल मेडीआ प्लॅटफॉर्म्स तर पालकांना माहीतही नसतात, मूल फूस लावून पळवले गेले की पोलीसांकडून शोधाशोध होते तेव्हा कळते की असा पण एक प्लॅटफॉर्म आहे.
बंदी असावी पण नुसतीच बंदी
बंदी असावी पण नुसतीच बंदी नाही उपयोगाची, त्या जोडीला मुले आणि पालकांसाठी सातत्याने मार्गदर्शन असावे. बरेच सोशल मेडीआ प्लॅटफॉर्म्स तर पालकांना माहीतही नसतात, मूल फूस लावून पळवले गेले की पोलीसांकडून शोधाशोध होते तेव्हा कळते की असा पण एक प्लॅटफॉर्म आहे.
हो आजकालची मुलं फक्त हुशारच
मुलं दोन पावलं पुढं असतात>>>>
हो आजकालची मुलं फक्त हुशारच नाहीत तर टेक्निकली स्मार्ट आहेत . त्याचसाठी पालकांची जबाबदारी वाढते, 24 तास मुलांवर लक्ष ठेवणे शक्य नाही आणि योग्यही, परंतु विश्वासाने सो मीडिया (एकूणच ईंटरनेट )वापरण्याचे योग्य मार्गदर्शन व धोके समजावून सांगण्याची जबाबदारी पालकांनी निभावली ,तर मुलं समजून घेतात व जबाबदारीने वागण्याची शक्यता निर्माण होते.खरंतर शाळांमधून ही याबद्दल जागरूकता निर्माण करायला हवी .कदाचित झालीही असेल ,मला आयडिया नाही.
शाळेतल्या बाईंचे
शाळेतल्या बाईंचे इन्स्टा अकाउंट असते आणि सहावी सातवीचे स्टुडंट्स त्यांना फॉलो करत असतात इतकी मला कल्पना आहे.
इंस्टाग्राम साठी त्यांची
इंस्टाग्राम साठी त्यांची वयोमर्यादा आहे ना, बहूतेक १४ किंवा १६ वर्षे. जीमेल अकाऊंट साठी सुद्धा १६ पेक्षा लहान मुलांना फॅमिली अकाउंट उघडावे लागते. पण मुलं / त्यांचे पालक वय वाढवून अकाउंट उघडतात.
माझ्या मुलाचे लॉकडाउन आधी ईमेल अकाउंट नव्हते, सातवीत होता तो. दुसऱ्या कोणत्याही सोशल मिडियावर तो नव्हता. लॉकडाउन मध्ये ज्यावेळी शाळेने गुगल क्लासरूम साठी ईमेल बनवायला सांगितले त्यावेळी त्यांच्या वर्गात फॅमिली गुगल अकाउंट असलेला तो एकमेव मुलगा होता. त्याच्या वर्गातल्या मुलांचे इंस्टा अकाऊंट होते त्यावेळी. त्याचे मात्र ते त्यांच्या वयोमर्यादेत आल्यावरच अकाउंट बनलं. मी शाळेत बोलून शाळेला सोशल मिडिया अवेअरनेस बद्दल मुलांचे आणि पालकांचे वेगवेगळं सेशन घ्यायला सांगितलं होते. पालकांनाच तितका अवेअरनेस नसतो बऱ्याचदा.
मराठीत मुक्ता चैतन्य खूप चांगली सेशन्स घेते याविषयावर.
मुलं खोटी जन्मतारीखा घालून
मुलं खोटी जन्मतारीखा घालून उघडतात की अकॉउंट.